खालापूरमध्ये पोलिसांमुळे संघर्ष टळला खोपोली ः प्रतिनिधी नगरपंचायत निवडणूक निकालानंतर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी घरात घुसण्याची केलेली चिथावणीखोर भाषा खालापूरच्या संस्कृतीत बसत नसल्याचे सांगत शेकापच्या माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम यांनी आमदारांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. खालापूर नगरपंचायत निवडणुकीचा निकाल बुधवारी लागला. यामध्ये शिवसेनेच्या सर्वाधिक आठ जागा आल्यानंतर खालापूरमध्ये …
Read More »काळुंद्रे ओएनजीसी येथील घरांवर अन्यायकारी कारवाई केल्यास आंदोलन; भाजपचा इशारा
पनवेल : रामप्रहर वृत्त काळुंद्रे ओएनजीसी येथील रेल्वे हद्दीलगतच्या घरांचे जोपर्यंत सर्वेक्षण व त्यांच्या पुनर्वसनाचा योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत पुढील कुठलीही कार्यवाही करू नये, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर तसेच भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी रेल्वेकडे केली आहे, तसेच अन्यायकारी कारवाई केल्यास आंदोलनाचा …
Read More »राज्यातील शाळा पुन्हा होणार सुरू
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या 20 दिवसांपासून बंद असलेली शाळा-महाविद्यालये येत्या सोमवार (दि. 24)पासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थी, पालकांसह शिक्षक, शिक्षणतज्ज्ञांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. शालेय …
Read More »नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी पनवेल महानगरपालिका प्रयत्नशील : सभागृह नेते परेश ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत सिडकोच्या जाचातून सुटका होऊन पनवेल महानगरपालिकेच्या उत्कृष्ट दर्जाचा सेवांचा लाभ नागरिकांना व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 18) बैठकीत बोलताना दिली. पनवेल महापालिकेकडे सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या सुविधांसंदर्भात मंगळवारी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत …
Read More »मोर्बेच्या उपसरपंच प्रभावती नावडेकर स्वगृही भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील मोर्बे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रभावती परशुराम नावडेकर यांनी बुधवारी (दि. 19) शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पक्षात स्वगृही प्रवेश केला. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नावडेकर यांचे पक्षात स्वागत केले. मोर्बे येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष …
Read More »नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची पनवेल भाजपची मागणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी पनवेल भाजपच्या वतीने तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली युवा पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने पनवेल पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ …
Read More »अटल करंडक एकांकिका स्पर्धेची 28 ते 30 जानेवारीदरम्यान पनवेलमध्ये महाअंतिम फेरी
सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे यांची लाभणार उपस्थिती सुप्रसिद्ध अभिनेते ओमकार भोजने ब्रँड अॅम्बेसिडर पनवेल : राप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या …
Read More »नगरपंचायत निवडणुक : रायगड जिल्ह्यात संमिश्र निकाल
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात झालेल्या सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत माणगाव आणि तळ्यामध्ये सत्तापालट झाला आहे. खालापूरमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून पालीत पहिल्या वेळी आघाडीला सत्ता मिळाली आहे. अन्य पोलादपूर, म्हसळ्यात आधीच्याच पक्षांनी आपली सत्ता कायम राखली आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या माणगाव …
Read More »नगरपंचायत निवडणुकीत भाजप नं. 1; राज्यात सर्वाधिक जागी ‘कमळ’ फुलले
मुंबई : प्रतिनिधी राज्यात नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल बुधवारी (दि. 19) जाहीर झाले. हाती आलेल्या कलानुसार सर्वाधिक जागा जिंकून भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी म्हटले आहे की, …
Read More »नगरपंचायतींसाठी शांततेत मतदान
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या 21 जागांसाठी मंगळवारी (दि. 18) मतदानप्रक्रिया झाली. मतदारांनी शांततेत आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत 60 उमेदवार आपले राजकीय भवितव्य अजमावत असून 19 जानेवारीला मतमोजणी होईल. जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर महिन्यात झाली, मात्र ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे या सहा नगरपंचायतींमधील ओबीसी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper