Breaking News

Pravin Gaikar

माथेरानमध्ये रेशनिंगसाठी नागरिकांची लगबग

कर्जत : बातमीदार : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शहरे लॉकडाऊन केली आहेत. शहरांमध्ये संचारबंदी केली आहे.त्यानुसार माथेरानमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत, पण सरकारमान्य रास्त भाव दुकान सुरू असल्याने नागरिकांनी रेशन दुकानासमोर एकाच गर्दी केली. या वेळी पोलिसांच्या व व्यापारी फेडरेशनच्या सतर्कतेमुळे गर्दी हटवून प्रत्येकाला धान्य …

Read More »

अत्यावश्यक सेवा देणार्यांसाठी मुरूड पोलिसांकडून थाळी व घंटानाद

मुरूड : प्रतिनिधी : कोरोना रुग्णांना 24 तास सेवा देणार्‍या डॉक्टर, नर्स व सामाजिक संघटना अहोरात्र प्रयत्न करीत असून त्यांच्या कार्याची जाणीव ठेवत व त्यांना कामात उत्तेजना व प्रेरणा मिळण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे रविवारी (दि. 22) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुरूड पोलीस ठाण्यामार्फत संपूर्ण मुरूड शहरात थाळी …

Read More »

टीबीची लक्षणे आणि उपचार

सलग दोन आठवड्यांहून अधिक काळ खोकला असेल तर अनेकांच्या मनात भीती निर्माण होते की त्यांना टीबी अर्थात क्षयरोग तरी झाला नाही ना…आज जागतिक क्षयरोग विरोधी दिन आहे. एका अहवालानुसार राज्यात प्रत्येक वर्षी साधारणपणे एक लाख 90 हजार क्षयरुग्णांची नोंद होते. केवळ खोकला नव्हे, तर अन्य काही अशी लक्षणे आहेत ज्यामुळे …

Read More »

लॉकडाऊनच्या आदेशाकडे दुर्लक्ष; नागोठण्यात पोलिसांची कारवाई

नागोठणे : प्रतिनिधी : येथील किराणा, मेडिकल तसेच दूध विक्रेत्यांव्यतिरिक्त अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनी शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत सोमवारी (दि. 23) आपले व्यवसाय चालू केले होते, मात्र सकाळी पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात करून अनेकांचे दरवाजे बंद केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 31 मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊन केला असल्याची घोषणा करण्यात …

Read More »

अनावश्यक गर्दीवर नजर; खोपोलीत निर्बंध पाळण्यासाठी सूचना व आवाहन

खोपोली : प्रतिनिधी : कोरोनाला रोखण्यासाठी रविवारी (दि. 22) जनता कर्फ्यूला खोपोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, मात्र दुसर्‍या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 12च्या दरम्यान खोपोली बाजारात लोकांची अनावश्यक गर्दी झाल्याचे चित्र होते. यातील फारच कमी लोक अतिमहत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडले होते, तर बहुतांश नागरिक काय चालले आहे? बाजारातील …

Read More »

जनतेचे अभिनंदन व आभार!

महाभयंकर कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला सुमारे 130 कोटी लोकांनी बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खरंतर यातून देशवासीयांचेच जीवन सुरक्षित होणार आहे. तरीही देशाच्या दृष्टीने आवश्यक असलेली बाब कटाक्षाने पाळून भारतीयांनी संपूर्ण जगाला नवा आदर्श घालून दिला आहे. चीनमधून पसरलेला …

Read More »

स्वागतार्ह नियुक्ती

दिवंगत इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 साली दिल्लीमध्ये उसळलेल्या दंगलींबद्दल राजीव गांधी यांना निर्दोष प्रमाणपत्र देणारे न्या. रंगनाथ मिश्रा यांना राज्यसभेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले होते. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. राज्यसभेवरील नियुक्ती ही राजकीयच असते. त्यामुळे त्याबाबत राजकारण होणे हे ओघानेच आले. परंतु मुद्दा आहे तो उत्कृष्ट गुणवत्तेचा देशासाठी …

Read More »

भूखंड वापर बदल, अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकाबाबत सिडकोचे नवीन धोरण

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा : सिडको संचालक मंडळाच्या फेब्रुवारी 2020मध्ये पार पडलेल्या बैठकीत भूखंड वापर बदल व अतिरिक्त चटई क्षेत्र देण्याबाबतचे व्यापक धोरण ठरविण्यात आले असून त्यानुसार भाडेपट्टा अधिमूल्य आकारून विविध वापरासाठी दिलेल्या भूखंडांना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक देण्यासह भूखंड वापर बदल करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. नवी मुंबईसाठीचे …

Read More »

पनवेल मनपा स्थायी समितीची सभा पुन्हा स्थगित

पनवेल : प्रतिनिधी : पनवेल महापालिकेचा 2019चा सुधारित व 2020-21च्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी  मंगळवारी (दि. 17) झालेली स्थायी समितीची सभा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली. या वेळीही संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. स्थायी समितीसमोर 6 मार्चला सादर करण्यात आलेल्या महापालिकेच्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी 12 मार्च रोजी स्थायी समितीची सभा …

Read More »

कोरोना व्हायरससंदर्भात नवी मुंबईत डॉक्टरांचे प्रशिक्षण

नवी मुंबई : बातमीदार : नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग व ‘इ’प्रभाग समिती सदस्य डॉ. प्रतीक प्रभाकर तांबे यांच्या पुढाकाराने शनिवारी (दि. 14) हिम्पाम, नवी मुंबई व निमा, नवी मुंबई या वैद्यकीय संघटनेच्या सर्व डॉक्टरांचे प्रशिक्षण नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात झाले. कोरोनासंदर्भात नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नवी …

Read More »