Breaking News

Ramprahar Team

माणगावमध्ये इमारतीत आढळले रक्ताचे ठिपके

महालक्ष्मी निवारामधील प्रकार ः नागरिक भयभीत, घातपाताची शक्यता, तपास सुरू   माणगांव : प्रतिनीधी माणगाव शहरातील उत्तेखोलवाडीत नव्याने निर्माण झालेल्या महालक्ष्मी निवारा कॉम्प्लेक्समध्ये 3 जानेवारी 2023 रोजी रात्रीच्या सुमारास काहीतरी भयानक प्रकार घडला. या प्रकारामुळे महालक्ष्मी निवासामधील नागरीक भयभीत झाले आहेत. या इमारतीमध्ये जिने आणि टेरेसवर रक्ताचे शिंतोडे पडल्याचे आढळले. …

Read More »

श्रमसंस्कार शिबिराचा भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते प्रारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त जे लोकांच्या उपयोगी पडतात त्यांचे आदर्श घ्या असा मोलाचा सल्ला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांना दिला. रयत शिक्षण संस्थेच्या पनवेलमधील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ‘विशेष श्रम संस्कार शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. युवकांचा ध्यास: ग्राम …

Read More »

‘विद्याभवन’च्या 31 विद्यार्थ्यांची राज्य शिष्यवृत्तीसाठी निवड

नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतून पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलातील 31 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2021 -22 या शैक्षणिक वर्षात घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी अगोदरच जाहीर केली होती. नुकतेच शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे ऑनलाइन …

Read More »

ऑडी गाडीमधील हत्येचा उलगडा

पुण्यातून आरोपी ताब्यात गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलची कारवाई पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील तारा गावाच्या हद्दीत दीड महिन्यापूर्वी काही अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह ऑडी गाडी ठेवून ते पसार झाले होते. याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने सातत्याने पाठपुरावा करून या गुन्ह्यातील दोन …

Read More »

पेणमध्ये उपसरपंचपदासाठी मोर्चेबांधणी

  आज निवडप्रक्रिया पेण: प्रतिनिधी पेण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीपैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली. तालुक्यात 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीत पार पडल्या. आता तालुक्याच्या ग्रामीण भागातील राजकीय वर्तुळाचे लक्ष उपसरपंच निवडीकडे लागले आहे. या पदासाठी इच्छुक सदस्यांनी फिल्डींग लावली असली तरी निर्णायक स्थितीत सरपंचाच्या विशेष अधिकाराला महत्व असणार आहे. तालुक्यातील उपसरपंचाची निवड …

Read More »

चौक, खालापूर पोलिसांची गस्त; धुंद चालकांवर कारवाई

  चौक : प्रतिनिधी रात्री अपरात्रीपर्यंत मौजमजेसाठी सरकारने वेळ द्यायचा आणि त्यांचे रक्षण पोलिसांनी ठेकेदार बनून करायचे हे कुठवर चालणार? असा प्रश्न पडतो. नव्या वर्षाच्या स्वागताला आपल्या परिवारासह लोक बाहेर पडतात आणि त्यांचे रक्षण पोलीस करताना दिसत आहेत. तसेच यावेळी कांही धुंंद वाहन चालकांवर कारवाईही केली. काल दुपार पासूनच राष्ट्रीय …

Read More »

गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी!

पाली-खोपोली मार्गावर वृक्षतोडीमुळे सावली हरपली पाली : प्रतिनिधी पाली-खोपोली महामार्ग हा वाहतुकीच्या व प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. खोपोली-वाकण महामार्ग हा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडणारा एक महत्वाचा दुवा असल्याने या महामार्गावर रहदारी करणा-या वाहनांची संख्या मोठी आहे, मात्र या मार्गाची स्थिती पाहता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी अशी …

Read More »

अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी नराधम वॉचमनला जन्मठेपेची शिक्षा

पनवेल ः वार्ताहर आईला बोलण्यात गुंतवून ठेवून तिच्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधाम वॉचमननी लैंगिक अत्याचार केल्याची घटना पनवेल शहरात घडली होती. यातील एका आरोपीचा तुरुंगात मृत्यू झालेला, तर दुसर्‍यास सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. पनवेल शहरातील पाच वर्षीय पीडित मुलगी तिच्या आईसोबत पनवेलच्या …

Read More »

अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी नराधम वॉचमनला जन्मठेपेची शिक्षा

पनवेल ः वार्ताहर आईला बोलण्यात गुंतवून ठेवून तिच्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधाम वॉचमननी लैंगिक अत्याचार केल्याची घटना पनवेल शहरात घडली होती. यातील एका आरोपीचा तुरुंगात मृत्यू झालेला, तर दुसर्‍यास सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. पनवेल शहरातील पाच वर्षीय पीडित मुलगी तिच्या आईसोबत पनवेलच्या …

Read More »

सीकेटी विद्यालयात पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयामध्ये गुरुवारी (दि.29) पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास डॉ. अस्मिता जगदिश घरत आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सह-सचिव भाऊसाहेब थोरात, उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य प्रशांत मोरे, मराठी माध्यमिक …

Read More »