पनवेल : बातमीदार – पनवेल तालुक्यातील उलवे, करंजाडे, देवद, सुकापूर येथील परिसरामध्ये प्रत्येकी एक एक कोरोना विषाणूबाधित रुग्ण राहत असलेल्या इमारती कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन)म्हणून घोषित केल्या आहेत. यामध्ये उलवे येथील सेक्टर-19, प्लॉट नं.101, भाग्यश्री को.ऑ.हौ.सो., करंजाडे येथील सेक्टर-2, प्लॉट नं.26, जय शिवम …
Read More »घणसोलीतील विजेचा लपंडाव थांबवा
आमदार गणेश नाईक यांचे महावितरणला पत्र नवी मुंबई : बातमीदार – घणसोलीतील विजेचा लपंडाव थांबवा अशा सुचनेचे पत्र आमदार गणेश नाईक यांनी विद्युत विभागाला दिले आहे. जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या, सर्व धोके तत्काळ लक्षात घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्यांनी पत्रात केली आहे. घणसोली परिसरांमध्ये हल्ली वीज खंडित होण्याचे …
Read More »पोलिसांची कोविड-19 तपासणी
पनवेल : वार्ताहर – चार दिवसांपूर्वी पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील तीन कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने आता परिमंडळ दोन अंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांची टप्पाटप्प्याने कोविड तपासणी सुरू करण्यात आली आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्या एका कर्मचार्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला उपचारार्थ दाखल …
Read More »लॉकडाऊनमध्ये विनाकारण गर्दी न करता घरीच रहा!
पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांचे आवाहन मोहोपाडा : प्रतिनिधी – लॉकडाऊन शिथिलतेचा फायदा घेऊन विनाकारण न भटकता बाजारपेठेत चक्रा मारता वाहन फिरविणार्यांवरही कारवाई होताना दिसत आहे. यासाठी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी लॉकडाऊन काळात नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक करणाने नटलेला परिसर असून परिसरात मोहोपाडा, …
Read More »उरणमध्ये मान्सूनपूर्व कामांची लगबग
नगर परिषदेकडून धोकादायक फांद्यांची छाटणी उरण : वार्ताहर – कोरोना प्रतिबंधाच्या कामात गुंतली असली तरी पावसाळापूर्व कामांनाही प्राधान्य देऊन उरण नगरपरिषदेने दरवर्षीप्रमाणे मान्सून पूर्व कामाला सुरुवात केली आहे. उरण नगरपरिषद हददीतील, शहरातील धोकादायक झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटनीचे काम नुकतेच सुरु करण्यात आले आहे. पावसाळ्यात मुसळधार पाऊस, वारा या पासून झाडे …
Read More »भारतीय जनता मजदूर ट्रेड युनियन सहसचिवपदी राहुल जाधव यांची नियुक्ती
खालापूर, खोपोली ः प्रतिनिधी – भारतीय जनता मजदूर ट्रेड युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष शांत प्रकाश जाटव यांच्या संमतीने भारतीय जनता मजदूर ट्रेड युनियन महाराष्ट्र प्रदेश सहसचिवपदी भाजपचे युवा नेते राहुल सखाराम जाधव यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजू चौहान यांनी शुक्रवारी (दि. 15) पत्राद्वारे जाहीर केली. राहुल जाधव यांनी भाजपचे उमेदवार …
Read More »शेतीकामासाठी यंत्रांचा आधार
झटपट कामे करण्यास शेतकर्यांची पसंती माणगाव ः प्रतिनिधी – कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनला 50 दिवसांहून अधिक दिवसांचा काळ लोटला आहे. या दिवसांत शेतीसह अनेक कामे रखडली आहेत.शेतीकामांसाठी शेतकर्यांना सामाजिक दुरावा राखत काम करण्याची मुभा मिळाली आहे, मात्र पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे लॉकडाऊनमुळे रखडली आहेत. त्या अनुषंगाने शेतकर्यांकडून …
Read More »महिला वकिलाचा विनयभंग; सात जणांवर गुन्हा दाखल
पाली ः प्रतिनिधी – सुधागड तालुक्यातील महिला वकिलाचा घराच्या वादातून हात पिळत, मारहाण व अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग करण्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 12) शिळोशी येथे घडली. या महिला वकील सध्या मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत आहेत. या प्रकरणी संबंधितांना तत्काळ अटक न केल्यास पोलीस स्थानकासमोर आत्मदहन …
Read More »महाड बाजारपेठेत अग्नितांडव; लाखोंचे नुकसान
महाड ः प्रतिनिधी – महाड बाजारपेठेतील चामुंडा एनएक्स या कापड दुकानाला रविवारी (दि. 17) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याने दुकानातील मालासह संपूर्ण इमारत जळून खाक झाली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, नगर परिषद, महाड औद्योगिक वसाहत अग्निशमन पथकाने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली. आगीचे …
Read More »कोरोनाशी दोन हात!
सर्वत्र आपली दहशत निर्माण केलेल्या कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने भर पडून काहींचा दुर्दैवी मृत्यू होत असताना दुसरीकडे या महामारीवर यशस्वीपणे मात करणार्यांचेही प्रमाण वाढू लागल्याचे पहावयास मिळत आहे. रुग्ण बरे होणे ही आताच्या असुरक्षित व भीतीयुक्त अशा वातावरणात दिलासादायक बाब म्हटली पाहिजे. काही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper