पनवेल ः वार्ताहर मोबाईल रिचार्जची बँक खात्यातून कट झालेली 399 रुपयांची रक्कम परत मिळविण्याच्या नादात एका सुरक्षारक्षकाने दोन लाख 65 हजार रुपये गमावल्याची घटना तळोजामध्ये उघडकीस आली आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील सुरक्षारक्षकाला गंडा घालणार्या सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. तक्रारदार देवेंद्रदेव …
Read More »गुटखा घेऊन येणार्या ट्रकवर कारवाई
पोलिसांनी जप्त केला एक कोटींचा मुद्देमाल पनवेल ः वार्ताहर गुजरातहून नवी मुंबईत अवैधरित्या गुटखा आणून विकणार्या टोळीवर तुर्भे पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई करीत एक कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. नवी मुंबई येथील महापे चेकपोस्ट येथे तुर्भे पोलीसांना नाकाबंदी दरम्यान चेकिंग करीत असताना एका टेम्पोमध्ये गुटख्याच्या 30 मोठ्या गोणी …
Read More »खोपटा येथे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट
उरण : प्रतिनिधी खोपटा खाडी पुलाजवळील रिलायन्स कंपाऊंडमधील ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन आग लागण्याची घटना गुरुवारी (दि. 16) दुपारी घडली आहे. अग्निशमक दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण आणण्यास यश मिळाले आहे, मात्र ट्रान्सफॉर्मरमध्ये लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास द्रोणागिरी नोड परिसरातील खोपटा पुलाजवळील रिलायन्स …
Read More »पलावा परिसरातील लोकांना मिळणार आता उत्तम दर्जाची आरोग्य सेवा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पलावा हे कल्याण-डोंबिवली, मुंबई, ठाणे महानगर प्रदेशातील एक वाढणारे शहर आहे आणि अपोलो हॉस्पिटल्सकडून मल्टीस्पेशालिटी क्लिनिकची जोड तेथील लोकांसाठी आरोग्यसेवेसाठी एक महत्वाचे पाऊल आहे. यामुळे निश्चितच परिसरातील लोकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळणार आहे. अपोलो क्लिनिक नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल्सचे युनिट हेड डॉ. किरण शिंगोटे, …
Read More »आमदार गणेश नाईक यांच्या प्रयत्नांमुळे ऐरोली विभागासाठी तब्बल दहा कोटींचा निधी मंजूर
राज्य सरकारमार्फत नागरी सुविधा होणार उपलब्ध नवी मुंबई : बातमीदार आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून ऐरोली विधानसभा क्षेत्राचा सर्व समावेशक आणि समतोल विकास होत असताना नाईक यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाचा तब्बल दहा कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून ऐरोली विधानसभा मतदार संघामध्ये आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, दळणवळण, स्कायवॉक, …
Read More »सायन-पनवेल महामार्गावर बसला आग
चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप पनवेल : वार्ताहर सायन-पनवेल महामार्गावर खारघर येथील कोपरा पुलाजवळ टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवून प्रवाशांना वाहनाबाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. अग्निशमन विभागाने बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. ही बस मुंबईवरून सातार्यातील सांगोलाकडे जात …
Read More »मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर जबरी चोरी
सहा आरोपींना 24 तासांत अटक आठ लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त पनवेल ः वार्ताहर मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भाताण बोगद्याच्या अगोदर सहा जणांच्या अज्ञात टोळीने एका व्यक्तीस लाखो रुपयाला लुटल्याची घटना घडली. या प्रकारानंतर गाडी तेथेच सोडून ती टोळी पसार झाली. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच, पोलिसांनी या …
Read More »डिलेव्हरी बॉयकडूनच कंपनीमध्ये चोरी
सात लाख 62 हजारांचा घातला गंडा पनवेल ः वार्ताहर ऑनलाईन मागवलेल्या वस्तूंची डिलिव्हरी करणार्या डिलिव्हरी बॉयनेच 22 महागड्या मोबाईलची चोरी करून कंपनीला तब्बल सात लाख 62 हजार रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कलिमखान बाबुखान पठाण (34) असे डिलिव्हरीबॉयचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याला अटक केली आहे, तसेच त्याच्या …
Read More »अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस 3 वर्षे सक्तमजुरी
माणगाव सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय माणगांव : प्रतिनिधी माणगांव तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत 16 ऑक्टोबर 2021 रोजी 1 वा. सुमारास आरोपी यांचे घरात घटना घडली होती. घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, पिडीत मुली या शाळेतील झाडावर पेरू काढण्याकरीता पाण्याच्या टाकीवर चढल्या असतांना मुली आदिवासी समाजाच्या आहे हे आरोपी नारायण …
Read More »नेरळ येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकावर गुन्हा दाखल
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील नेरळ ममदापुर येथील हावरे यांचा गृहप्रकल्प उभा राहत आहे. यासाठी बांधकाम करणारे मजूर देखील त्यांच्या गृहप्रकल्पाच्या आवारात राहत आहेत. या ठिकाणी काम करणार्या एका मजुराने येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याची घटना उघड झाली आहे. नेरळ पोलीस ठाणे हद्दीत हावरे बिल्डिंग साईटवर राहणार्या कामगाराच्या मुलीवर अतिप्रसंग …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper