नवी मुंबई : सिडको वृत्त सिडकोच्या व्हॅली शिल्प आणि सीवूड् इस्टेट या गृहनिर्माण योजनांतील मिळून शिल्लक 272 सदनिकांसाठी अर्ज नोंदणीचा प्रारंभ शनिवारी (दि. 26) दुपारी 2.00 वा. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते करण्यात आला. सदर 272 सदनिका या उच्च उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी उपलब्ध आहेत. …
Read More »अनंत कर्वे ः 55 वर्षे कंदील बनविणारा अवलिया
सेवा निवृत्तीचा काळ म्हणजे आराम, भटकंती. पण 74वर्षीय अनंत कर्वे यांनी स्वतःला आपल्या आयुष्यातील एका जुन्या छंदाने झपाटले आहे. टाकाऊपासून टिकाऊ आणि त्यातही आकर्षक वस्तू बनविणारे कर्वे यांना उतारवयात हा छंद वयाचे भान विसरायला लावतो. दरम्यान, या छंदातून त्यांनी हस्तकला आणि टिकाऊ वस्तूंचा खजिना उभा केला आहे. 39 वर्षे नोकरी …
Read More »वरुणराजाची बळीराजावर अवकृपा
दिवाळी आली, ऑक्टोबर संपायला आला तरी पाऊस जाण्याचे नाव घेत नाही. परतीचा पाऊस झोडपतच आहे. कोकणात भातशेती हे मुख्य पीक घेतले जाते. यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे पीक चांगले आले. लावणीसाठी पावसाची वाट पाहावी लागली नाही, पण भातपीक हाताशी आले व शेतकर्यांच्या हातचा घासच निघून गेला आहे. पावसामुळे शेतकर्यांची …
Read More »रायगडात महायुतीच्या चक्रीवादळात महाआघाडीची वाताहत!
कोकण किनारपट्टीवरील रायगड जिल्ह्याला वादळे नवी नाहीत. पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये अनेकदा वावटळी उठतात. यंदा सोसाट्याच्या वार्यासह अतिवृष्टीने थैमान घातले. अगदी दिवाळी आली तरी वादळ आणि पाऊस कायम आहे. अशातच जिल्ह्यातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना विशेषतः शेतकरी कामगार पक्षाला अक्षरशः झोडपून काढले. भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीच्या चक्रीवादळात शेकाप, राष्ट्रवादी …
Read More »तळोजा वसाहतीत होणार सिडको उद्यान विकसित
नवी मुंबई : प्रतिनिधी तळोजा वसाहत सेक्टर 9 मध्ये सिडको 60 लाख रुपये खर्च करून उद्यान विकसित करणार असून, वसाहतीमधील हे पहिले उद्यान आहे. एप्रिल अखेरपर्यंत उद्यानाचे काम करून नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. सिडकोने तळोजा वसाहत विकसित करताना फेज 1 आणि 2 असे वर्गीकरण …
Read More »पनवेलचा मयूर नाईक ‘सुपर डुपर हिट 2019’ पुरस्काराचा मानकरी
पनवेल : प्रतिनिधी रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवणार्या लोकगीते, कोळीगीतांची पर्वणी देणार्या कृणाल म्युझिक या नामांकित संगीत कंपनीचा ‘2019 सुपर डुपर हिट गाण्याचा पुरस्कार’ पनवेलमधील गायक ‘लिंबू कापला’फेम मयूर नाईक यांनी पटकाविला आहे. लोअर परेल येथील अल्ट्रा मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या स्टुडिओमध्ये कृणाल अल्ट्रा म्युझिकचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जयेश विरा, निर्माता …
Read More »उरणमध्ये कोण मारणार बाजी?
उरण : प्रतिनिधी/वार्ताहर उरण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी जासई येथे मंगल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या सिडकोच्या इमारतीमध्ये गुरुवारी (दि. 24) सकाळी 8 वाजता सुरू होणार असून, निकाल दुपारी 3 वाजेपर्यंत जाहीर होतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे उरणचा शिलेदार कोण असणार हे उद्या दुपारी जाहीर होणार असल्याने उमेदवारांसह मतदारांची …
Read More »पशुचिकित्सा व्यवसायाचे अनुदानित खासगीकरण गरजेचे
दुग्धोत्पादन शेतीपूरक व्यवसाय म्हणून आतापर्यंत गाय, बैल, म्हशी आणि रेडे यांच्या संगोपनाकडे पाहिले जात आहे. मेंढी, शेळी आणि बकरी पालन तसेच कोंबड्या आणि ससेपालन हे व्यवसाय मांसाहारी लोकांच्या जिभेचे चोचले पुरविणारी मांसनिर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. या सजीवांच्या संगोपनामध्ये आरोग्य आणि चिकित्सा करताना आतापर्यंत सरकारी पशुचिकित्सा दवाखानेसदृश यंत्रणा …
Read More »नियंत्रण देशहिताचेच
भारतात आजच्या घटकेला इंटरनेट वापरणार्यांची संख्या सुमारे 45 कोटी इतकी आहे. ही संख्या मोठी असून त्यामुळेच समाज माध्यमांचा गैरवापर होण्याची शक्यताही मोठी आहे. इंटरनेटच्या माध्यमातून द्वेष पसरवणारी भाषणे, फेक न्यूज यांबरोबरच राष्ट्रविरोधी कारवाया होत असल्याचेही पुरेसे स्पष्ट झाले आहे. सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमांना नियंत्रित करण्यासंदर्भातील कायद्यांना अंतिम स्वरुप देण्याचे …
Read More »लोकशाहीचा उत्सव
गेले अनेक महिने वाजत-गाजत असलेल्या विधानसभा निवडणुकीचे सूप अखेर सोमवारी संध्याकाळी सहा वाजता वाजले. आता प्रतीक्षा आहे ती निव्वळ अपेक्षित असलेल्या निकालाची. महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन भाजपप्रणित सरकारे असलेल्या राज्यांमध्ये सोमवारी मतदान पार पडले. दोन्ही ठिकाणी मतदारांनी अपेक्षेनुसार प्रतिसाद देत आपला कौल मतदानयंत्रात बंदिस्त केला आहे. मतदानयंत्रात बंदिस्त असलेल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper