नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग, मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिवस व कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास आगरी भाषेतील लेखक, कवी चंद्रकांत मढवी यांना आमंत्रित …
Read More »आर्थिक गणनेसाठी सहकार्य करावे
महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत महाराष्ट्र राज्यात 26 नोव्हेंबर 2019पासून सातवी आर्थिक गणना-2019 सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातही आर्थिक गणनेचे काम सुरू झाले आहे. घरोघरी कुटुंबांना व उद्योजकांना भेटी देऊन उद्योग, व्यवसाय आणि सेवा …
Read More »भीती नको पण काळजी घ्या
भारतात लोकसंख्येची घनता दाट असल्यामुळे कुठल्याही संसर्गजन्य रोगाची लागण फार चटकन होते. तसेच सार्वजनिक आरोग्याबाबत आपल्याकडे एक प्रकारची उदासिनता दिसते, ती टाळावयास हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शर्थीचे प्रयत्न करून अत्यंत आग्रहाने देशपातळीवर स्वच्छता अभियान राबवले. तब्बल दहा कोटींहून अधिक शौचालये बांधली. त्याचे महत्त्व आता तरी विरोधकांना पटेल का? चीनमधील …
Read More »दिव्यांग ऋषिकेशने केला दुर्गराज रायगड किल्ला सर
म्हसळा : प्रतिनिधी सेरेब्रल पाल्सी या असाध्य रोगाने ग्रस्त असलेल्या ऋषिकेश सुदाम माळी (वय 16) या विद्यार्थ्याने नुकताच रायगड किल्ला चढून पंगू लंघयते गिरिम हे वचन खरे ठरवले. ऋषिकेश माळी हा म्हसळ्याच्या एआयजे कॉलेजच्या 11 वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. त्याने पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळास नमन करून गिरिभ्रमणास …
Read More »शेतकर्यांना न्याय मिळवून द्या!
धेरंड, शहापुरातील शेतकर्यांचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना साकडे अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील धेरंड, शहापूर गावातील शेतकर्याच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. याबाबत विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात आवाज उठवावा, या शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते …
Read More »काजू प्रक्रिया उद्योगांचे पुनरूज्जीवन करण्याची गरज
गेल्या सात वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीआधी आघाडी सरकारने कोकणासह राज्याला तसेच देशाला परकीय चलन मोठया प्रमाणात उपलब्ध करून देणार्या आंबा आणि काजू या पिकांपासून विविध उत्पादन तयार करण्याच्या उद्योगांना संरक्षण देण्यासाठी दापोलीतील कृषी विद्यापिठामध्ये आंबा काजू बोर्डाचे कार्यालय सुरू केले. मात्र, हे कार्यालय सुरू होण्यापूर्वीच रत्नागिरीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. हा आंबा …
Read More »म्हसळ्यात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई
म्हसळा : प्रतिनिधी गुटखा विक्री केल्याप्रकरणी म्हसळा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून गुटका, सुगंधित तंबाखू असा एकूण चार हजार 528रुपयांचा माल जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक डूस यांनी सांगितले. या प्रकरणी रामचंद्र मारोतराव भरकळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन म्हसळा पोलीस ठाण्यात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला …
Read More »हेटवणे पाणीपुरवठा योजना पूर्ण करावी
आमदार रविशेठ पाटील यांची विधानसभेत मागणी पेण : प्रतिनिधी खारेपाट विभागातील हेटवणे-शहापाडा पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याची मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी विधानसभेत अधिवेशनात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील 36 गावे व 42 वाड्यांकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत हेटवणे- शहापाडा ही पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली …
Read More »नारी फिट इंडिया फिट कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : बातमीदार नवीन पनवेलमधील सेक्टर 16 मधील सिडको गार्डनमध्ये डॉ. शुभदा नील यांनी आयोजित केलेल्या डायट, संगीतमय योगा कार्यक्रमाला सोमवारी (दि. 2) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी मार्गदर्शनपर भाषणात डॉ. शुभदा नील म्हणाल्या की, गोड खाऊ नये. पालक, दुधी, पेरु, सफरचंद, कडीपत्ता, तुळस, पुदिना, नागवेल पाने, दालचिनी, काळी मिरी …
Read More »कामोठ्यात नगरसेविकेला लुटले..!
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कुसूम म्हात्रे यांना कामोठे वसाहतीत काही अज्ञात चोरट्यांनी घेरून अंगावरील सोने लुटल्याची घटना घडली आहे. चक्क नगरसेविकेला कामोठे वसाहतीमधील भर रस्त्यात लुटण्याच्या घटनेमुळे वसाहतीमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जवळपास आठ ते 10 तोळे सोने चोरट्याने लंपास केल्याचे सांगितले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper