Breaking News

Ramprahar Team

तरुणीचा विनयभंग करून पसार झालेल्याचा शोध

पनवेल : वार्ताहर उलवेमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. बस स्टॉप वर बसची वाट पाहणार्‍या तरुणीचा अज्ञात व्यक्तीने विनयभंग करून पसार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उलवे येथून सीवुड येथे जाण्यासाठी बसची वाट पाहणार्‍या 23 वर्षीय तरुणीला अज्ञात तरुणाने छातीला हाताने स्पर्श …

Read More »

नवी मुंबई फेस्टमधून एकात्मतेचा संदेश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले कौतुक नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वर्ल्ड कल्चरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनतर्फे नवी मुंबई फेस्ट 2023या सामाजिक-सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 21 जानेवारीपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून 29 जानेवारीपर्यंत हा फेस्ट झाला. या फेस्ट ला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 29) सदिच्छा …

Read More »

नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाची सांगता

नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार सिबीडी येथील सुनिल गावस्कर मैदानात सलग 10 दिवस रंगलेल्या नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव-2023 चा सांगता समारंभ उत्साहात पार पडला. या वेळी मराठी दौलत लाखाची या मराठी नृत्यगीत कार्यक्रमाने समाप्ती करण्यात आली. श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या सभासद महिलांनी यावेळी नृत्य करून कार्यक्रमाचा आनंद …

Read More »

नवी मुंबई शहरावर 1605 कॅमेर्‍यांतून वॉच

बेलापुरमधून सीसीटिव्ही लावायला सुरुवात नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेत बहुचर्चित असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे काम दृष्टीक्षेपात आले आहे. नवी मुंबईत प्रवेश करणार्‍या प्रत्येकावर व शहरातील सार्वजनिक ठिकाणच्या हालचालींवर 1605 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असणार असून पालिका मुख्यालयात पहिल्या मजल्यावरील नियंत्रण कक्षाचे कामही अंतिम पूर्ण करण्यात आले आहे. बेलापूर विभागापासून …

Read More »

खोपोली नगर परिषदेच्या कचरा व्यवस्थापन उपक्रमाला प्रतिसाद

खोपोली : प्रतिनिधी नगर परिषदेच्या स्वच्छ भारत अभियान 2.0 आणि माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत स्वच्छते विषयक प्रकल्प प्रदर्शन आणि स्पर्धा खोपोली नगरपरिषद कार्यालयातील आरोग्य विभागात आयोजित करण्यात आली होती. स्वच्छते विषयक प्रकल्प प्रदर्शन आणि स्पर्धा उपक्रमात खोपोली नगरपालिका परिसरातील पाच खाजगी शाळा आणि पाच नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळांनी सहभाग …

Read More »

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी एकमताने ठराव पारित केल्यामुळेच सध्या माथेरान सारख्या डोंगराळ भागात अनेक अडचणींचा सामना करत पर्यावरण पूरक ई रिक्षा सुरू झाल्यामुळे अत्यंत स्वस्त सुरक्षित आणि सुलभ प्रवास मिळत असल्याने स्थानिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. माथेरानमध्ये …

Read More »

महडच्या मुंगुर तलावप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

खालापूर : प्रतिनिधी महड येथील मुंगुर तलावाबाबत सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अजया अनिल भाटकर (रा.102 ए वींग भक्ती डेव्हलपर्स ता. खोपोली) यांनी खालापूर नगरपंचायत हद्दीत महड येथे तीन आरोपी भाई काशिनाथ पाटील (रा. पेंधर, पनवेल), ए रहमान कर्जीकर आणि अनोळखी इसम याने भाडेतत्वावर घेतलेल्या तलावाबाबत नोटीस देवून मुंगूर माशांचे …

Read More »

खालापूर परिसरात माती उत्खनन सुरूच; महसूल विभाग अंधारात

प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी खालापूर : प्रतिनिधी शासनाची कोट्यवधीची रॉयल्टी बुडवून सुरू असलेल्या माती उत्खनन आणि वाहतुकीला दोन ठेकेदारांच्या भांडणांमुळे वाचा फुटली असून तलाठी, मंडल अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी मात्र धृतराष्ट्राच्या भुमिकेत आहेत. तसेच या परिसरातील अनेक ठिकाणी माती उत्खनन सुरू असून महसूल विभाग मात्र अंधारात आहे. तालुक्यातील वावोशी …

Read More »

लिमये महाविद्यालयातर्फे ग्राम-शहर विकास शिबिर उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये (एसएमडीएल) महाविद्यालयाच्या एन. एन. एस. विभागाद्वारे आयोजित युवकांचा ध्यास : ग्राम – शहर विकास हे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबीर स्व. छाया आत्माराम पाटील स्कूल मानघर, पनवेल येथे संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या कार्यवाहक गीताताई पालरेचा …

Read More »

शिक्षकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक

खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर महाराष्ट्र राज्य नगरपरिषदा व महानगरपालिका शिक्षक संघाची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत विविध मागण्यांसंदर्भात बैठक शुक्र्रवारी (दि. 27) बैठक झाली. शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत विविध मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी तसेच शिष्ट मंडळाला दिले. 20 जानेवारीला …

Read More »