Breaking News

Ramprahar Reporters

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुणे : प्रतिनिधीशिवशाहीर महाराष्ट्रभूषण बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी (दि. 15) पहाटे 5च्या सुमारास निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहचविले. राजा शिवछत्रपती या ग्रंथाची …

Read More »

पनवेलमध्ये विकासाचा झंझावात

महानगरपालिकेच्या विविध कामांचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर प्रत्येक विभागात विकासकामे करून शहरांसोबत गावांचा विकास करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार्‍या तब्बल 31 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी (दि. 15) झाले.भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत …

Read More »

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रूपेश पावशेला सुवर्णपदक

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलमधील पैलवान रूपेश पावशे याने उत्तर प्रदेशातील आगरा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.स्पोर्ट्स अ‍ॅण्ड फिजिकल फिटनेस बोर्डच्या वतीने आगरा येथे आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी 85 किलो वजनी गटात रूपेश पावशे याची महाराष्ट्रातून निवड झाली होती. आपली निवड सार्थ …

Read More »

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल ः भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायगडचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर आदी …

Read More »

एसजीटी इंटरनॅशनल स्कूलचे केंद्रीय राज्यमंत्री नारायणस्वामी यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः प्रतिनिधीशिक्षण हेच जीवन आहे. शिक्षणामुळे केवळ ज्ञानच मिळते असे नव्हे; तर जगण्याचे मार्गही उलगडतात, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांनी रविवारी (दि. 14) कामोठे येथे केले. कामोठे येथील नौपाडा, तसेच चिंचपाडा येथे एसजीटी इंटरनॅशनल स्कूल सुरू झाले आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कूलचे उद्घाटन …

Read More »

एसटी कामगारांच्या आत्महत्यांना रक्तपिपासू आघाडी सरकारच जबाबदार

भाजप नेते आशिष शेलार यांचा हल्लाबोल मुंबई ः प्रतिनिधीराज्यात गेल्या सहा महिन्यांत जवळपास 40 एसटी कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांना राज्यातील रक्तपिपासू आघाडी सरकारच जबाबदार आहे, असा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. त्यांनी रविवारी (दि. 14) आंदोलक एसटी कामगारांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली. त्या …

Read More »

कामोठ्यातील मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्तछाबा फाऊंडेशनच्या वतीने कामोठे येथे 5 आणि 10 किलोमीटर मॅरेथानचे आयोजन रविवारी (दि. 14) करण्यात आले होते. ही स्पर्धा ‘रन फॉर चाईल्ड एज्युकेशन’ अर्थात बालशिक्षणसाठी जगजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून घेण्यात आली. रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानात झालेल्या या स्पर्धेस स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

पनवेल महानगरपालिकेला राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणार पुरस्कार

पनवेल : वार्ताहरपनवेल महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण 2021, स्वच्छता मित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरांसाठीचा पुरस्कार   जाहीर करण्यात आला आहे. स्वच्छ अमृत महोत्सवात नवी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात येणार आहे.नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात स्वच्छ अमृत महोत्सव शनिवारी (दि. 20 नोव्हेंबर) आयोजित करण्यात आला …

Read More »

पेण अर्बन व कर्नाळा बँक ठेवीदारांच्या ठेवी मिळवून देण्यासाठी दिल्लीचेही तख्त हलवू

आमदार महेश बालदी यांची गर्जना मोहोपाडा : रामप्रहर वृत्तपेण अर्बन बँक व कर्नाळा बँक ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी दिल्लीचेही प्रसंगी तख्त हलवू, असे प्रतिपादन उरणचे आमदार महेश बालदी यांनी केले. ते मोहोपाडा येथील पाटील हॉलमध्ये गुरुवारी (दि. 11) रसायनी विभाग आयोजित दीपावली व नूतन वर्षाच्या स्नेह मीलन समारंभात उपस्थित …

Read More »

भाजप किसान मोर्चा कर्जत तालुका अध्यक्षपदी शिरीष कदम

कर्जत : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष किसान मोर्चा कर्जत तालुक्याची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. या नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम गुरुवारी (दि. 11) झाला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या.भाजप किसान मोर्चाच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी शिरीष कदम, …

Read More »