Breaking News

Ramprahar Reporters

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. कौटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतुन तिला जिवंत जाळून फरार झालेल्या पतीला पनवेल शहर पोलिसांनी 33 वर्षानंतर अटक केली आहे. बाबु गुडगीराम काळे (वय 70) असे या आरोपी पतीचे नाव आहे. आरोपीने 1991मध्ये …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची बुधवारपासून रायगड केंद्राची प्राथमिक फेरी

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा 11वे वर्ष असून त्या अंतर्गत रायगड केंद्राची प्राथमिक फेरी 25 डिसेंबर रोजी, तसेच …

Read More »

पनवेल, उरणमधील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मार्गी लावणार

महाप्रबंधक धरमवीर मीना यांचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल, उरणमधील रेल्वेशी संबंधित समस्या 31 जानेवारी 2025पर्यंत मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महाप्रबंधक धरमवीर मीना यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी विधानसभा निवडणुकीत उरण येथील सभेत पनवेल, उरणमधील रेल्वेच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी महाप्रबंधक धरमवीर मीना यांच्यासोबत बैठक आयोजित …

Read More »

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील रामबाग या अतिसुंदर उद्यानाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा हजारो नागरिकांच्या साक्षीने रविवारी (दि. 22) सायंकाळी मोठ्या उत्साहात साजरा झाला. नयनरम्य वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, उत्तम नियोजन आणि लहानग्यांपासून युवक, महिला, ज्येष्ठांच्या उपस्थितीने रामबाग …

Read More »

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथे उभारण्यात आलेल्या ’रामबाग’ या निसर्गरम्य उद्यानाच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त रविवारी (दि. 22) श्री सत्यनारायण महापूजा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल विधासभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत …

Read More »

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत अनधिकृत आठवडा बाजार व हातगाड्यांच्या रूपाने ‘नवा अनधिकृत व्यापार जिहाद’ पुकारण्यात आला आहे, या अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा, अशी जोरदार मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. …

Read More »

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. या घटनेत तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये तीन नौदल कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. तसेच या बोटमधून 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बचावकार्यात सुरूच आहे. …

Read More »

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना प्रकल्प विकासाच्या दृष्टिकोनातून गेमचेंजर होऊ शकतो, मात्र त्यासाठी सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पुढील पाऊल उचलावे, त्याचबरोबर शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या नोटिसा तत्काळ थांबवाव्यात तसेच शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई होऊ नये, अशी आग्रही मागणी …

Read More »

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ लाटच जणू आली आहे. अबब म्हणावे अशीच अद्भूत व चमत्कारिक क्रेझ आहे. ही केवळ चित्रपटाची क्रेझ नाही तर अनेकांना पुष्पा 2 मध्ये जणू आपला तारणहार दिसला. अनेक सामाजिक राजकीय गोष्टींनी पिचून गेलेला समाज या प्रतिक्रियेतून …

Read More »

पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी

सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे पुढील 20 वर्षांचे पाण्याचे नियोजन असलेली न्हावा शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा 3ची आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिका आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह पाणीपुरवठा अधिकार्‍यांसमवेत शुक्रवारी (दि. 13) पाहणी केली. या वेळी …

Read More »