नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचे माजी महान क्रिकेटपटू आणि देशाच्या ज्युनिअर संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर आता मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. द्रविड सोमवार (दि. 1)पासून भारताच्या वरिष्ठ संघातील खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत. विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यानंतर द्रविड आपला पदभार स्वीकारणार आहेत. द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 19 …
Read More »Monthly Archives: June 2019
उपांत्य फेरीसाठी चार संघांमध्ये चुरस
लंडन : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक संघामध्ये आता चढाओढ लागली आहे. ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत आपले स्थान पक्क केले असून, भारताला उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे. त्यामुळे भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश निश्चित मानला जात आहे, मात्र यजमान इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या …
Read More »अफगाणिस्तानने विजयाची संधी दवडली; पाकिस्तानचे आव्हान कायम
लीड्स : वृत्तसंस्था अखरेच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अफगाणिस्तानची कडवी झुंज मोडून काढत पाकिस्तानने सामन्यात बाजी मारली आहे. लीड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर तीन गडी राखून मात केली. 228 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला अखेरच्या षटकात विजयासाठी सहा धावांची गरज होती. इमाद वासिम आणि वहाब रियाज जोडीने या धावा …
Read More »…तर 27 वर्षांपूर्वीच टीम इंडिया भगव्या
जर्सीत दिसली असती नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत यजमान इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया नवीन जर्सीमध्ये मैदानात उतरली. 27 वर्षांपूर्वीच टीम इंडिया भगव्या रंगाच्या जर्सीत दिसली असती. मात्र परिस्थिती पाहून टीम इंडियाला निळ्या रंगाच्या जर्सीची निवड करावी लागली होती. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपमध्ये 1992पासून रंगीत जर्सी घालून खेळण्याची प्रथा सुरू …
Read More »‘कांगारूं’ची ‘किवीं’वर मात ; न्यूझीलंडवरील विजयाने ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी कायम
लॉर्ड्स : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर 86 धावांनी मात करीत विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. ‘कांगारूं’च्या 244 धावांचा पाठलाग करताना ‘किवी’चा संघ केवळ 157 धावांपर्यंतच मजल मारू शकला. ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कने न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला. न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. हेन्री निकोलास आणि मार्टीन गप्टील हे सलामीवीर बेहरनडॉर्फच्या …
Read More »नागोठण्यात मटण मार्केटची भिंत कोसळली
व्यावसायिकांना जागा खाली करण्याचा आदेश Exif_JPEG_420 नागोठणे ः प्रतिनिधी सलग दोन-तीन दिवस पडणार्या पावसाने शनिवारी सायंकाळी येथील चिकन-मटण बाजाराच्या मुख्य इमारतीची पश्चिम बाजूकडील भिंत कोसळण्याची दुर्घटना घडली असून यात कोणीही जखमी झाले नाही. इमारत जुनी झाली असली तरी ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे काही जणांकडून सांगण्यात आले. ही दुर्घटना घडल्यानंतर …
Read More »युवा मोर्चा अध्यक्षपदी शिवाजी पाटील
पेण ः पेण तालुक्यात भाजपची ध्येयधोरणे व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी गागोदे येथील शिवाजी पाटील यांची निवड करण्यात आली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, म्हाडा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद विरोधी …
Read More »पाली-खोपोली रस्त्याची दुरवस्था
वाहनचालकांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास सुधागड ः प्रतिनिधी अत्यंत महत्त्वाचा असलेला रस्ता म्हणजे खोपोली-पाली -वाकण रस्ता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गजवळ असून या मार्गावरून येणार्या वाहनांना मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय म्हणूनही हा रस्ता सोयीचा व जवळचा आहे. त्यामुळे या रस्त्यावरून रहदारी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातच पाली हे अष्टविनायकापैकी महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. साहजिकच …
Read More »नाणार प्रकल्पातून जिल्ह्याचा कायापालट होईल
भाजप रोहे तालुका उपाध्यक्ष प्रकाश मोरे यांचा विश्वास नागोठणे : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणारचा तेल शुद्धिकरण प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे रद्द करून तो रोहे तालुक्यासह इतर तीन तालुक्यांतील 40 गावांमध्ये येत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केली आहे. या प्रकल्पामुळे या चार तालुक्यांसह संपूर्ण रायगडचा निश्चितच कायापालट होणार …
Read More »चांभार्लीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त – रसायनी व आसपासच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी रेगे हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 30) दुपारपर्यंत करण्यात आले होते. या शिबिराचा रसायनी व आसपासच्या परिसरातील 50 पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी रेगे हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या विविध तपासण्या करून त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन करण्यात …
Read More »