Breaking News

Ramprahar Team

राज्यसभेची निवडणूक पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यसभेच्या 18 जागांसाठी 26 मार्च रोजी होणारी निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 26 मार्चला देशभरातील सात राज्यांमध्ये एकूण 18 जागांसाठी ही निवडणूक होणार होती. राज्यसभेत रिक्त झालेल्या एकूण 55 जागांवर केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यायची आहे. त्यापैकी 37 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली …

Read More »

मास्कचा काळाबाजार करणार्यांना मोक्का लावा -आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी वांद्रे येथे मास्कचा काळाबाजार करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी मास्कचा साठा करून काळाबाजार करणार्‍यांवर मोक्कांतर्गत कारवाई करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मास्कचा तुटवडा भासत आहे, मात्र …

Read More »

राज्यात कोरोनाचा चौथा बळी

65 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू मुंबई : प्रतिनिधी जगभरात थैमान घालणार्‍या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच असून राज्यात मंगळवारी (दि. 24) कोरोनामुळे 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. या मृत्यूमुळे राज्यातील कोरोना बळींचा आकडा आता चारवर गेला आहे. मंगळवारी मृत्यू झालेला इसम 15 मार्च रोजी …

Read More »

गुढीपाडवा साधेपणाने साजरा करा -राज्यपाल

मुंबई ः प्रतिनिधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होतानाच यंदा आपले राज्य तसेच संपूर्ण देश एका अभूतपूर्व संकटातून जात आहे. शासनातर्फे या संकटाला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र नागरिकांच्या संपूर्ण सहकार्याशिवाय हे शक्य नाही. यास्तव शासनाला सहकार्य …

Read More »

आपत्कालीन ग्रुपकडून सीसीटीव्हीची डागडुजी

खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या बिकट संकटाचा सामना करण्यासाठी राज्यात संचारबंदी सुरू आहे. खोपोली शहरात पोलिसांच्या कार्याला मदत करणारा तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे व खांबाची स्थिती सुस्थितीत राखण्यासाठी खोपोली आपत्कालीन मदत ग्रुपच्या सदस्यांनी डागडुजी आणि दुरुस्ती केली. शहरातील काही सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे खांब एकतर वाकले किंवा झुकले होते. त्यामुळे अपघाताच्या शक्यतेसह …

Read More »

खालापूरकरांना महावितरणचा शॉक

खोपोली ः बातमीदार कोरोनाच्या दहशतीमुळे घरात बसून राहणार्‍या खालापूर आणि परिसरातील नागरिकांना महावितरणच्या गलथान कारभाराने जीव नकोसा झाला आहे. येथे आठवडाभरापासून विजेचा लंपडाव सुरू आहे. रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. उन्हाळ्यामुळे वाढते तापमान आणि सध्या कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. मुलांनीसुद्धा कोरोनाच्या सुटीत मैदानाऐवजी टीव्ही …

Read More »

कर्जत तालुक्यात गावांची अघोषित संचारबंदी

अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे, मात्र तरीदेखील किराणा, भाजीपाला, दूध आणि मेडिकल या अत्यावश्यक सेवांना यातून सूट दिली आहे. त्यामुळे संचारबंदी असली तरी अत्यावश्यक वस्तू मिळत असल्याने लोक समाधानी असून खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. दरम्यान, मिठाईची दुकाने मात्र …

Read More »

धैर्य राखून दक्षता हवी

राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अर्थात जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आदींचा पुरवठा तसेच इतर आवश्यक सेवा सुरूच राहणार आहेत. जिल्ह्यांच्या सीमाही आता बंद करण्यात आल्याने प्रवासावर मर्यादा येतील. त्याने काही प्रमाणात जनता भयभीतही होईल. पण त्याला आता इलाज नाही. कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी देशभरात करण्यात आलेले लॉकडाऊन आजही अनेकजण गांभीर्याने घेत …

Read More »

न्हावा शेवा वाहतूक शाखेतर्फे जेएनपीटी चेअरमन यांना निवेदन

उरण : वार्ताहर कोरोना (कोविड-19) विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत न्हावा शेवा वाहतूक शाखेच्या वतीने जेएनपीटी चेअरमन संजय सेठी यांना न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत कामत यांनी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, भारत देशात व महाराष्ट्र, मुंबईसह कोरोना हा संसर्गजन्य प्रसारीत झाल्याने व त्याची लागण …

Read More »

कर्जत, नेरळमध्ये पोलीस आक्रमक

कर्जत : बातमीदार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला जनता कर्फ्यू पहाटे संपल्यानंतर रात्री 12पासून महाराष्ट्र सरकारने जमावबंदीचा कलम 144 लागू केला आहे. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी असताना देखील कर्जत तालुक्यातील सर्व बाजारपेठा गिर्‍हाईकांनी फुलल्या होत्या. शेवटी कर्जत आणि नेरळची बाजारपेठ पोलीस दल आक्रमक झाल्याने बंद पाडण्यात …

Read More »