पनवेल : प्रतिनिधीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून ढोल-ताशा, लेझीम, चित्ररथांसह भव्य मिरवणुकीचे आयोजन सोमवारी (दि. 14) करण्यात आले. त्याचबरोबर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांसारख्या विविध उपक्रम आयोजित करून डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.प्रारंभी सकाळी साडेसात वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला …
Read More »सेवेची हमी देण्यात पनवेल महापालिका अग्रेसर -आमदार प्रशांत ठाकूर
विविध विकासकामांचा शुभारंभ; रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायमच ई-गव्हनर्सला प्रोत्साहन दिले आहे. त्या दृष्टीने इज ऑफ डूइंग बिझनेसला चालना देण्यासाठी पनवेल कनेक्ट अॅपच्या माध्यमातून येथील महापालिका नागरिकांना विविध सुविधा ऑनलाईन देत आहे. सेवेची हमी देण्याच्या दृष्टीने महापालिकेने अग्रेसर राहून उत्तम पाऊल उचलले, …
Read More »सातारा काशीळ येथील शाळा इमारतीचे लोकार्पण आणि माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
मान्यवरांची लाभली सोहळ्यास उपस्थिती सातारा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या सातारा तालुक्यातील काशीळ येथील यशवंत हायस्कूलच्या जीर्णोद्धारीत इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन रविवारी (दि. 13) संस्थेचे सचिव विकास देशमुख, संघटक डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.उद्योजक अविनाश भोसले यांच्या …
Read More »मनोजकुमारची सर्वोत्तम कलाकृती ‘शोर’
मनोजकुमारची वैशिष्ट्य सांगावीत तेवढी थोडीच. (जन्म 24 जुलै 1937), मृत्यू 4 एप्रिल 2025) अभिनेता, लेखक, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक व संकलन अशा चौफेर भूमिका साकारत आपली कारकीर्द घडवण्यात यशस्वी ठरलेला सिनेमावाला. पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपटातून त्यांनी देशभक्तीची भावना जागवली ती एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट. त्यासह मनोजकुमारची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील.मला मनोजकुमारची …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रपुरते मर्यादित ठेवू नका -ना. अमित शाह
शिवपुण्यतिथीनिमित्त दुर्गराज रायगडवर अभिवादन महाड : प्रतिनिधीगनिमांमुळे गुलामगिरीत गेलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बदलण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. मी लोकांना हात जोडून विनंती करतो की, शिवरायांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका. देश आणि सगळे जग शिवरायांपासून प्रेरणा घेऊ शकते, असे उद्गार केंद्रीय …
Read More »आदिवासींच्या पुनर्वसनासाठी आता मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
घरांसंदर्भात धोरणात्मक आणि सकारात्मक निर्णय नक्कीच होईल -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासींच्या पुनर्वसनासाठी सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पनवेल, उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रातील आदिवासी बांधवांच्या घरांसंदर्भात धोरणात्मक आणि सकारात्मक निर्णय नक्कीच होईल आणि यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.ते म्हणाले …
Read More »कामोठे येथील रामशेठ ठाकूर विद्यालयाला आयएसओ मानांकन
पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. विद्यालयाच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले. दरम्यान, या यशाबद्दल संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले.विविध उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असणार्या विद्यालयाच्या शिरपेचात आयएसओ …
Read More »खालापूर येथे हिंदू गर्जना मोर्चा; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले नेतृत्व
खोपोली, चौक : प्रतिनिधीगोमातेचे रक्षण व्हावे, अवैध कत्तलखाने बंद करावेत, आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जावी तसेच गोरक्षक व पोलिसांच्या सुरक्षेची मागणी करीत सकल हिंदू समाजाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 9) खालापूर तहसील कार्यालयावर हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला होता. समाजकंटकांवर पोलीस आणि प्रशासनाची जरब बसली तरच …
Read More »थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीला मिळणार एक लाख रुपयांचे बक्षीस पनवेल : रामप्रहर वृत्तकष्टकर्यांचे द्रष्टे नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 37व्या पुण्यतिथी निमित्ताने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत पनवेल तालुकास्तरीय स्व. …
Read More »आज ड्रीमलॅन्ड पंचावन्न वर्षांचे झाले असते…
आजच्या ऑनलाईन, ओटीटी, वीकेंड ट्रीप पिढीला जुन्या काळातील सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृह संस्कृतीबद्दल ओढ नसावी. आता तर मल्टीप्लेक्समधील फोर डी सुविधा आलिशान सीटवर बसल्या बसल्या एक वेगळाच अनुभव देते (त्यासाठी आजची युवा पिढी मल्टीप्लेक्सचे महागडे तिकीट ऑनलाईन काढण्यास तत्पर आहे) एक रसिक पिढी मात्र सिंगल स्क्रीन थिएटर्सबाहेर तिकीटासाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper