Breaking News

Pravin Gaikar

आठ किलोचा गांजा जप्त

पनवेल : बातमीदार उलवे व एनआरआय परिसरात गांजा या अमली पदार्थाची विक्री करणार्‍या माणिक जयराम रुडे (32) या व्यक्तीला परिमंडळ 1मधील अमली पदार्थविरोधी विशेष पथकाने उलवे भागात सापळा रचून अटक केली. त्याची गाडी आणि घरामधून पोलिसांनी सात किलो 900 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. अमली पदार्थ विरोधी विशेष पथकातील …

Read More »

कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांची सुटका

मोहोपाडा : वार्ताहर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपटा गावात एका घरासमोर चारा पाण्याची सोय न करता कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेल्या जनावरांची सुटका करण्यात आली. रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या सतर्कतेमुळे या सहा गाई व दोन वासरांना जीवदान मिळाले आहे. मौजे आपटा येथे ही जनावरे सुफियान जलिल …

Read More »

महाराष्ट्रात राजकीय सर्जिकल स्ट्राईक

महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे असताना एवढे मोठे व महत्त्वाचे राज्य सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला भाजप हातातून जाऊ देणार का? अशा पेचप्रसंगी भाजपचे ‘चाणक्य’ गप्प का आहेत? ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत असलेला हा पक्ष काही खेळी करतोय का? आणि केलीच तर नेमकी कोणती खेळी करणार? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे एव्हाना सर्वांना …

Read More »

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तरी हीरक महोत्सवानिमित्त अभिवादन यात्रा

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर भावे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेने 160 व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने संस्थेद्वारा संचालित नवीन पनवेल येथील फडके विद्यालयाच्या वतीने शतकोत्तर हीरक महोत्सवी अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेल परिसरात झालेला हा …

Read More »

वयोवृद्धांना फसवणार्या आरोपीला उत्तराखंड येथून अटक

पनवेल : बातमीदार वयोवृद्ध महिला व पुरुषांना एकटे असल्याचे पाहून व त्यांना बोलण्यात गुंतवून फसवणूक करणार्‍या आरोपींपैकी एका आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी उत्तराखंड येथून अटक केली आहे. त्याच्यावर तब्बल दीडशेहुन अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपी कडून तीन लाख 61 हजार रुपयांचे 12 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत …

Read More »

अतिवृष्टी भागातील 300 विद्यार्थ्यांना सहा लाखांची आर्थिक मदत

आमदार मंदाताई म्हात्रे यांचा पुढाकार नवी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पडलेल्या पावसामुळे ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे. या ओल्या दुष्काळाचा फटका औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे शिक्षण घेणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना बसला. राज्यात अनेक ठिकाणी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची मुले जेथे जेथे …

Read More »

रेल्वे स्टेशनवरून कुली हद्दपार

’सारी दुनिया का बोझ हम उठाते है. लोग आते है, लोग जाते है, हम यही पे खडे रह जाते है… कुली चित्रपटात लाल डगला आणि हाताला बिल्ला लावून सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी या गाण्यामुळे रेल्वे स्टेशनवरील या कुलीला प्रतिष्ठा मिळवून दिली, पण आज रेल्वे स्टेशनवरील पायाभूत सुविधा आणि व्हीलवाल्या बॅगमुळे …

Read More »

उचलली जीभ…

पराकोटीच्या राजकीय भांडणात शब्दाने शब्द वाढतो आणि विनाकारण तणाव निर्माण होतात हे तर खरेच. आपण आपल्याच हाताने परतीच्या वाटा बंद करीत चाललो आहोत, नजीकच्या भविष्यात हा मार्ग परिस्थिती आणखी अवघड करेल याचे भान ठेवायला हवे. परिस्थिती शक्यतो चिघळू नये याची पुरेशी काळजी भारतीय जनता पक्षाने जरुर घेतली आहे हे तर …

Read More »

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर…

विधानसभा निवडणुकीपूर्वी झाली नाही एवढी प्रचंड उलथापालथ निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात झाली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावरदेखील राजकीय पटलावरील हालचाली थांबण्याचे नाव घेत नाहीत. विशेष म्हणजे परस्परविरोधी विचारधारा असलेली शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी आपली ध्येयधोरणे बासनात गुंडाळून चक्क मांडीला मांडी लावून बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी …

Read More »

समाजमाध्यमांमुळे एकाकी

मानवप्राणी हा सामाजिक प्राणी असून समवयस्क मित्रमंडळींशी प्रत्यक्ष भेट, संवाद, देवाणघेवाण या त्याच्या नैसर्गिक गरजा आहेत. समाजमाध्यमांतून हा संपर्क, संवाद साधला जातो असा आभास निर्माण होत असला तरी समाजमाध्यमे ही तितकीच तुम्हाला एकाकी करणारीही असू शकतात असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष ताज्या संशोधनांतून निघतो आहे. समाजमाध्यमांच्या प्रभावाची चुणूक एव्हाना सर्वच क्षेत्रांमध्ये कळून …

Read More »