अलिबाग : प्रतिनिधी परतीच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीत 17 टक्के भातशेतीचे नुकसान झाले होते. ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसामुळे 10 टक्के नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा सुमारे 27 टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागातर्फे सुरू करण्यात …
Read More »मृत घोषित केलेल्या व्यक्तीला पत्रकार जीवन पाटील यांनी दिले जीवदान
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील भाकरवड येथील पत्रकार जीवन पाटील यांनी नुकतेच अलिबाग-पेण रस्त्यालगतच्या जेएसडब्ल्यू कंपनी जवळील कासुमाता मंदिरालगतच्या असणार्या खड्ड्यामध्ये रात्रभर नग्न अवस्थेत पडून राहिलेल्या इसमाला सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. हा इसम रात्रभर चिखलाने भरलेल्या खड्ड्यात पडून राहिला होता. त्याला उठता न आल्याने तो बाहेर येऊ शकत नव्हता. …
Read More »राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली शपथ
मुंबई : प्रतिनिधी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. मंत्रालयात आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि इंदिरा …
Read More »साहित्यिका गिरिजा कीर यांचे निधन
मुंबई : सुप्रसिद्ध साहित्यिका, कथाकथनकार व समाजसेविका गिरिजा कीर यांचे गुरुवारी (दि. 31) रोजी सायंकाळी निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 86 वर्षे होते. गेले काही महिने त्या आजारी होत्या. त्यांची शंभराहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक पुरस्कार व मानसन्मानाच्या त्या मानकरी आहेत. तळागाळातील गरजूंसाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी भरीव …
Read More »कर्जत-खालापूर विकासात नंबर 1 असेल
आमदार महेंद्र थोरवे; शहर शिवसेनेकडून सत्कार खोपोली ः प्रतिनिधी खालापूर मतदार संघात शिवसेना युतीने विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्या नंतर शिवसेनेत आनंदाचे वातावरण असल्याने खोपोली शहर शिवसेनेच्या वतीने नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी शिलफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खोपोली …
Read More »विधानसभा निवडणुकीतील यशामुळे रायगड भाजपत नवचैतन्य
रायगड जिल्हा हा शेकापचा बालेकिल्ला. या जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शेकाप विरुद्ध काँग्रेस अशाच व्हायच्या. या जिल्ह्यात भाजपचा जिल्हा परिषद सदस्यदेखील निवडून येत नव्हता, परंतु 2019च्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर (पनवेल), रवी पाटील (पेण) हे दोन आमदार निवडून आले. अपक्ष म्हणून …
Read More »शेतकर्यांना आधाराची गरज
राज्याच्या निरनिराळ्या भागांत ऐन दिवाळीच्या काळात शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्याने प्रशासकीय यंत्रणा नव्याने सरकार स्थापनेच्या औपचारिकतेकरिता खोळंबलेली आहे. दिवाळी हा खरे तर आनंदाचा, चैतन्य जागवणारा सण. महाराष्ट्रात या सणाला अगदी गोरगरिबांच्या दारी सुद्धा मिणमिळती का होईना पणती तेवताना दिसते. …
Read More »खालापुरातील विप्रास गोराडिया कारखाना तडकाफडकी बंद
250 कामगारांवर बेकारीची कुर्हाड खोपोली ़: प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायत हद्दीत असणारी विप्रास गोराडिया पोलाद उत्पादन करणारी कंपनी दिवाळी सणाच्या तोंडावरच तडकाफडकी बंद करण्यात आली. त्यामुळे सुमारे 250 कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे. विप्रास गोराडिया कारखाना गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत आहे. या कारखान्याने 2004 पासून वीजबिल भरले नाही. त्यामुळे …
Read More »जंजिरा किल्ल्यावरील गाइड व्यवस्था पूर्ववत
मुरूड : प्रतिनिधी सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. मुरूड तालुका प्रवासी संघटनेच्या प्रयत्नाने किल्ल्यावरील गाइड व्यवस्था पूर्ववत झाल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे साडेपाच लाख पर्यटक मुरूडला येतात. चारही बाजूने समुद्र व खारट पाणी असतानादेखील या किल्ल्यात दोन गोड्या पाण्याचे तलाव असल्याने …
Read More »खारभूमी कार्यालयावर संजय जांभळे यांची धडक
अधिकार्यांच्या गैरहजेरीमुळे संताप व्यक्त; कारवाईची मागणी पेण : प्रतिनिधी तालुक्यातील आमटेम येथील खारबंदिस्तीच्या कामाची बिले शेतकर्यांना अजून का अदा केली नाहीत, याचा जाब विचारण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय जांभळे यांनी बुधवारी (दि. 30) पेणमधील खारभूमी कार्यालयावर धडक दिली, मात्र तेथे सक्षम अधिकारी उपस्थित नसल्यामुळे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper