Breaking News

Pravin Gaikar

नदीत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील वाजे गावाच्या हद्दीतील गाढेश्वर धरणाकडे जाणार्‍या रस्त्यावरील नदीच्या पात्रात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली असून पनवेल तालुका पोलिसांनी प्राथमिक तपासाद्वारे आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मैदि निरगुडा (वय 50, रा. टॉवरवाडी) असे या महिलेचे नाव असून तिचा मृतदेह गाढेश्वर धरणाकडे जाणार्‍या रस्त्यावरील नदीच्या पात्रात …

Read More »

आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे बचावला प्रवासी

पनवेल रेल्वे स्थानकातील घटना पनवेल : वार्ताहर पनवेल रेल्वे स्थानकातील आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाचा जीव बचावल्याची घटना घडली आहे. पनवेल रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच वर ट्रेन क्रमांक 12617 मंगला एक्स्प्रेस आली होती सदर ट्रेन पकडण्यासाठी प्रवासी जितू बिना (वय 30) हा धावत होता दरम्यान सदर ट्रेन सुटल्याने तो …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता करामध्ये दिलासा देण्यासाठी कायद्यात काही बदल करावा लागला तरी तो करून पनवेलकरांना मदत करावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील विशेषतः सिडको वसाहतीमधील मालमत्ता …

Read More »

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व मंगळसूत्र खेचून मोटारसायकलवरून पसार होणार्‍या सराईत दोन गुन्हेगारांना अखेरीस खारघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने व एक मोटार सायकल असा मिळून जवळपास 4 लाख 75 हजार रुपये …

Read More »

‘सीकेटी’च्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र विधिमंडळाला भेट

दोन्ही सभागृहांच्या कामकाजाची जाणून घेतली माहिती मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि. 20) महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास भेट दिली. या विद्यार्थ्यांनी भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विधिमंडळ सभागृहाच्या कामकाजाची …

Read More »

पनवेल परिसरात तीन वेगवगेळ्या अपघातात एक ठार

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताची घटना घडली असून यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुणे-मुंबई लेनवर बंद पडलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव टाटा टेम्पोने धडक दिल्याने टेम्पोमधील प्रवाश्याचा यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून टेम्पोचालकाने रस्त्याच्या बाजूला बंद पडलेल्या …

Read More »

तीन लाखांची लाच घेताना सिडको अधिकार्‍याला रंगेहात पकडले

पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ पुनर्वसनमध्ये संपादित केलेल्या घराच्या बदल्यात सिडकोकडून मिळणार्‍या भूखंडाची पात्रता निश्चित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याकरिता तक्रारदाराकडून सात लाख रुपये लाच मागणार्‍या सिडको अधिकार्‍याला पहिला हप्ता म्हणून तीन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडको वर्ग 2चे …

Read More »

ट्रेलरचालकाने चहा टपरीचालकावर केले तलवारीने वार

पनवेल ः वार्ताहर पनवेल येथील पळस्पे ते जेएनपीटी रोडवरील कातकरी वाडी येथे एका ट्रेलरचालकाने किरकोळ कारणावरून चहा टपरीचालकावर तलवारीने वार केल्याची घटना घडली. या घटनेत टपरीचालक जखमी झाला. त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी ट्रेलरचालक राहुल भाऊसाहेब गांजे (30) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात …

Read More »

साडेचार वर्षांच्या मुलांना नर्सरित प्रवेश मिळणार

भाजपचे विशाल डोळस यांच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई ः बातमीदार ज्या बालकांचे 14 मार्चपासून किमान वय तीन वर्षे व जास्तीत जास्त वय चार वर्ष पाच महिने 30 दिवस आहे, अशा विद्यार्थ्यांना नर्सरी प्रवेश मिळणार आहे. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक  विशाल डोळस यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यास यश येऊन पालिकेने …

Read More »

पनवेलमध्ये ‘खेळ रंगला पैठणीचा’

पनवेल : वार्ताहर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, शुक्रवारी (दि. 10)पनवेल येथील फडके नाट्यगृहात खेळ रंगला पैठणीचा या कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रिया इव्हेंट्स आणि बीबी बांठिया प्रस्तुत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसिद्ध अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर उपस्थित होत्या. या वेळी वर्षा प्रशांत ठाकूर, ममता …

Read More »