नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : कोकण विभागातील जनतेला आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कोरोनासंदर्भात कोकण विभागात शासकीय पातळीवर सर्व प्रकारच्या यंत्रणा कार्यान्वित झाल्या असून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा काम करीत असल्याची माहिती विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या काही दिवसांत कोकण …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीसही दक्ष
पनवेल ः रामप्रहर वृत्त : देशभर उद्रेक माजवलेल्या कोरोनाचा सर्वांनीच धसका घेतला आहे. शाळा, कॉलेजेस, मॉल्स तसेच विविध कार्यक्रमही शासनातर्फे बंद ठेवण्यात आले आहेत. असे असले तरी 24 तास कर्तव्य बजावत असणार्या पोलिसांना स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच घ्यावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलिसांनीही सतर्कता दर्शविली आहे. पोलीस ठाण्यात …
Read More »महाडमध्ये कोरोनटाईन सेंटर कार्यान्वित; चार जण निरीक्षणाखाली
महाड : प्रतिनिधी : कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये कोरोनटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी देशात आणि देशाबाहेर पर्यटनासाठी जाऊन आलेल्या चार जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. कोरोना व्हायरसमुळे महाडमधील सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, शाळा तसेच किल्ले …
Read More »माची प्रबळगडावर पर्यटकांना प्रवेशबंदी
पनवेल ः बातमीदार : जगभरासह महाराष्ट्रतदेखील कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. या विषाणूंचा संसर्ग वाढू नये म्हणून माची प्रबळ गड येथे पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत येथे जाण्यास संयुक्त वन व्यवस्थापन समितीने बंदी घातली आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कॅम्पिंगसाठी प्रबळ माची उत्तम जागा …
Read More »नेरूळमध्ये मोफत मास्कवाटप
नवी मुंबई ः प्रतिनिधी : कोरोना या महाभयंकर रोगाने जगभर थैमान घातले आहे. राज्यात कोरोनापासून बचाव करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत भीम महोत्सवचे प्रणेते राजगृह सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि बांधकाम व्यावसायिक शरद (भाऊ) सरवदे यांनी आपला वाढदिवस थाटामाटात साजरा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जावा, …
Read More »मास्क, हातमोजांची सक्ती करावी -नगरसेवक विजय चिपळेकर
पनवेल ः वार्ताहर : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना व्हायरसमुळे नगदी नोटा, वस्तू यांची आदान-प्रदान होणार्या ठिकाणी मास्क व हातमोजे वापरण्याची सक्ती करावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात नगरसेवक विजय चिपळेकर यांनी म्हटले आहे की, महानगरपालिका क्षेत्रात येणारे …
Read More »कोरोना रोखण्यासाठी पोलिसांची जनजागृती
पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल ः वार्ताहर : कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलिसांनी वपोनि. अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारची जनजागृती मोहीम सुरू केली असून या मोहिमेला पनवेलकरांनीसुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहकार्य केले. वपोनि. अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, विजय तायडे यांनी हद्दीतील सर्व मशिदी, मंदिरांचे मौलाना …
Read More »पारंपरिक भांडी व्यवसायाला घरघर
महाडमधील पारंपरिक भांडी व्यवसाय आता हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी महाडमध्ये भांडी घडवण्याचा मोठा व्यापार होता तो केवळ चाळीस ते पंचेचाळीस कारखान्यांवर येवून ठेपला आहे. या व्यवसायात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने तरुण पिढी यामधून बाहेर पडू लागली आहे. महाड हे पूर्वीचे बंदर असलेले व्यापारी केंद्र. बौद्ध काळापासून …
Read More »अग्निपरीक्षा टळली इतकेच
भाजपकडे 106 एवढे संख्याबळ आताच आहे. त्यात पुढे वाढच होईल. अशी परिस्थिती असताना देखील मुख्यमंत्री कमलनाथ यांनी लोकशाहीची कुठलीही तमा न बाळगता खुर्चीला चिकटून राहणे पसंत केले. आपले सरकार अल्पमतात आल्याचे लक्षात घेऊन त्यांनी राजीनामा दिला असता तर लोकशाहीची मूल्ये खचितच पाळली गेली असती. परंतु काँग्रेसच्या संस्कृतीत असा राजकीय उमदेपणा …
Read More »उलवे नोड येथे महिला दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त : उलवे नोड येथे भारतीय जनता पक्ष आणि उलवा तमिळ संघ यांच्या वतीने शनिवारी (दि. 14) महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास पनवेल पंचायत समिती सदस्या तथा भाजपच्या पनवेल तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा रत्नप्रभा घरत याची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper