Breaking News

Monthly Archives: February 2019

विद्यार्थ्यांनो, यशवंत व्हा! कीर्तिवंत व्हा!!

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा मौलिक सल्ला कामोठे : रामप्रहर वृत्त यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा आणि शालेय जीवनात यशस्वी होऊन आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करा, असे प्रतिपादन रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी कामोठे येथे केले. कामोठेमधील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर …

Read More »

‘टीपीएसडीआय’तर्फे कौशल्य प्रशिक्षण

पनवेल : वार्ताहर टाटा पॉवर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (टीपीएसडीआय) प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या (पीईएफ) सहयोगाने जवळपासच्या इलेक्ट्रिशिअन्सना स्किल-गॅप प्रशिक्षण पुरवत आहे. त्याचप्रमाणे रायगड व पालघर जिल्ह्यांतील या इलेक्ट्रिशिअन्सना रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंगद्वारे (आरपीएल) प्रमाणित करत आहे. या भागिदारीखाली पीईएफ शहरी व ग्रामीण भागातील गरीब वस्त्यांमधून प्रशिक्षणार्थींना एकत्रित करते; तर टीपीएसडीआय त्यांना …

Read More »

विवाह सोहळ्यांना दुष्काळाची बसतेय झळ

औरंगाबाद : प्रतिनिधी लग्नातील बँड, वाजंत्री, थाटमाट, कपडे या हौसमौज, मानापमान सांभाळण्यासाठी किंवा प्रतिष्ठेपायी करण्यात येणार्‍या खर्चाला दुष्काळी परिस्थितीमुळे फाटा दिला जात आहे. आटोपशीर आणि मोजक्याच वर्‍हाडींच्या उपस्थितीत टिळा-साखरपुड्यातच लग्न उरकण्याकडे कल असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे. मध्यंतरी काहीशी थांबलेली ‘झट मंगनी पट ब्याह’सारखी लग्नाची गेटकेन पद्धत पुन्हा …

Read More »

गुजरातच्या केशरची रत्नागिरीत निर्मिती

रत्नागिरी : प्रतिनिधी हवामान, माती यांच्या साधर्म्यामुळे गुजरातच्या प्रसिद्ध ‘केशर’ आंब्याची यशस्वी लागवड रत्नागिरीत होत आहे. मार्चअखेरीस गुजरातहून वाशीला येणारा केशर या वर्षी रत्नागिरीतून फेब्रुवारीतच वाशीत गेला आहे. गणेशगुळेतील (ता. रत्नागिरी) बागायतदार सुनील लाड यांच्या बागेतील आठ पेट्या वाशीला पाठविण्यात आल्या आहेत. हापूसप्रमाणेच त्याला दर मिळाल्याचे समाधान बागायतदारांना आहे. शनिवारी …

Read More »

पुण्यात प्राण्यांसाठी देशातील पहिले नेत्र रुग्णालय सुरू

पुणे : प्रतिनिधी प्राण्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे, उपाहारगृहे, खेळघर असे अनेक पर्याय उपलब्ध होत असतानाच आता पुण्यात प्राण्यांसाठीचे देशातील पहिले नेत्र रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. ‘विवेट मल्टीस्पेशालिटी क्लिनिक’तर्फे बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावर हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. डॉ. कस्तुरी भडसावळे या पशु नेत्रतज्ज्ञ महिलेच्या कल्पनेतून या नेत्र रुग्णालयाची स्थापना झाली …

Read More »

भर सभेत मोदींचा जयजयकार

चुरू : वृत्तसंस्था भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे लक्ष लागले असताना, चुरूमधील सभेत उपस्थित नागरिकांकडून मोदी, मोदीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोदींनी नुकतेच भारतीय लष्कर पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला कोठे, कसा आणि कधी घेईल हे ठरवेल, असे म्हटले होते. त्यानुसार …

Read More »

महाराष्ट्रातील दुष्काळाचे चित्र पालटेल -गडकरी राज्याला 10 राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी महाराष्ट्राने संपूर्ण राज्यात 170 पुलवजा बंधारे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती  घेतला असून या कामांमुळे महाराष्ट्राचे दुष्काळी चित्र पालटणार आहे, असा विश्वास केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी  राष्ट्रीय जल पुरस्कार वितरण समारंभात व्यक्त केला. जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्राला पहिला राष्ट्रीय …

Read More »

बार्णे शाळेत शहीद जवानांना श्रद्धांजली

कर्जत : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना कर्जत तालुक्यातील बार्णे येथील प्राथमिक शाळेत श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी मुख्याध्यापक किशोर म्हात्रे, पोलीस पाटील धनाजी मुने, स्वामी विवेकानंद शालेय समितीचे अध्यक्ष दशरथ मुने, शिक्षिका सोनल शिरसाठ, अस्मिता म्हात्रे, प्रणिता निकम यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Read More »

एमबीबीएस परीक्षेत श्वेता पाटीलचे यश

नागोठणे : येथील डॉ. सुनील पाटील आणि डॉ. गीता पाटील यांची ज्येष्ठ कन्या, श्वेता पाटील हिने एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याची किमया साधली आहे. श्वेताने सोलापूरच्या अश्विनी रूरल वैद्यकीय महाविद्यालयात हे शिक्षण पूर्ण केले असून पदवीदान समारंभ सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भरूड, संस्थेचे अध्यक्ष बिपिन …

Read More »

मराठी भाषा विकास प्राधिकरणाची स्थापना करा; ‘कोमसाप’ची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी राज्यात मराठी भाषा विकास प्राधिकरणाची स्थापना करावी आणि बारावीपर्यंत मराठी भाषेचा विषय अनिवार्य व्हावा, यासाठी मराठी शिक्षण कायदा करावा, अशी मागणी कोकण मराठी साहित्य परिषदे (कोमसाप)ने केली आहे. या संदर्भातील एक निवदेन कोमसापच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. 26) रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांना दिले. राजभाषा असूनही मराठी भाषेचे महत्त्व दिवसेंदिवस कमी …

Read More »