Breaking News

Ramprahar Team

खारघरमध्ये सम विषम पार्किंग व्यवस्था

खारघर : प्रतिनिधी खारघर शहरातील सेक्टर 6 मधील सावन हायनेस सोसायटी समोरील रस्त्यावर नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी सम विषम नियमांची अंमलबजावणी नियमावली 8 एप्रिलपासून लागु केली आहे. त्याठिकाणच्या रस्त्यावर होणारी वाहतुक कोंडी, तसेच वाहतुक करताना निर्माण होणार्‍या अडथळ्यामुळे नवी मुंबई वाहतुकीचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी यासंदर्भात अधिसूचना पारित केली …

Read More »

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची आदिवासीपाड्यात जनजागृती करा

नगरसेवक राजेंद्र शर्मा यांची मागणी पनवेल : वार्ताहर मार्च महिन्यापासून देशात सर्व ठिकाणी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणास प्रारंभ झाला आहे. पनवेल तालुक्यातही ही मोहीम सुरू आहे, असे असले तरी दुर्गम भागात राहणार्‍या आदिवासी वाड्या आणि पाड्यांवर याबाबत माहिती आणि जनजागृती नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे त्यांना जमत नाही. …

Read More »

उरणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत; तीन महिन्यांत 1350 जणांना दंश

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यामध्ये गेल्या तीन महिन्यांत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सुमारे 1350 हुन अधिक लोक गंभीर जखमी झाले  आहेत. हा एक आगळावेगळा विक्रम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उरण तालुक्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात वाढला असून, गेल्या चार दिवसात  51 जणांना कुत्र्यांनी चावा-घेऊन गंभीर जखमी केले आहे. …

Read More »

पोळी-भाजी केंद्र व्यावसायिक चिंतेत

राज्य शासनाने मदत करण्याची मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासनाने कडक निर्बंधांसह लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे हॉटेल्स, कॅटरर्स बंद झाली, परंतु या ठिकाणी पोळी भाकरी पुरविणार्‍या महिलांची भाजी भाकरीदेखील थांबली आहे. उदर्निवाहाचा बिकट प्रश्न निर्माण झाल्याने अनेक कुटुंबे शहरातून मूळगावी स्थलांतरित झाली असून उपासमार थांबण्यासाठी राज्य …

Read More »

सर्वोच्च चपराक

माजी गृहमंत्र्यांनी निष्पक्षपातीपणाने आपल्या विरुद्धची चौकशी व्हावी या सद्हेतूने (?) आपण राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु विरोधाभास एवढा की निष्पक्षपाती चौकशीचे स्वागत करणारे हेच माजी गृहमंत्री सर्वोच्च न्यायालयात धावले ते चौकशी रद्द करण्याची मागणी करण्यासाठी. नेमके काय खरे मानायचे? आपल्या विरुद्धची चौकशी निष्पक्षपातीपणाने व्हावी हा त्यांचा खरोखर हेतू …

Read More »

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर करावे

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कर्जत तालुका आदिवासी बहुल असून त्यांची परिस्थिती हालाकीची आहे ते खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकत नाहीत. मध्यमवर्गीय माणूससुद्धा  कोरोना उपचाराचा खर्च करू शकत नाही. या बाबींचा विचार करून कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कोकण …

Read More »

मंदिरांतील पुजार्यांना आर्थिक मदत द्यावी

गुरव समाज नेते बंडू खंडागळे यांची मागणी पेण : प्रतिनिधी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी पुजारी वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मंदिरांतील पुजार्‍यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी  गुरव समाजाचे खजिनदार बंडू खंडागळे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाच्या काळात सुमारे वर्षभर …

Read More »

भाजप व्यापारी, सामान्य जनतेच्या पाठीशी राहणार -जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते

मुरुड : प्रतिनिधी  सततच्या लॉकडाऊनमुळे आज व्यापारी व जनता त्रस्त आहे. मिनी लॉकडाऊन सांगून प्रत्यक्षात सर्वच दुकाने बंद करणे, ही महाविकास आघाडी सरकारची दुटप्पी भूमिका आम्हाला कदापी मान्य नाही. भाजप व्यापारी, सामान्य जनतेच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. अ‍ॅड. …

Read More »

महाडमध्ये भाजपची स्वाक्षरी मोहीम

महाड : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोणताही विचार न करता जनतेवर लादलेल्या अन्यायकारक लॉकडाऊन विरोधात महाड भाजपच्या वतीने गुरुवारी (दि. 8) स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शहरातील छोटे व्यावसायीक आणि व्यापार्‍यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊन अन्यायकारक असून, त्यामुळे गरीबांवर उपासमारीची वेळ …

Read More »

लॉकडाऊनविरोधात भाजप आक्रमक

कर्जतमध्ये प्रशासनाला निवेदन कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी राज्य शासनाने लावलेले लॉकडाऊनसदृश निर्बंध उठवावेत, या मागणीसाठी कर्जत तालुका भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. भाजप व्यापारी आणि उद्योग सेलच्या वतीने त्याबाबत रायगड जिल्हाधिकारी आणि कर्जत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. कर्जत तालुक्यात औद्योगिक वसाहत नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही. मात्र कृषी …

Read More »