Breaking News

Pravin Gaikar

पनवेलमध्ये चांगला पाऊस झाल्याने देहरंग धरणातील पाणीसाठा वाढला

खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर मागील काही दिवसापासून पनवेलमध्ये चांगला पाऊस झाल्याने देहरंग धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.यामुळे पनवेलकरावरील दिवसाआड पाण्याचे संकट टळले आहे.शहरात पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती पालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांनी दिली. सध्याच्या घडीला पाण्याची पातळी तीन मीटरने वाढली आहे. पनवेल शहराला दिवसाला 32 …

Read More »

वह्यावाटपाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उलवे नोड 1 व 2 आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्या वाटपाचा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली. या अंतर्गत शुक्रवारी (दि. 1) पनवेल तालुक्यातील शेलघर, बामणडोंगरी, बेलपाडा, जावळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत भाजपचे …

Read More »

अंधेर नगरी चौपट राजा

महाराष्ट्राच्या सत्ताकारणात जी खडाखडी सध्या चालू आहे, ती बघून जनता कंटाळून गेली असावी. या खडाखडीपेक्षा डाव-प्रतिडाव होऊन फैसला लागावा अशीच सार्‍यांची इच्छा असावी. कारण सत्ताधार्‍यांचा होतो खेळ आणि जनतेचा जातो जीव अशीच ही परिस्थिती आहे. गेला आठवडाभर सर्वत्र शिवसेनेतील फुटीची चर्चा सुरू आहे. या पक्षाचे दोन तृतियांशहून अधिक आमदार गुवाहाटीमध्ये …

Read More »

पनवेलमध्ये महापौर सहाय्यता निधीचे गरजूंना वाटप

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर महापौर सहाय्यता निधीतून पनवेलमध्ये तीन लाभार्थ्यांना सोमवारी (दि. 27) महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या हस्ते मदतीचे धनादेशांचे वाटप करण्यात आले. महापौर कार्यालयाजवळील सभागृहात महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महापौर सहाय्यता निधीची सर्वसाधारण बैठक घेण्यात आली. या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर सहाय्यता निधीच्या …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे मोफत वह्यावाटप

भाजप नेते अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती खारघर : रामप्रहर वृत्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने व भाजप युवा मोर्चाचे खारघर तळोजा उपाध्यक्ष शुभ पाटील याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम सोमवारी (दि. 27) आयोजित करण्यात आला होता. या वेळी भाजपचे पनवेल …

Read More »

करंजाडेतील पाणीप्रश्नी भाजपने वेधले सिडकोचे लक्ष

पाणीपुरवठा सुरळीत करण्याची आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे पाणीप्रश्नावर पूर्वनियोजित बैठक सोमवारी (दि. 27) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्यवर्ती कार्यालयात झाली. या बैठकीत करंजाडेमधील पाणी प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या शहरास 15 एमएलडी …

Read More »

नागरी समस्यांबाबत भाजपची तत्परता

कळंबोलीतील उघड्या गटारांना झाकणे बसविण्याची मागणी सभापती प्रमिला पाटील यांचे सिडकोला निवेदन कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोलीमधील उघड्या गटारांना झाकण लावण्यात यावी, अशी मागणी करीत पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’च्या सभापती प्रमिला पाटील यांनी सिडकोच्या अभियंताकडे निवेदन दिले. कळंबोली हे सिडकोने वसविलेले शहर आहे. आता या शहरांमधील नागरी सुविधांची वानवा …

Read More »

जनतेनेच काळजी घ्यावी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असताना मृतांच्या संख्येतही त्या प्रमाणात वाढ झाल्याचे आता समोर येत आहे. गेले सलग सात आठवडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असूनही राज्य सरकारकडून त्यासंदर्भात काहीही विशेष उपाययोजना करण्यात आलेली नाही. आजवर हा फैलाव प्रामुख्याने मुंबई व आसपासच्या जिल्ह्यांपुरता मर्यादित राहिला असला तरी याच काळात राज्यात पंढरपूरची …

Read More »

बोर्ली खाडीपात्रातील कांदळवनतोड

अवैध भरावामुळे पूरसदृश्य स्थिती; ग्रामस्थ आक्रमक रेवदंडा : प्रतिनिधी बोर्ली खाडीपात्रातील कांदळवन तोडून अवैध भराव करण्यात आला आहे. त्यामुळे  पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत बोर्ली ग्रामस्थांनी एकत्रीत येऊन आक्रमक भुमिका घेतली असून पावसाळ्यात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी धनदांडग्यांसह प्रशासनाची राहील असा इशारा त्यांनी दिला आहे. बोर्ली खाडीपात्रातील …

Read More »

पावसाळी पर्यटनासाठी खोपोली सज्ज

परिसर पर्यटकांनी बहरणार खोपोली : प्रतिनिधी पावसाच्या आगमनानंतर खोपोली परिसरातील निसर्ग बहरण्यास सुरुवात झाली आहे. सह्याद्री पर्वताच्या हिरव्या  चादरीबरोबरच पांढर्‍या शुभ्र पाण्याचे आकर्षक धबधबे सक्रीय होत आहेत. खंडाळा घाट परिसर हिरवाईने सजत आहे. दाट धुके व रिमझिम पाऊस हे खोपोली परिसराचे खास आकर्षण असून, याच निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले …

Read More »