नागोठणे : प्रतिनिधी येथील एसटी बसस्थानकासमोरील कमानीतून जोगेश्वरी मंदिर, ब्राम्हण आळीकडे जाणार्या रस्त्याची सध्या दुर्दशा झाली आहे. हा रस्ता अनेक ठिकाणी खड्डेमय झाला असल्याने ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून धडपडतच मार्गक्रमण करावे लागते. याबाबत सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांना विचारले असता, रस्ता तयार करून चार वर्षे लोटली असल्याने रस्त्याची दुर्दशा झाली …
Read More »Monthly Archives: June 2019
बँक खात्यातून 50 हजार गायब; पोलिसांत तक्रार ; नेरळ दहिवली येथील प्रकार
कर्जत : बातमीदार आयडीबीआय बँकेच्या कोल्हारे (ता. कर्जत) शाखेच्या खातेदाराच्या खात्यामधून दोन दिवसात चक्क 50 हजार रुपये डेबिट झाले आहेत. त्याबद्दल या खातेदाराने नेरळ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. नेरळ जवळील दहिवली येथील शेतकरी दुर्वास मारुती भोईर यांचे आयडीबीआय बँकेच्या कोल्हारे शाखेत सेव्हिंग खाते आहे.त्या बँकेचे एटीएम कार्ड दुर्वास …
Read More »सीकेटी विद्यालयाचे गायन स्पर्धेत सुयश
पनवेल : प्रतिनिधी : पनवेल-उरण आगरी समाज मंडळातर्फे दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पोवाडा गायन स्पर्धेमध्ये नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने द्वितीय पारितोषिक मिळविले. रोख रकम रु. 2000 व सन्मानचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे …
Read More »सेवा सहयोगच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पनवेल ः प्रतिनिधी : येथील सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई व गवाणे ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक विद्यामंदिर गवाणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवाणे व इतर शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत स्कूल किटचे वाटप करण्यात आले. तसेच दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येेत …
Read More »अतिक्रमणाविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक
पनवेल : प्रतिनिधी : नवीन पनवेलमधील शिवसेना महिला आघाडी यांनी नवीन पनवेल सेक्टर 5 ए मधील पुलाच्याखाली आणि रेल्वेरुळाच्या जवळील पादचारी रस्त्यावर अनधिकृत भाजीवाले, हातगाडीवाले असे जवळपास 15-20 वेगवेगळे व्यावसायिक तेथे व्यवसाय करीत असल्याने नागरिकांना चालण्यास त्रास होत असतो, ह्यासंबंधीत कारवाई व्हावी ह्यासाठी पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे …
Read More »वीज अधिकार्यांसमोर ग्रामस्थांचा तक्रारींचा पाढा
उरण ः प्रतिनिधी : उरण तालुक्यातील विजेचा लपंडाव व समस्यांचा पाढाच ग्रामस्थांनी वीज मंडळाच्या अधिकार्यांसमोर वाचला. यानंतर अधिकार्यांनी नेहमीच्या पद्धतीने लवकरच समस्या सोडवू, असे आश्वासन दिले. या वेळी उपस्थित ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाला होता. उरण परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा मार्ग निघत नव्हता. दोन दिवसांपूर्वी …
Read More »पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी…
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, असे कवी सुरेश भट म्हणतात. हे खरे असल्याचा अनुभव आपल्याला पावलोपावली येत असतो. त्यामुळेच राज्यातील सीबीएससी आणि आयसीएसइसह सर्व परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक राहील याकरिता कायद्यात आवश्यक ते बदल करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधान परिषदेत …
Read More »मान्सूनच्या प्रतीक्षेने चिंता
प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पाण्याचे काहिसे उष्ण प्रवाह वाहतात, तेव्हा जी परिस्थिती उद्भवते, तिला एल निनो असे संबोधले जाते. गेल्या वर्षी 9 जूनला मुंबईत मान्सून अवतरला. 2009 खालोखाल मान्सूनला दुसर्या क्रमांकाचा विलंब 2016 साली झाला होता. त्या वर्षी मुंबईत 20 जून रोजी मान्सूनने हजेरी लावली होती. तेव्हाचाही विलंब एल निनोमुळेच …
Read More »मुस्लीम बांधवांचा भाजपत प्रवेश
मुरुड : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाबद्दल अल्पसंख्याक समाजामध्ये असलेले गैरसमज दूर केले जातील. सबका साथ सबका विकास याचबरोबर सबका विश्वाससुद्धा संपादन केला जाणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी मुरुड येथे केले. भाजपचे तालुका उपाध्यक्ष महेश मानकर यांच्या प्रयत्नाने मुरुड शहर व ग्रामिण भागातील अनेक …
Read More »सचिन, तू वर्ल्डकप जिंकलास तो धोनीमुळेच
नेटिझन्सकडून तेंडुलकर ट्रोल! साऊदॅम्पनट ः वृत्तसंस्था भारतीय संघाचे सलामीवर अपयशी ठरले की कोणतं संकट ओढावू शकते, याची प्रचिती अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात आली. विराट कोहली व केदार जाधव वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. मधल्या फळीत विजय शंकर आणि महेंद्रसिंग धोनी यांनी निराश केले. अफगाणिस्तानविरुद्ध भारताला केवळ 224 धावाच करता …
Read More »