Breaking News

Ramprahar Reporters

मशाल मोर्चाचा सर्वत्र एल्गार

विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याची एकमुखी मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (दि. 9) उरण तालुक्यातील जासई येथे सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला होता. तेथे मुख्य मशालीने प्रज्वलित करण्यात आलेल्या मशाली सायंकाळी रायगड जिल्ह्यासह …

Read More »

अकरावीची सीईटी रद्द

उच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका मुंबई : प्रतिनिधीइयत्ता अकरावीची सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेशी खेळ करता येणार नाही, प्रवेश प्रक्रिया बदलता येणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने ठाकरे सरकारला सुनावले आहे. हा निर्णय म्हणजे सरकारला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. इयत्ता दहावीच्या …

Read More »

पनवेलमध्ये निघाली मशाल रॅली

पनवेल ः प्रतिनिधीनवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी उरण तालुक्यातील जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात आल्यानंतर सायंकाळी पनवेल शहर परिसरात महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दुचाकींवरून मशाल रॅली काढण्यात आली होती. या जनजागृतीपर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.पनवेलमधील छत्रपती शिवाजी …

Read More »

तो पर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही !

१६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन  पनवेल : रामप्रहर वृत्तजो पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले जात नाही, तो पर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, असा ईशारा आज जासई येथे झालेल्या मशाल मोर्चातून राज्य सरकारला देण्यात आला. १५ ऑगस्ट हि डेडलाईन आहे, या तारखेपर्यंत राज्य …

Read More »

तुम्ही आम्ही कप-बशा धुणारे!

मंत्री विजय वडेट्टीवारांचा ठाकरे सरकारला घरचा अहेर जालना ः प्रतिनिधीसत्ता आली तर तुम्ही आम्ही कोण तर कप-बशा धुणारे! चहा पिणारे नाही. त्यांनी खावा मटनाचा रस्सा आणि तुम्हाला भजा! आपण भजांवर खुश. अरे तो मटन खातोय आणि तुम्ही भजांवर खुश. तुम्ही आम्ही कुठे आहोत याचा विचारच आपण करीत नाही. ज्या दिवशी …

Read More »

देशात येत्या तीन वर्षांत अमेरिकेसारखे रस्ते

केंद्रीय मंत्री गडकरींची ग्वाही अहमदाबाद ः वृत्तसंस्थाआगामी तीन वर्षांत भारतामध्ये अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते पाहायला मिळतील, असे केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते अहमदाबाद येथील कार्यक्रमात बोलत होते. देशभरात सध्या रस्तेनिर्मितीचे काम वेगाने सुरू आहे. सध्याच्या घडीला भारतात दररोज 38 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होत आहेत. यापूर्वी …

Read More »

‘दिबां’च्या नावाचा अंगार गावागावात पेटणार!

मशाल मोर्चासाठी भूमिपुत्र सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी ऑगस्ट क्रांतिदिनी अर्थात सोमवारी (दि. 9) सकाळी 10 वाजता ‘दिबां’च्या जासई (ता. उरण) या जन्मगावापासून ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील गावागावात मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर …

Read More »

टोकियो ऑलिम्पिकमधील भारताच्या यशासाठी अंजू जॉर्जने दिले मोदी सरकारला श्रेय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाटोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत सर्वात उत्तम कामगिरी केली असून एकूण सात पदकांची कमाई केली आहे. याआधी भारताने 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदके पटकाविली होती. या वेळी भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदक जिंकत इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली. दरम्यान, भारताची माजी खेळाडू अंजू बॉबी जॉर्जने मोदी …

Read More »

‘गोल्डन बॉय’ नीरजवर बक्षिसांचा वर्षाव

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. या सुवर्ण कामगिरीबद्दल त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरूच आहे. आता आयपीएलमधील धोनीच्या नेतृत्वाखालील संघ चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) त्याचे कौतुक करीत बक्षीस जाहीर केले आहे.सीएसकेकडून नीरज चोप्राला एक कोटी रुपये देण्यात येतील. सीएसकेच्या प्रवक्त्याने सांगितले, आम्हाला …

Read More »

लोकल प्रवासासाठी भाजप आक्रमक

मुंबई, ठाण्यात आंदोलन मुंबई, ठाणे : प्रतिनिधीसर्व सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू व्हावी या मागणीसाठी आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक निर्बंध शिथिल झाले आहेत, मात्र मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल ट्रेन अद्यापही बंद आहे. त्यामुळे मुंबई व आसपासच्या शहरातील नोकरदारांची पुरती कोंडी झाली आहे. राज्य …

Read More »