Breaking News

Monthly Archives: July 2019

धोनीच्या बर्थडेची धम्माल

लंडन : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेच संघात नवी पहाट आणणार्‍या आणि संघाच्या कर्णधारपदी असताना क्रीडा विश्वात संघाला उल्लेखनीय स्थान मिळवून देणार्‍या महेंद्रसिंह धोनी याचा वाढदिवस संघातर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संघातील सर्व खेळाडू, सपोर्टींग स्टाफ आणि धोनीच्या कुटुंबाचीही उपस्थिती होती. धोनीची पत्नी साक्षी हिने वाढदिवसाचे काही फोटो आणि व्हिडिओ …

Read More »

दक्षिण आफ्रिकेचा शेवट ‘गोड’ ; रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात

मँचेस्टर : वृत्तसंस्था विश्वचषकाच्या अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाच्या संघाचा 10 धावांनी पराभव करीत विश्वचषकातील आपला समारोप गोड केला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात आफ्रिकेच्या 325 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 315 धावांमध्ये आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने शानदार शतकी खेळी (117 चेंडूंत 122 धावा) करीत एक बाजू …

Read More »

विराट बनला हजारी मनसबदार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय कर्णधार विराट कोहली याने विश्वचषक क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ही गवसणी घातली. अशी कामगिरी करणारा तो विश्व क्रिकेटमधील विसावा आणि तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराटने 25 डावांत खेळताना 1029 धावा केल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने …

Read More »

जसप्रीत बुमराहच्या 100 विकेट्स

मुंबई : प्रतिनिधी भारतीय संघातील यॉर्कर किंग गोलंदाज जसप्रीत बुमराहने वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळताना शंभर गडी बाद करण्याचा मान मिळविला. भारताकडून सर्वात जलद बळींचे शतक साजरे करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने 57व्या सामन्यात ही कामगिरी केली. भारताकडून सर्वाद जलद 100 विकेट घेण्याचा विक्रम …

Read More »

‘हिटमॅन’ बनला ‘बिग बॉस’

लीड्स : वृत्तसंस्था भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याने विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक ठोकले. या स्पर्धेतील रोहितचे हे पाचवे शतक ठरले. यासोबतच एका विश्वचषक स्पर्धेत शतकांचा ‘पंच’ देणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा बहुमान रोहितने मिळविला आहे, तर  विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक सहा शतके करून त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या …

Read More »

भारत-न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया-इंग्लंड भिडणार ; विश्वचषक उपांत्य फेरीच्या लढतींचे चित्र स्पष्ट

लंडन : वृत्तसंस्था विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियावर मात केल्याने गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रलियाची दुसर्‍या स्थानी घसरण झाली असून, भारताने पहिले स्थान पटकाविले आहे. यासोबतच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. अखेरच्या सामन्यात श्रीलंकेचा सात गडी राखून दणदणीत पराभव केल्याने …

Read More »

पत्रकार सुरक्षा समितीच्या तालुकाक्षपदी निलेश मोने

सुधागड-पाली : प्रतिनिधी पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र या संघटनेचे पनवेल तालुक्यातील पत्रकार निलेश मोने यांनी आपल्या सहकार्‍यांसह सक्रिय सहभाग घेऊन या संघटनेचे काम हाती घेतले आहे. पत्रकार सुरक्षा समिती पनवेल तालुकाध्यक्षपदी पत्रकार निलेश मोने तर खालापूर तालुका सचिव साबीर शेख यांची पत्रकार विजय कडू व पत्रकार सुरक्षा संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

श्री सदस्यांकडून पेणमध्ये 27 हजार रोपांची लागवड

पेण ः प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने तसेच महाराष्ट्राचे स्वछतादूत पद्मभूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने रविवारी (दि. 7) पेण येथील श्री सदस्यांनी 27 हजार वृक्षांची लागवड तालुक्यातील  पिंपळगाव, सापोली येथे केली. यावेळी पेण वनक्षेत्रपाल व वन कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातील …

Read More »

नेरळ येथे घरावर झाड कोसळले

कर्जत ः बातमीदार नेरळ बाजारपेठ भागातील जमीन मालक आणि भाडेकरू यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे त्या जागेत असलेल्या एका घरावर पिंपळाचे झाड कोसळून घराचे नुकसान झाले. इमारत धोकादायक असल्याने त्या ठिकाणी कोणी राहत नव्हते. परिणामी घरातील साहित्य वगळता अन्य कोणतेही नुकसान झाले नाही. नेरळ बाजारपेठ भागात प्रफुल्ल ठक्कर हे राहत असून …

Read More »

भाजप मुरूड तालुका उपाध्यक्षपदी समीर शिंदे

मुरूड जंजिरा ः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या मुरुड तालुका उपाध्यक्षपदी उसरोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहणारे तरुण व उमदे कार्यकर्ते समीर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मुरुड तालुका भाजप कार्यकारिणीच्या सभेत ही निवड करण्यात आली. यावेळी अलिबाग-मुरुड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी तालुका …

Read More »