Breaking News

Ramprahar Team

‘वाचनालय हे त्या शहराचा चेहरा’

कर्जत : प्रतिनिधी वाचनालयावरून त्या शहराची किंवा गावाची संस्कृती समजते, म्हणूनच वाचनालय हे त्या शहराचा चेहरा असतो. मराठी भाषेतील शब्दांचे अर्थ विविध आहेत. ते गुगल सर्च करून कळणार नाहीत तर त्यासाठी शब्दकोश वापरले पाहिजेत असे प्रतिपादन प्रा. संध्या शहापुरे यांनी येथे केले. कर्जतमधील लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयाचे शतक महोत्सवी वर्ष सुरू …

Read More »

मुरूड आयटीआयचे स्थलांतर

नूतन इमारतीत वर्ग भरण्यास सुरुवात मुरुड : प्रतिनिधी पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मुरुड येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सोमवारी (दि. 11) नवीन स्वतंत्र इमारतीत स्थलांतरीत झाली आहे. मुरुड आयटीआय गेल्या 15वर्षापासून शहरातील सर एस. ए. हायस्कूलच्या एका हॉलमध्ये सुरू होते. दरम्यान, शहरातील एका टेकडीवर असलेल्या दत्त मंदिराच्या परिसरात या आयटीआयची …

Read More »

नेरळमध्ये त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त रोषणाई

कर्जत : बातमीदार त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नेरळ येथील श्री कुसुमेश्वर मंदिरात मंगळवारी (दि. 12) रात्री दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. श्री समर्थ सेवा संघाच्या वतीने कुसुमेश्वर मंदिर परिसर शेकडो दिव्यांनी उजळवून टाकण्यात आला होता.  नेरळ गावातील कुसुमेश्वर मंदिर पुरातन असल्याच्या नोंदी आहेत. या मंदिरात मंगळवारी रात्री त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

रेवदंड्यात नागाला दिले जीवदान

रेवदंडा : प्रतिनिधी चौल भगवती-नवगाव येथील गजानन राऊत यांच्या घराच्या पाठिमागे असलेल्या बिळांमध्ये साप आढळल्याने परिसरातील सर्वांचीच धावपळ व घबरगुंडी उडाली. कोणीतरी चौलमधील सर्पमित्र स्वप्नील ठाकूर यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून बोलावून घेतले. स्वप्नील ठाकूर लागलीच घटनास्थळी पोचले. त्यांनी बिळाचे भेावती खड्डा मारून सापाला बाहेर काढण्यास यश मिळविले. अंदाजे साडेपाच फुट …

Read More »

मुरुड तालुक्यातील चिचघर धरण बेवारस

मुरुड : प्रतिनिधी शहरापासून 15 किमी अंतरावर असलेल्या चिचघर धरणाकडे लघुपाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष्य झाले आहे. त्यामुळे हे धरण ओसाड व असुरक्षीत झाले आहे. प्रामुख्याने शेतीला पाणी पुरविण्यासाठी 1988साली चिचघर धरणाची उभारणी करण्यात आली होती. या धरणाची गेल्या अनेक वर्षापासून डागडूजी करण्यात आलेली नाही. धरणाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे रुजलीत आहेत. …

Read More »

सरपंच निलेश म्हात्रे यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपचे कोन ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश म्हात्रे यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी शुभेच्छा दिल्या. या वेळी अर्जुन म्हात्रे, संतोष गाताडे, राहुल घरत, विजय म्हात्रे, मानसी म्हात्रे, जिनेश कांबळे, वासुदेव म्हात्रे आदी उपस्थित होते. प्रवीण म्हात्रे यांचा वाढदिवस पनवेल : …

Read More »

चेकमध्ये फेरफार करून पाच लाखांचा गंडा

पनवेल : बातमीदार पाँडिचेरी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने पाँडिचेरी येथील मेसर्स बीएचएम सर्जिकल प्रा. लि. या कंपनीला कुरियरद्वारे पाठविलेल्या 74 हजार 709 रुपयांच्या चेकची संतोष बबन पाटील नामक व्यक्तीने चोरी करून या चेकवर स्वत:चे नाव व पाच लाख 74 हजार 709 रुपयांची रक्कम टाकून ही रक्कम परस्पर काढून घेतल्याचा प्रकार …

Read More »

एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; दोघे जण जखमी

पनवेल : बातमीदार नेरूळ येथून पामबीचमार्गे पनवेल येथे जाणार्‍या तरुणांच्या मोटरसायकलला उरणच्या दिशेने जाणार्‍या भरधाव एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल चालविणारा तरुण ठार, तर अन्य दोघे जबर जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री किल्ला जंक्शन येथे घडली. या अपघातातील दोघा जखमी तरुणांवर अपोलो रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी …

Read More »

कळंबोलीत चोरीप्रकरणी दोघांना अटक

पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फायर ब्रिगेडजवळ ट्रेलर आणि त्यातील मालासह 20 लाख रुपयांची चोरी करणार्‍या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल परत मिळवण्यात आला आहे. कळंबोली फायर ब्रिगेडजवळ 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता चालक सोपान वनखेडे याने उभा करून ठेवलेला ट्रेलर (एमएच 46-एच …

Read More »

भरदिवसा घरफोडी करणार्यांच्या मुसक्या आवळल्या

सराईत गुन्हेगार अटकेत सात लाख 27 हजारांचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार दिवसाढवळ्या घरफोडी करणार्‍या सराईत गुन्हेगारांना खांदेश्वर पोलिसांनी पकडून सात लाख 27 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नवी मुंबई आयुक्तालय हद्दीत भरदिवसा घरफोडीच्या घटना घडू लगाल्याने नागरिकांत घबराट पसरली होती. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संजीवकुमार, सहआयुक्त …

Read More »