Breaking News

Monthly Archives: July 2019

माची प्रबळ, गाढेश्वर, मोरबे धरणावर बंदोबस्त

तीन पोलीस अधिकार्‍यासह 35 कर्मचार्‍यांची नियुक्ती पनवेल ः बातमीदार – गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्या, नाले, धरणे ओसंडून वाहू लागले आहेत. याचा लाभ पर्यटक घेत आहेत. परिसरातील नद्या, धरणे याकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. मात्र याच दरम्यान पाण्यात जाताना सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. मंगळवारी …

Read More »

श्वानांनंतर आता माकडांचा उच्छाद

पोलादपुरातील स्थिती; नगर पंचायतीकडून उपाययोजनेची अपेक्षा पोलादपूर ः प्रतिनिधी पूर्वी पोलादपूरची ग्रुपग्रामपंचायत असताना गावडुक्करांच्या उपद्रवाने हैराण झालेल्या पोलादपूरकरांना नंतरच्या काही काळात मोकाट कुत्र्यांचा जाच सहन करावा लागत असे. मात्र, पोलादपूर तालुक्यातील रेशनधान्य घोटाळ्याचा एक टेम्पो पोलादपूर तहसिल कार्यालयाच्या दारात उभा राहिल्यानंतर आतील तांदूळ गहू सडल्यामुळे तेथे माकडांचे कळपच्या कळप येऊन …

Read More »

अपंग शाळांमधील शिक्षकांना मिळणार रखडलेले वेतन

अलिबाग ः प्रतिनिधी  राज्यातील अपंग शाळांमधील हजारो शिक्षकांना अखेर तीन महिन्यांनंतर रखडलेले वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोकण पदवीधर मतदार संघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांनंतर ऑनलाईन वेतन प्रक्रियेतील बिघाड दूर केल्यानंतर शिक्षकांना दिलासा मिळाला. राज्यातील अपंग शाळांमधील शिक्षकांचे वेतन ऑनलाईन वेतन प्रक्रियेद्वारे केले जाते. मात्र, त्यात तीन …

Read More »

कबड्डीपटू नीता धुमाळ यांचे निधन

अलिबाग ः प्रतिनिधी  रायगड जिल्हा महिला कबड्डी संघाच्या माजी व्यवस्थापिका नीता दिलीप धुमाळ यांचे प्रदीर्घ आजाराने नुकतेच निधान झाले. त्या 52 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व सून असा परिवार आहे.  नीता धुमाळ रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात खानाव केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी रायगड जिल्हा महिला कबड्डी संघाच्या …

Read More »

नेरळ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

कर्जत ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील  मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या नोव्हेंबर 2019मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 17 जागांकरिता आरक्षण काढण्यात आले आहे. नेरळमध्ये 10 आदिवासी वाड्या असून त्या वाड्या ज्या प्रभागात समाविष्ट करण्यात आल्या आहेत, त्या ठिकाणी तीन जागांपैकी एकही जागेवर आदिवासी समाजासाठी आरक्षण नाही. दरम्यान, यामुळे आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा …

Read More »

‘मेंदडीत डेंग्यूची लागण नाही’

म्हसळा ः वार्ताहर तालुक्यातील मेंदडी ग्रामपंचायत हद्दीतील मेंदडीकोंड व परिसरातील काही रुग्णांना थंडी, ताप, सर्दी, उलटी, अंगदुखी होऊ लागल्याने तपासण्या केल्या असता रक्तातील फ्लेटलेटस् कमी आसल्याचे आढळले व रुग्ण डेंग्यूसदश्य रुग्ण आसल्याची भीती व्यक्त झाली. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, येथे डेंग्यूची लागण नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. तालुक्यातील …

Read More »

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अभिषेकची चमकदार कामगिरी

मुंबई : प्रतिनिधी इटालीतील सहाव्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवात अभिषेक देशपांडेने सात गुणांची कमाई करीत उपविजेतेपद पटाकावले.  या स्पर्धेत ‘ब’ गटात खेळताना अभिषेक देशपांडेने नऊ डावांत सात गुण मिळवले. सात गुणांवर टाय झाल्याने अभिषेकला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत अभिषेकने अग्रमानांकित फिडे मास्टर व्हॅलन्टी व जाइल्स (फ्रान्स) या अनुभवी खेळाडूंवर …

Read More »

वरसे ग्रामपंचायत परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी

रोहे ः पतिनिधी रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीत  पावसाळ्यात भुवनेश्वरमधील आदर्शनगर, गणेश नगर व वैभवनगरसह लगत असलेल्या नगरमध्ये नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी  येते या नगरमध्ये हे पाणी घुसत असल्याने नागरिकांच्या घरात पाणी मोठ्या प्रमाणात येत असून याचा त्रास नागरिकांना होत आहे. हे पाणी मानवनिर्मित अडथळ्यामुळे म्हणजे बिल्डरांनी नैसर्गिक नाल्यावर …

Read More »

वर्ल्डकप सामन्यादरम्यान भारतविरोधी फलक

लंडन : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत संघांच्या सुरक्षिततेबद्दल शंका निर्माण होईल अशी दुसरी घटना घडली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यादरम्यान मैदानाबाहेर जस्टिस फारॅ काश्मिर (काश्मीरला न्याय द्या) आणि ’इंडिया स्टॉप जेनोसाइड, फ्री काश्मीर’ (भारताने वंशहत्या थांबवावी, काश्मीरला मुक्त करावे’)असा संदेश लिहिलेली विमाने घिरट्या घालताना दिसली. भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान हेडिंग्ले स्टेडियमवरून भारतविरोधी घोषणेचे …

Read More »

नेरळमध्ये रेशनचा काळाबाजार

जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडून कारवाई पनवेल ः बातमीदार तालुक्यात रेशनिंग दुकानदारांबद्दल ग्राहकांच्या अनेक तक्रारी असल्या तरी कारवाई नसल्याने काळाबाजार करणारांचे चांगलेच फावले होते. मात्र कोल्हारे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी या काळ्या बाजाराचे पितळ उघडे पाडले आहे. या काळाबाजाराचा पर्दाफाश झाल्याने जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी याची थेट दखल घेऊन या घोटाळेबाजांवर …

Read More »