Breaking News

Monthly Archives: June 2019

अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त कार्यक्रम

पनवेल : वार्ताहर – आशा की किरन फाऊंडेशन आणि अमरदीप बालविकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पनवेलमधील फडके नाट्यगृहात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व ईद मीलनही झाले. कार्यक्रमाचे आयोजन फाऊंडेशनचे संस्थापक बशीर कुरेशी, एन. डी. खान, नूरजहा …

Read More »

श्री अमरनाथ सेवा मंडळाचे बाबा बर्फानी यात्रेसाठी प्रस्थान

पनवेल ः वार्ताहर – यंदाच्या 26 व्या वर्षी श्री अमरनाथ सेवा मंडळ, पनवेलने आपली वैभवशाली परंपरा कायम राखत शुक्रवारी (दि. 28) पनवेल शहरातील विरुपाक्ष महादेव मंदिराचे आशीर्वाद घेऊन त्याची यथासांग महापूजा करून अमरनाथ यात्रेकडे प्रस्थान केले. गेल्या 25 वर्षांची या सेवा मंडळाची परंपरा असून ते दरवर्षी पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 …

Read More »

अर्धवट पुलाच्या बांधकामाचा फटका

कच्चा रस्ता वाहून गेल्याने 10 किलोमीटरचा वळसा पनवेल : बातमीदार – केवाळे येथील पुलाचे काम अपूर्ण असल्याने काही नागरिकांना जवळपास 10 किलोमीटरचा वळसा घेऊन प्रवास करावा लागत आहे, तर काही वाहने याच धोकादायक पुलावरून ये-जा करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष व ठेकेदाराच्या आळशीपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. …

Read More »

पनवेलकरांची पाणीटंचाई मिटण्याची शक्यता

पनवेल : बातमीदार – पनवेल महापालिकेचे देहरंग धरण शुक्रवारपासून भरून वाहू लागल्याने लवकरच शहरात सुरू असलेला एक दिवसाआड पाणीपुरवठा बंद होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पनवेल शहरात म्हणजेच तत्कालीन नगरपालिकेच्या साडेतीन चौरस किलोमीटरच्या हद्दीत महापालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पनवेल शहराला लागणार्‍या 26 एमएलडी पाण्यापैकी देहरंग धरणातून …

Read More »

आपत्ती व्यवस्थापनसाठी कर्जतचे प्रशासन सज्ज

कर्जत तालुक्याची भौगोलिक रचना पाहिली असता डोंगरदर्‍या आणि पावसाळ्यात ओसंडून वाहणार्‍या नद्या यांनी संपन्न असलेला तालुका आहे. पावसाळ्यात सातत्याने दरडी कोसळण्याच्या आणि सतत पाऊस कोसळत असेल तर नद्यांना पूर येण्याच्या घटना घडत असतात. त्याचवेळी मोठ्या प्रमाणात  राज्यमार्ग यांचे जाळे विणले गेले असल्याने रस्ते आणि रेल्वे यांच्याबाबत आपत्तीचे प्रसंग मोठ्या प्रमाणात …

Read More »

असंघटितपणाचा शाप

देशात शेतीखालोखाल रोजगाराची संधी बांधकाम क्षेत्रात मिळत असल्याने देशभरातील ग्रामीण भागातील नडलेले, अशिक्षित, गरीब मजूर मोठ्या संख्येने कामाच्या शोधात शहरी भागांकडे स्थलांतर करीत असतात. त्यांची संख्या मोठी असल्यामुळेच त्यांच्या मजुरीच्या दरावरही परिणाम होतो. कामाच्या अनिश्चिततेमुळे व असंघटित असल्याने मिळेल त्या रोजगारावर हे मजूर काम करत राहतात. त्यांच्यासोबत त्यांचा कुटुंबकबिलाही भटक्यांचे …

Read More »

तलाठी भरती परीक्षा उद्यापासून

अलिबाग : महसूल विभागाच्या अखत्यारितील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मंगळवारी (दि. 2) परीक्षांना सुरुवात होत आहे. 2 ते 26 जुलै या कालावधीत या परीक्षा होणार आहेत. या परीक्षा घेण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. या परीक्षेसंदर्भात उमेदवारांना काही माहिती हवी असल्यास अथवा तक्रार असल्यास त्यासाठी टोल फ्री क्रमांक व ई-मेल सुविधाही …

Read More »

वळवण आणि शिरोंडा धरणाचे पाणी कर्जतच्या मदतीला

कर्जत : बातमीदार पावसाळा वगळता कोरडी असलेली उल्हास नदी काही दिवसांपासून खंडाळा घाटातून अचानक आलेल्या पाण्यामुळे वाहू लागली होती. त्या बातमीचा माग घेतला असता उल्हास नदीचा उगम ज्या लोणावळ्याच्या पायथ्याशी होतो, त्या ठिकाणी टाटाच्या दोन धरणांचा आऊटलेट असून त्यातून ते पाणी सोडले असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पाटबंधारे खात्यानेदेखील त्याची …

Read More »

म्हसळा समन्वय समितीच्या बैठकीत अधिकार्यांची झाडाझडती

गैरहजर अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा तालुका समन्वय समितीची सभा नुकताच समितीचे अध्यक्ष शैलश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात झाली. या बैठकीमध्ये तालुक्यातील कामचुकार अधिकार्‍यांची झाडाझडती घेण्यात आली, तर गैरहजर अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. समितीचे अध्यक्ष शैलश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

अलिबागमध्ये भाजप पदाधिकार्यांच्या नियुक्त्या

अ‍ॅड. परेश देशमुख सरचिटणीस, अ‍ॅड. पल्लवी तुळपुळे महिला मोर्चा अध्यक्षा अलिबाग : प्रतिनिधी भाजप अलिबाग तालुक्याची बैठक शुक्रवारी (दि. 28) पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रमुख पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. अलिबाग विधानसभा मतदारसंघ सरचिटणीसपदी अ‍ॅड. परेश देशमुख, अलिबाग विधानसभा मतदारसंघ महिला …

Read More »