Breaking News

Ramprahar Team

महाडमध्ये चोरी करणार्या महिलांना अटक

महाड : प्रतिनिधी येथील बाजारपेठेतील गर्दीचा फायदा घेत चोरी करणार्‍या दोन महिलांना गुरुवारी (दि. 20) दुपारी महाडमधील नागरिकांनी रंगेहाथ पकडले. या दोन महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. महाड तालुक्यातील नागाव येथील संतोष हेमचंद शेठ हे आपल्या नातीच्या लग्नाकरिता दागिन्यांची खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांनी …

Read More »

ग्रामपंचायतीची बनावट कागदपत्रे आणि शिक्के बनवून वापर

पोलिसांत तक्रार; टेंबरे ग्रामपंचायतीतील घटना कर्जत : बातमीदार तालुक्यामधील टेंबरे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील एका फार्महाऊस मालकाने ग्रामपंचायतची बनावट कागदपत्रे आणि शिक्के तयार केले असल्याचे उघड झाले आहे. घरपट्टी आकारण्यासाठी आल्यानंतर संबंधित कागदपत्रे बोगस असल्याचे लक्षात आल्याने ग्रामपंचायतीने त्या सर्व बोगस कागदपत्रांची चौकशी करावी, अशी मागणी कर्जत येथील पोलीस उपअधीक्षकांकडे केली आहे. …

Read More »

एसटी बसेसच्या अनेक फेर्या रद्द

श्रीवर्धन-म्हसळा मार्गावरील प्रवाशांची फरफट म्हसळा : प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या श्रीवर्धन आगाराने ग्रामीण भागातील अनेक बसफेर्‍या कमी केल्या असून, भिवंडी, ठाणे, भांडूप, भाईंदर या फेर्‍या रद्द केल्या आहेत. त्यामुळे श्रीवर्धन-म्हसळा मार्गावरील प्रवाशांची फरफट होत आहे. शासनाने ’गाव तेथे रस्ता’ आणि राज्य परिवहन महामंडळाने ’रस्ता तेथे एस़टी़’ असे धोरण अंगीकारले आहे़, …

Read More »

बोरघाटात अपघात; एक ठार, दोन जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात खालापूर तालुक्यातील ढेकू गावच्या हद्दीत तीव्र वळणावर शनिवारी (दि. 22) पहाटे इन्होवा कारने कंटेनर ट्रेलरला पाठीमागून ठोकर दिली. या अपघातात एक जण ठार, तर दोन प्रवासी जखमी झाले आहेत. आयर्न टूर आणि ट्रॅव्हल्स कंपनीची इनोव्हा कार (एमएच-03, सीपी-4747) शनिवारी द्रुतगती महामार्गावरून सोलापूर …

Read More »

भाजप अलिबाग तालुका कार्यकारिणी जाहीर

जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे प्रदान रेवदंडा : प्रतिनिधी भाजपची अलिबाग तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून नागाव येथील रूक्मिणी कॉटेजमध्ये   नवनिर्वाचित भाजप तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. भाजप अलिबाग तालुकाध्यक्षपदी परशुराम …

Read More »

फिल्मी स्टाइलने अपहरण

कर्जतमध्ये अपहरणकर्त्यांना तत्काळ अटक कर्जत : बातमीदार तालुक्यातील सांगवी गावातील तरुणाचे गुरुवारी (दि. 20) रात्री साडेअकरा वाजता चार पांढर्‍या रंगाच्या गाड्यांमधून आलेल्या अज्ञात इसमांनी अपहरण केले होते. त्याबाबतची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर कर्जत पोलिसांनी अवघ्या चार तासांत अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांनी या घटनेत वापरलेल्या गाड्यादेखील  ताब्यात घेण्यात आल्या आहेत. …

Read More »

भाजप रायगड (उत्तर) ट्रान्सपोर्ट सेल जिल्हा अध्यक्षपदी सुधीर घरत

उरण : वार्ताहर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीनंतर प्रदेश व जिल्हा कार्यकारिणीची निवड झाली. भाजप रायगड (उत्तर) जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी रायगड (उत्तर) जिल्हा कार्यकारिणी नव्याने जाहीर केली. त्यामध्ये लढाऊ कामगार नेते सुधीर घरत यांची भाजप ट्रान्सपोर्ट सेलच्या रायगड (उत्तर) जिल्हाअध्यक्षपदी नेमणूक केली आहे. या …

Read More »

उरणमध्ये महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी

उरण : वार्ताहर महाशिवरात्रीनिमित्त उरण तालुक्यातील महादेवाच्या मंदिरात शिवलिंगाची पूजा करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. ओम नम: शिवाय… या जयघोषाने उरण तालुक्यात भक्तांनी ठिकठिकाणी शंकराच्या मंदिरात जाऊन भक्तांनी शिवलिंगावर बेल, बेल फुल, नारळ, दुध वाहून यथासांग पूजा केली. तालुक्यातील घारापुरी, केगाव येथील माणकेश्वर, जेएनपीटीजवळील शेव्याचे महादेव मंदिर, देऊळवाडी येथील संगमेश्वर, …

Read More »

भाजपच्या युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी मयुरेश नेतकर यांची नियुक्ती

पनवेल : भाजपच्या युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी मयुरेश नेतकर यांची नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेतकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी युवा मोर्चा शहर अध्यक्ष चिन्मय समेळ, सुशांत मोहिते आदी उपस्थित होते. ठिकठिकाणच्या शंकराच्या मंदिरात …

Read More »

महामार्ग अधिकार्यांची कानउघाडणी

ग्रामस्थांनी बैठकीत बोलून दाखविले दोष; आमदार रविशेठ पाटील यांनी कामे वेळीच करण्याच्या दिल्या सक्त सूचना पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्ग रूंदीकरणातील कामे वेळीच पूर्ण करण्याच्या सूचना आमदार रविशेठ पाटील यांनी गुरुवारी (दि. 20) संबंधितांना दिल्या. महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम संपण्याऐवजी लांबत चालले आहे. त्यासंदर्भात आमदार रविशेठ पाटील यांनी गुरूवारी  पेण प्रांताधिकारी …

Read More »