Breaking News

Pravin Gaikar

मोहोपाडा व्यापारी असोसिएशनतर्फे अत्यावश्यक सेवा देणार्यांची थर्मल तपासणी

मोहोपाडा : प्रतिनिधी – कोरोना विषाणूची महामारी शहरांपासून वाड्या-पाड्यांपर्यंत पोहचू नये, म्हणून जिल्हाबंदी-गावबंदी देखील करण्यात आली आहे. पोलीस यंत्रणादेखील 144 कलमाखाली संचारबंदीचे काम काटेकोरपणे चोख बजावत आहेत. ग्रामस्थ, कामगार कर्मचारी वर्ग देखील घरीच बसून सुरक्षा कवचात आहेत. याकरिता मोहोपाडा व्यापारी असोसिएशनच्या वतीने अत्यावश्यक सेवा देणार्‍या नागरिकांच्या शरीर तापमानाची तपासणी केली. …

Read More »

कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचा रक्तदानात पुढाकार

पनवेल : रामप्रहर वृत्त – लॉकडाऊन परिस्थितीत अनेक रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव वास्कर आणि सदस्यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचातीच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात तब्बल 90 रक्तदात्यांनी रक्तदान करून योगदान दिले. सद्यपरिस्थिती लक्षात घेता …

Read More »

दोन तासांसाठी विद्युत पुरवठा होणार खंडित

नागरिकांनी सहकार्य करण्याचे महावितरणकडून आवाहन पनवेल : वार्ताहर – पनवेल शहर व परिसरात गेल्या तीन ते चार दिवसापासून वीज वाहिन्यांच्या जवळील झाडे वाढल्यामुळे विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यासाठी उपाय योजना म्हणून दररोज 10 ते 12 या वेळेत विद्युत पुरवठा खंडित करून सदर झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम करण्यात येणार आहे. …

Read More »

पोलिसांच्या सतर्कतेसह जनजागृतीचेे कौतुक

पनवेल : वार्ताहर – कोविड 19 कोरोना विषाणू या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव पनवेल शहर परिसरात वाढण्याची शक्यता निर्माण झाली असताना पनवेल शहर पोलिसांनी सतर्कतेने केलेल्या विविध जनजागृती उपक्रमाचे तसेच नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामानाने पनवेल महानगरपालिकेने तसेच तहसील कार्यालयाने वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानुसार नियोजन करणे गरजेचे असतानाही पनवेल शहर पोलिसांच्या …

Read More »

कोरोनाचा फटका : आंबा व्यापारी हवालदिल

खरेदीदारच येत नसल्याने फळ मार्केट बंद नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा, मसाला, भाजीपाला व दाणा मार्केट बुधवारपासून सुरू झाले. एपीएमसीमधून सर्वाधिक माल हा मुंबईत पाठवला जातो. मात्र सध्या मुंबईच कोरोनामुळे लॉकडाऊन झाली असल्याने मालाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक गरज म्हणून …

Read More »

पावसाळ्यापूर्वीची देखभाल, दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करा

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश अलिबाग : प्रतिनिधी – पावसाळ्यापूर्वी करावयाच्या अत्यावश्यक कामांच्या देखभाल दुरुस्तीची कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी तातडीने पूर्ण करावीत, असे आदेश  जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. मान्सूनपूर्व तयारी अंतर्गत नालेसफाई, रस्ते, पूल दुरुस्ती, रस्त्यांच्या साईडपट्टींचा भराव करणे, शाळांच्या खोल्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन, विहिरींची दुरुस्ती, …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

रोहे : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 14) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती जगभरातील आंबेडकरी अनुयायांनी आपापल्या घरात साजरी केली. बौद्ध समाज युवा संघ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शासकीय, पोलीस, आरोग्य, सफाई व इतर सर्व निगडित कर्मचार्‍यांना जयंतीनिमित्त बिस्कीट पुडे, पाणी बॉटल्सचे वाटप करण्यात आले. या वेळी बौद्ध …

Read More »

उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटांचा विलगीकरण कक्ष

जेएसडब्ल्यू कंपनीचा पुढाकार पेण ः प्रतिनिधी – पनवेलमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे हाकेवर असलेल्या पेणमध्ये खबरदारी घेण्यात येत आहे, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पेणमध्ये गोरगरीब जनतेसाठी सर्व सुविधा पुरविणारे एकही रुग्णालय नसल्याची खंत होती. त्यासाठी पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीने पुढाकार घेऊन पेणमधील उपजिल्हा रुग्णालय कोरोनाचा सामना करण्यासाठी सोयीसुविधांनी सज्ज केले …

Read More »

पनवेल मनपाच्या कंत्राटी, कायम कर्मचार्यांना विमा कवच द्यावे

नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पनवेल मनपा क्षेत्रातील कंत्राटी व कायम कर्मचार्‍यांना विमा कवच देण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्तांकडे निवेदन  दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कोरोना …

Read More »

वांद्रे येथील मजुरांच्या उद्रेकाला राज्य सरकारच जबाबदार -फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी – आम्हाला गावी जाऊ द्या, अशी मागणी करत परराज्यातील शेकडो मजुरांनी मंगळवारी वांद्रे स्टेशनवर धडक दिल्याने सर्वच यंत्रणा हादरल्या आहेत. देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याच्या घोषणेनंतर हा उद्रेक झाल्याने त्यावर आणखीच चिंता व्यक्त होत आहे. यावरून आता राजकारणही तापू लागले असून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »