मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे सकारात्मकतेने कार्य करून राज्याला विविध आघाड्यांवर देशात प्रथम क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते मंगळवारी (दि. 2) अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना बोलत होते. सर्वसमावेशकता आणि सकारात्मकता, प्रामाणिकता, पारदर्शीपणा या माध्यमातून …
Read More »Monthly Archives: July 2019
रत्नागिरीत धरण फुटले
13 जणांचा मृत्यू, 10 लोक बेपत्ता रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरीत झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मंगळवारी (दि. 2) रात्री फुटले. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन 13 जणांचा मृत्यू झाला असून, 10 लोक बेपत्ता झाले आहेत. जिल्हा प्रशासनासह राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) बचाव व शोधकार्य करीत आहेत. …
Read More »उरण भाजपचे बूथ कार्यकर्ता संमेलन
उरण : वार्ताहर भारतीय जनता पक्ष उरणच्या वतीने विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन बुधवारी (दि. 3) येथील तेरापंत हॉलमध्ये मोठ्या उत्साहात झाले. या संमेलनात मतदार व पक्ष सदस्यांची नोंदणी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या कार्याचा …
Read More »रेवस येथील समुद्रात मालवाहू बार्ज बुडाले
अलिबाग : प्रतिनिधी रेवसनजीक कोळसा वाहून नेणारे मालवाहू बार्ज समुद्रातून बुडाल्याची घटना बुधवारी (दि. 3) सकाळी 9 वाजता घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बार्जमधील आठ जणांना सुखरूप धरमतर बंदरावर आणण्यात आले. यारा शिपिंग कॉर्पोरेशन कंपनीचे ‘पृथ्वीराज’ बार्ज कोळसा नेण्यासाठी मुंबईहून धरमतर येथे येत होते. रेवस बंदराजवळ आल्यानंतर या …
Read More »विद्यार्थ्यांना दिले जाणारे वाघिणीचे दूध रोखलं?
जगात इंग्रजी भाषेच्या वापरात अमेरिका सर्वप्रथम आहे तर भारत दुसर्या स्थानावर आहे. इंग्लंड देश चौथ्या स्थानावर आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारख्या समाजसुधारकाने इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हटले आहे. मात्र, राज्यसरकारने सेमी इंग्रजी मिडियमच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या पाल्यांनाही हे वाघिणीचे दूध पिण्याची संधी उपलब्ध केली असताना पोलादपूर तालुक्यात मात्र झारीतील शुक्राचार्यांनीच हे वाघिणीचे दूध …
Read More »वाडी गिळली कुणी
धरण कुणाच्या हद्दीत येते यावरून बराच काळ चालढकल झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. तर धरणाजवळ अलीकडच्या काळात खणलेल्या विहिरांकरिता जे सुरुंगांचे स्फोट केले गेले, तेही कदाचित धरणाला तडे जाण्यास जबाबदार असावेत अशी भीती आहे. अर्थातच, विहिरींच्या कामांची माहिती देखील स्थानिक प्रशासनाकडे असणे अपेक्षित आहे. धरणाचे बांधकाम मुळातच निकृष्ट दर्जाचे होते का त्याची …
Read More »‘साहित्यसंपदा’तर्फे साहित्य संस्कार शिबिर
ठाणे : प्रतिनिधी साहित्यसंपदा समूहातर्फे ठाणे येथील नवजीवन विद्या मंदिर येथे साहित्य संस्कार शिबिर घेण्यात आले. मराठी भाषेवर होणारे आक्रमण आणि लोप पावणारी वाचन संस्कृती असे ज्वलंत मुद्दे सर्वत्र चर्चेत असताना साहित्यसंपदा समूहाने त्यावर ठोस पाऊल उचलत साहित्य क्षेत्रात आपले भरीव योगदान साहित्य संस्कार शिबिरांतर्गत देण्यास सुरुवात केली. या शिबिराला …
Read More »‘तरणखोप ग्रा.पं.मधील भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी’
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील तरणखोप ग्रामपंचायत हद्दीतील गोविर्ले गावामध्ये 2016-2017 या कालावधीत न केलेल्या कामांचे बिल अदा करून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जिल्हा नियोजन समिती सदस्य जगदिश ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तरणखोप ग्रामपंचायतीच्या वतीने गोविर्ले गावात किती विकासकामे …
Read More »जालन्यातील धामणा धरणाला तडे, चार गावांना धोका
जालना : प्रतिनिधी एकीकडे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं असतानाच तिकडे जालना जिल्ह्यातल्या धामणा धरणाच्या भिंतीलाही तडे गेले आहेत. भिंतीमधून पाणी पाझरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तड्यांमुळे धरणाच्या आजूबाजूच्या तीन ते चार गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. धामणा धरण हे भोकरदन तालुक्यातील सेलूदमध्ये आहे. या …
Read More »डॉ. महेश केळुसकर सेवानिवृत्त
मुंबई : प्रतिनिधी आकाशवाणीतील प्रदीर्घ सेवेनंतर साहित्यिक डॉ. महेश कुळुसकर सेवानिवृत्त झाले. 1983 पासून ते आकाशवाणीत कार्यरत होते. रत्नागिरी, दमण, विविध भारती, सांगली, मुंबई या केंद्रांवर काम करताना त्यांनी 26 अभिवाचन मालिका केल्या. त्यातील महानायक ही अभिवाचन मालिका खूप गाजली. त्याचबरोबर त्यांनी प्रभाते मनी, ऐसी अक्षरे रसिके, चिंतन हा चिंतामणी …
Read More »