Breaking News

Pravin Gaikar

रूचिता लोंढे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मधील पोटनिवडणुकीत भाजप, आरपीआय युतीच्या उमेदवार रूचिता लोंढे यांना मतदारांकडून भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. त्याअंतर्गत रूचिता लोंढे यांच्या प्रचारार्थ पनवेल शहरात प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मनोहर ओझे यांच्या हस्ते व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या …

Read More »

तलवारींचा खणखणाट; जुगलबंदी जोरात!

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 28 नोव्हेंबर 2019 रोजी आले. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया पार पडली. काँग्रेसचे नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात सर्वाधिक मोठ्या अशा विधिमंडळ भारतीय जनता पक्षाचे नेते या नात्याने विरोधी …

Read More »

विस्तारानंतरचा असंतोष

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे अखेर गंगेत न्हाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपसात मंत्रिपदे वाटून घेतली, मात्र या विस्तारावरून तिन्ही पक्षांमध्ये नाराजीचे सूर उमटले असून, अंतर्गत वाद उफाळून आला आहे. नाराज आमदारांना शांत करण्यासाठी संबंधित पक्षांच्या प्रमुखांनी आपल्या नेत्यांना कामाला लावले असले, तरी हे …

Read More »

नकली दागिने विकून फसवणूक करणारे दोन जण जेरबंद

पनवेल : वार्ताहर खांदेश्वर रेल्वे स्टेशनमध्ये एका व्यक्तीला नकली सोन्याचे दागिने विकून फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या दोन जणांना राजे प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पकडून पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून नकली सोन्याचे दागिने विकून फसवणूक करणार्‍या टोळीचे प्रमाण वाढीस लागले होते. पाच …

Read More »

सिंधुदुर्ग रहिवासी संघाचे स्नेहसंमेलन

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन; मान्यवरांची उपस्थिती खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात झाले. नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर विद्यालयाच्या भव्य सभागृहामध्ये हा स्नेहमेळावा झाला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, कस्टमचे निवृत्त सहाय्यक कमिशनर अभय पोयरेकर, वीरपत्नी वीणा पोयरेकर …

Read More »

नव्या वर्षात केंद्र सरकारची नवी योजना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नव्या वर्षात 15 जानेवारीपासून केंद्रातील मोदी सरकार  ’वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करत आहे. सुरुवातीला 12 राज्यांमध्ये ही योजना कार्यान्वित होणार आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, गोवा, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि झारखंड या राज्यात ही योजना सुरू होत आहे. वन …

Read More »

बाहुला-बाहुलीचे लग्न

भारती फुलमाळे यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. घरात गोड-धोड आणि सोबतीला मटण शिजवणे सुरू होते. नातेवाईक मंडळी नटून-थटून जमत एकमेकांना शुभेच्छा देत होते. निमित्त होते भारती यांचा चार महिन्यांचा मुलगा राजकुमार यांच्या विवाहाचे. नवरी मुलगी म्हणून शेजारच्या झोपडीतल्या दोन महिन्यांच्या राणी शामसुंदरला नटवले होते. हे सर्व पाहून काही वर्षांपूर्वी (आता …

Read More »

भारताला ’अच्छे दिन’ येताहेत!

नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आणि त्यांनी ’अच्छे दिन’ ’सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना मांडल्यापासून त्यांच्या, पर्यायाने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधकांनी भारत खतरेमें, संविधान खतरेमें अशी बांग द्यायला सुरुवात केली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 543 …

Read More »

2019 सरताना अन् 2020मध्ये पाऊल टाकताना…

बघता बघता वर्ष सरायला आले. 2019 कधी संपत आले हे कळलेदेखील नाही. दिवस कसे भुरर्कन उडून गेले. मंगळवारी रात्री ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष केल्यानंतर आपण सर्व जण नव्या वर्षात पर्दापण करणार आहोत. तसे पाहिले तर येणारा प्रत्येक क्षण हा जाण्यासाठीच असतो. आताचा वर्तमान उद्या भूतकाळ होऊन जातो, पण म्हणून काही कुणी …

Read More »

‘सीसीए’, ‘एनआरसी’ आवश्यकच

सिटिझनशिप अमेंडमेंट अ‍ॅक्ट-सीएए म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन-एनआरसी म्हणजेच राष्ट्रीय नागरिक नोंदणी यावरून सध्या देशभरात वातावरण ढवळून निघत आहे. या दोन्हींची संकल्पना न समजून घेता त्याला केला जाणारा विरोध हा आंधळाच म्हटला पाहिजे. सीएए आणि एनआरसी या उभय बाबी भिन्न आहेत. सीएए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा …

Read More »