Breaking News

Ramprahar Team

सात वर्षांच्या मुलीने साकारले बालदिनाचे डुडल

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून गुरुवारी (दि. 14) साजरा करण्यात आला. या बालदिनानिमित्त गुगलनेही डुडलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे हे डुडल सात वर्षांच्या विद्यार्थिनीने साकारले. गुगलकडून बालदिनानिमित्त दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी एका स्पर्धेचे आयोजन केले जाते आणि त्यातून एक बेस्ट डुडल गुगलच्या …

Read More »

गायिका गीता माळी यांचे अपघाती निधन

नाशिक : प्रतिनिधी अमेरिकेतील कार्यक्रम आटोपून मुंबई विमानतळावरून परतत असताना नाशिक येथील प्रख्यात गायिका गीता माळी यांच्या कारला शहापूरजवळ गुरुवारी (दि. 14) सकाळी अपघात झाला. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचे पती अ‍ॅड. विजय माळी यांची प्रकृती गंभीर आहे. गीता माळी या गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेत गायनाचे कार्यक्रम करीत …

Read More »

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीचे नितीश कुमार यांच्याकडून समर्थन

पाटणा : वृत्तसंस्था कोणत्याही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा न केल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे. राज्यात कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसेल, तर कुणीही काय केले असते, असे सांगत बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी समर्थन केले आहे. पाटणातील एका कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील राजकीय स्थितीविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर …

Read More »

लग्नजल्लोषात हवेत गोळीबार; नवरदेवाच्या वडिलांचा मृत्यू

उजैन : वृत्तसंस्था उत्तर भारतात काही लग्न सोहळ्यांमध्ये हवेत गोळीबार करून आनंद व्यक्त केला जातो. सेलिब्रेशनसाठी केल्या जाणार्‍या या गोळीबारामध्ये काही वेळा निष्पाप व्यक्तीचा मृत्यू सु्द्धा होतो. उत्तर भारतात अशा अनेक घटना घडल्या आहेत. आता मध्य प्रदेशात उज्जैनमध्ये लग्नसोहळ्यात सेलिब्रेशन म्हणून केलेल्या गोळीबारात नवरदेवाच्याच वडिलांचा मृत्यू झाला. उज्जैनपासून 30 किलोमीटर …

Read More »

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक प्रा. एन. डी. पाटील यांना जाहीर

मुंबई : प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कृषी औद्योगिक समाजरचना, व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृती, कला, क्रीडा या क्षेत्रांमध्ये लक्षणीय कामगिरी करणार्‍या महाराष्ट्रातील व्यक्तीस, संस्थेला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. रोख रक्कम दोन लाख रुपये व मानपत्र असे या पारितोषिकाचे …

Read More »

आता मिशन चांद्रयान-3

नोव्हेंबर 2020चे लक्ष्य; ‘इस्रो’कडून तयारी सुरू बंगळुरू : वृत्तसंस्था पहिल्या प्रयत्नात चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे. सप्टेंबर महिन्यात चांद्रयान-2 मधील विक्रम लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले होते. या अपयशाचा अनुभव गाठीशी घेऊन आता इस्रो चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून पुन्हा प्रयत्न करणार …

Read More »

स्थानिकांचं मरण

जिल्हाधिकारी यांची रीतसर परवानगी न घेता आणि सागरी किनारा नियंत्रण नियमावलीचे (सीआरझेड) उल्लंघन करून प्रभावशाली आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनार्‍यांवर अनधिकृतपणे बंगले बांधले आहेत. त्यावर कारवाई करण्यासंदर्भातील खटल्याच्या सुनावणीच्या वेळी मुंबई उच्च न्यायालयाने यापुढे अलिबाग समुद्रकिनार्‍यावर एकही बेकायदा बंगला नको असे राज्य सरकारला बजावले आहे. हे चांगलेच झाले, परंतु …

Read More »

निष्कलंकतेचा निर्वाळा

राफेल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमावी अशी अजब मागणी देखील काँग्रेसने लावून धरली. वस्तुत: अशा चौकशीमुळे राफेल विमानाचे तंत्रज्ञान, त्यातील गोपनीय शस्त्रास्त्र सुविधा हे शत्रूच्या हातात विनासायास पडले असते. म्हणून अशाप्रकारची चौकशीची मागणी अनाठायी आहे हे कुठल्याही सामान्य बुद्धीच्या माणसासही कळेल. परंतु बालबुद्धीचे नेते आणि त्यांचे पाठिराखे यांना …

Read More »

विवाहितेची मित्राकडून हॉटेल रूममध्ये हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वाढदिवसाच्या पार्टीमध्ये वादावादी झाल्यानंतर मित्रानेच मैत्रिणीच हत्या केली. दिल्लीच्या अलीपूर भागातील ओयो हॉटेलमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. विक्की मान असे आरोपीचे नाव असून, मैत्रिणीची हत्या करुन तो पसार झाला होता. त्याला अलीपूर भागातून अटक करण्यात आली आहे. आरोपी विक्की 21 वर्षांचा आहे, तर महिलेचे वय …

Read More »

सांताक्रूझमध्ये स्कायवॉकला सरकते जिने

मुंबई : प्रतिनिधी सांताक्रूझमध्ये सरकत्या जिन्यांचा स्कायवॉकचे भूमिपूजन करण्यात आले. सांताक्रूझ पूर्वेला नेहरू रोड येथे असलेला हा मुंबईतील पहिलाच सरकत्या जिन्यांचा स्कायवॉक असेल व त्यामुळे पादचार्‍यांचा त्रास वाचणार आहे. मुंबईत अनेक ठिकाणी स्कायवॉक बांधले असले तरी ते खूप उंचावर असल्याने त्याचे जिने चढून जाणे त्रासदायक ठरते. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, …

Read More »