पनवेल : प्रतिनिधी – कळंबोली येथील सेंट जोसेफ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी महापालिकेच्या माजी शिक्षण सभापती विद्याताई गायकवाड आणि तळोजा येथील रफ बटालियनचे असिस्टंट कमांडंट सुधीर सोनवणे यांच्या उपस्थितीत शनिवारी झाला. शनिवारी (दि. 29) कळंबोली येथील सेंट जोसेफ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील नवनियुक्त विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ …
Read More »Monthly Archives: June 2019
झाडे लावा झाडे जगवा…
खारघर शहरात वृक्षलागवड मोहीम पनवेल : रामप्रहर वृत्त – खारघर शहरातील सेक्टर 1 कोपरा खाडी परिसरात के. बी. फार्म नर्सरी या ठिकाणी पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या वेळी मोठ्या संख्येने शहरातील नागरिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत …
Read More »संजय गांधी निराधार योजना 106 प्रकरणे मंजूर
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या 106 लाभार्थींचे अर्ज मंजूर करण्यात आले. यासंदर्भातील सभा के. जी. म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 28) पनवेल तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या सभेत संजय गांधी निराधार योजनेचे अव्वल कारकून प्रभाकर नवाळे यांनी कार्यालयात मंजुरीसाठी आलेल्या एकूण 121 …
Read More »पोलादपूर शहरामध्ये मराठा आरक्षणाचा जल्लोष
पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या राज्य सरकारच्या युक्तिवादानुसार मराठा आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये निश्चित असल्याचा आदेश पारित झाल्याने महाड, पोलादपूर, माणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाचा जल्लोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी …
Read More »मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र वाबळेंची फेरनिवड
मुंबई ः प्रतिनिधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत ‘शिवनेर’चे संपादक नरेंद्र वाबळे हे अध्यक्षपदी, तर विश्वस्तपदी वैजयंती कुलकर्णी-आपटे आणि कार्यवाहपदी विष्णू सोनावणे निवडून आले आहेत. शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक झाली. यात अध्यक्षपदी नरेंद्र वाबळे निवडून आले असून त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार संदीप चव्हाण यांचा पराभव केला. वाबळे यांना …
Read More »आरोपी बांधकाम व्यावसायिकांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
संरक्षक भिंत कोसळून मृत्यू प्रकरण पुणे ः प्रतिनिधी शुक्रवारी रात्री पुण्यातील कोंढवा भागात सीमा भिंत कोसळून 15 कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल यांना अटक केली होती. त्यांना रविवारी (दि. 30) जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 जुलैपर्यंत पोलीस …
Read More »पाकला चोख प्रत्युत्तर दिल्यानेच अभूतपूर्व विजय
गिरीश महाजन यांचे प्रतिपादन नाशिक ः प्रतिनिधी देशाच्या सीमा सुरक्षित कशा राहतील याची मतदारांना काळजी होती. अशा परिस्थितीत केंद्र सरकाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे देशातील जनतेला देशाच्या सुरक्षेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारविषयी विश्वास निर्माण झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरून प्रतिसाद देत 303 जागांवर भाजपचे खासदार निवडून …
Read More »इंग्लंडची धावसंख्या सव्वातीनशे पार; शमीचे पाच बळी
बर्मिंगहॅम ः वृत्तसंस्था इंग्लंडच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजीला चांगलेच झोडपले. इंग्लंडचे सलामीवीर आणि बेन स्टोक्सच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडच्या फलंदाजांनी फटकेबाजी करीत भारतापुढे 338 धावांचे आव्हान ठेवले. भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने पाच गडी बाद केले, पण शमीच्या 10 षटकात इंग्लंडने 69 धावा वसूल केल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून …
Read More »पहिला पाऊस
ऊन जरा जास्त आहे अस दरवर्षी वाटते. यावर्षी पाऊस चांगलाच लांबला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या प्रत्येकाच्या मनात पाऊस कधी एकदा पडतोय असे झाले होते. पाऊस येतो आपल्या मर्जीने, पाऊस जातो आपल्या मर्जीने, हवामान खात्याच्या नाही हेच खरे असल्याचे सांगत तो आला एकदाचा. पाऊस पडला आणि सगळ्यांनी निश्वास सोडला. पहिल्या पावसात …
Read More »ब्रेथवेटला बसला दंड
मँचेस्टर : वृत्तसंस्था वेस्ट इंडीजचा खेळाडू कार्लोस ब्रेथवेटच्या अडचणीत वाढल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात पंचांशी हुज्जत घालणे त्याला महागात पडले आहे. अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याने त्याच्या सामना शुल्काच्या 15 टक्के इतका दंड त्याला ठोठावण्यात आला आहे. ब्रेथवेट हा आयसीसी आचारसंहिता कलम 2.8 च्या उल्लंघनात दोषी आढळला आहे. हा …
Read More »