व.पो.नि. अजयकुमार लांडगे यांचे ज्वेलर्सच्या व्यापार्यांना आवाहन पनवेल : वार्ताहर आपल्या दुकानात विक्रीसाठी असलेला सोने- चांदीचा माल हा महत्वाचा असून दुकान बंद झाल्यावर त्या मालाच्या सुरक्षिततेकडे व्यापारी बंधूंनी अधिक लक्ष द्यावे व जास्तीत जास्त सुरक्षित उपकरणांचा वापर करावा व चोरीचे प्रकार थांबवावेत, असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस …
Read More »आदिवासीवाडीतील कार्यालयाला पंख्यांचे वाटप
पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील कष्टकरी नगर येथील असलेल्या कार्यालयाला पार्श्व वुमन्स सामाजिक संस्था, पनवेल तालुका पत्रकार विकास मंच संस्था व संजय जैन मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने छताचा पंखा भेट देण्यात आला. काही दिवसापूर्वी येथील आदिवासी बांधवांना 100 ब्लँकटचे वाटप पार्श्व वुमन्स सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा बसंती जैन, पनवेल तालुका पत्रकार …
Read More »पनवेलमध्ये मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि. 7) मोठ्या उत्साहात झाला. हा कार्यक्रम रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पनवेल कोकण विभाग उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप यांच्या प्रमुख …
Read More »वणवे रोखण्याचे आव्हान ठरतेय फोल
पर्यावरणमंत्र्यांनी गांभीर्याने उपाययोजना करण्याची मागणी मोहोपाडा : प्रतिनिधी वणवे लागत असल्याने शेतकरी वर्गाची आणि राज्य सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. गावोगाव लावले जाणारे वणवे रोखण्याचे प्रशासनापुढे एक मोठे आव्हान ठरत आहे. वणव्यामुळे वनसंपदा तसेच वन्यजीवांचा र्हास होत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर निर्माण होत असून यासाठी वणवाविरोधी अभियान राबवून जनजागृती करणे …
Read More »विरोधकांना आरसा
निव्वळ मोदीविरोध आणि गृहमंत्री अमित शहा यांचा द्वेष या दोन कलमी कार्यक्रमावर काँग्रेस व डाव्या पक्षांचा विरोध आखलेला असतो हे एव्हाना स्पष्टपणे दिसून आले आहे. मोदी-शहा यांचा विरोध करता करता आपण शत्रूराष्ट्राच्या शेजारी जाऊन उभे राहिलो आहोत आणि त्यांचीच भाषा बोलू लागलो आहोत याचे भान काँग्रेस नेत्यांना उरले नाही. त्याचेच …
Read More »झोराबियन कंपनीची सामाजिक बांधलकी
शेणगाव शाळेला एलईडी टीव्ही भेट खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील डोलवली गावाच्या हद्दीतील झोराबियन चिक्स प्रा. लि. कंपनीने शेणगाव गावातील प्राथमिक शाळेला एलईडी टीव्ही संचाची भेट दिली. तसेच माणकीवली ग्रामपंचायती करीता 15 एचपी क्षमतेचा पंप आणि पाईपलाईन असा एकूण सुमारे तीन लाख 50 हजार रुपयांची मदत केल्याने या कंपनीच्या कार्याचे …
Read More »स्वच्छ सर्वेक्षण होतंय अस्वच्छ पद्धतीने!
म्हसळा : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत म्हसळा नगरपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी कचर्याच्या ठिगांवरच स्वच्छ सर्वेक्षणाचे मोठ-मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत, तर स्वच्छतेबाबत भिंतींवर रंगविलेल्या जाहिरातींखाली शेण व अन्य कचरा तसाच पडून आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने म्हसळा नगरपंचायतीला 14 व्या वित्त आयोगातून पाहिला हप्ता म्हणून रु 20 …
Read More »रेशन दुकानात ग्राहकांना समस्यांचा वेढा
भारतीय खाद्य निगमकडून तहसीलदारांना निवेदन कर्जत : बातमीदार तालुक्यातील रेशन दुकानांत ग्राहकांना आजही अनेक सुविधा मिळत नसून, अनेक त्रुटी असल्याने ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याबाबत भारतीय निगम मंडळाने कर्जत तहसीलदारांना निवेदन दिले आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थी, अंत्योदय धारक, केशरी कार्ड, एपीएल या रेशनकार्ड धारकांना रेशन दुकानांतून अन्नधान्य दिले …
Read More »पेण ग्रामीण रुग्णालय ‘अत्यवस्थ’
विविध समस्यांमुळे रुग्णांनी फिरवली पाठ पेण : प्रतिनिधी जेथे रुग्णांनी उपचार घ्यायचे ते पेण येथील ग्रामीण रुग्णालयच विविध समस्यांमुळे आजारी पडले आहे. त्यामुळे रुग्णांनी या रुग्णालयात उपचार घेण्याचे सोडून खासगी ठिकाणी उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. पेणच्या शासकीय ग्रामीण तथा उपजिल्हा रुग्णालयात बर्याच वेळा फक्त रिकाम्या खाटा रुग्णांची वाट बघत …
Read More »सुधागडातील टॉवर कंपन्या वठणीवर
महसुली दणक्यानंतर कर थकबाकी भरण्यास तयार पाली : प्रतिनिधी कर थकविल्यामुळे महसूल विभागाने मोबाईल कंपन्यांचे सुधागड तालुक्यातील 11 टॉवर सील केले होते. या दणक्याने जाग आलेल्या मोबाईल कंपन्यांनी सर्व कर भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे सील काढण्यात आले. सुधागड तालुक्यात वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे अनेक टॉवर असून, त्यापैकी काही कंपन्यांकडे एकूण पाच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper