पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी 24 मार्च रोजी निवडणूक होत आहेत. कर्नाळा, कुंडेवहाळ आणि चिपळे या तीन ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यामुळे 24 मार्चला मतदान; तर 25 मार्चला मतमोजणी होणार आहे. चिपळे ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिला, कुंडेवहाळचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असून, कर्नाळा ग्रामपंचायतीसाठी सरपंचपद सर्वसाधारण …
Read More »Monthly Archives: February 2019
शिरवली ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकणार
एकनाथ देशेकर यांचा विश्वास पनवेल : रामप्रहर वृत्त शिरवली ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सदस्यपदाचे उर्वरित सर्व उमेदवार, तसेच थेट सरपंचपदाच्या उमेदवारही मोठ्या मताधिक्क्याने विजयी होऊन ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य एकनाथ देशेकर यांनी व्यक्त …
Read More »यूईएस स्कूलमध्ये शिवजयंती साजरी
उरण : वार्ताहर येथील यूईएस स्कूल अॅण्ड कॉलेजमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विमला तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याजवळ विद्यार्थी व पालकगण पारंपरिक वेषभूषेत जमले होते. यूईएस संस्थेच्या विश्वस्त, पदाधिकार्यांनी शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ढोल-ताशा व लेझीमच्या लयबद्ध वाद्यवृंदासह शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक …
Read More »विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचे स्नेहसंमेलन साजरे रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘आविष्कार’या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन गुरुवारी (दि. 21) करण्यात आले होते. हा कार्यक्रम ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »अभिनेता सलमान खान बिईंग ह्युमन ट्रस्टच्या वतीने मदतीचा धनादेश
पनवेल : अभिनेता सलमान खान बिईंग ह्युमन ट्रस्टच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून संदीप टेमकर यांना वैद्यकीय उपचारार्थ 20 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. टेमकर हे नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार घेत असल्याने मदतीचा धनादेश नगरसेवक राजू सोनी यांनी भाजप शहर उपाध्यक्ष भीमराव पोवार यांच्याकडे सुपूर्द केला.
Read More »उसर्ली पेस सेंटर येथे प्रमाणपत्र वितरण
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील उसर्ली येथील प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन पेस सेंटरमध्ये इलेक्ट्रिकल व ऑटोमोटिव्ह या कौशल्य विकासाचे प्रशिक्षण पूर्ण करणार्या युवक-युवतींना नुकतेच प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. पेस सेंटरमध्ये दोन कोर्सचे निवासी प्रशिक्षण दिले जाते. या कोर्ससाठी होल्टास कंपनी सहकार्य करीत आहे. यामध्ये केवळ प्रशिक्षण न देता त्यांना नोकरीसाठी सहकार्य …
Read More »कर्नाळा किल्ल्यावर अडकलेल्या चौघांची सुखरूप सुटका
पनवेल : बातमीदार कर्नाळा किल्ल्यावर अडकून पडलेल्या चौघांना तालुका पोलीस, वन विभाग आणि निसर्ग मित्र सह्याद्री प्रतिष्ठान ट्रेकर्सच्या मदतीने सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे. हे चौघेही एका कार्यालयात काम करीत होते. बापू चव्हाण (कामोठे), सायली जाधव (ऐरोली), श्रुती कदम (मुंबई सेंट्रल), कीर्ती पुरोहित (खारघर) अशी या चौघांची नावे आहेत. कर्नाळा …
Read More »महसुली अधिकार्यांच्या बदल्या
उपजिल्हाधिकारी दर्जाच्या 27 अधिकार्यांचा समावेश पनवेल : बातमीदार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागाच्या महसूल विभागात उपजिल्हाधिकारी संवर्गांतील बदल्यांचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले. नियमाप्रमाणे करण्यात आलेल्या या बदल्यांमध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाच्या तब्बल 27 अधिकार्यांचा समावेश आहे. ठाणे, कोकण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई या सहा जिल्ह्यांत बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणुकीशी संबंधित …
Read More »रायगड पोलीस संघ उपांत्य फेरीत
मुंबई : प्रतिनिधी शिवनेरी सेवा मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या स्व. मोहन नाईक चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पुरुष गटात एअर इंडिया, महिंद्रा, देना बँक या मुंबईच्या संघांबरोबर रायगडच्या पोलीस संघाने; तर महिला गटात महात्मा गांधी, संघर्ष या उपनगरच्या संघांबरोबर मुंबईचा शिवशक्ती आणि खेड-रत्नागिरीचा अनिकेत स्पोर्ट्स यांनी उपांत्य फेरीत …
Read More »पाकविरुद्ध क्रिकेट न खेळण्याचा भारताला पूर्णपणे अधिकार : अख्तर
इस्लामाबाद : वृत्तसंस्था पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहत भारताला पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट न खेळण्याचा पूर्णपणे अधिकार असल्याचे म्हटले आहे. भारतीय सैन्यावर हल्ला झाला असून, त्यामध्ये त्यांच्या जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे भारताने पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला तर त्याच्यात वावगे काहीच नाही, …
Read More »