पनवेल : ग्रुप ग्रामपंचायत जांभिवलीचे नवनिर्वाचित सरपंच रिया रवींद्र कोंडिलकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यांना विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग केणी, ग्रामपंचायत सदस्य अजय तेजे, माजी सरपंच योगेश लहाने, माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, महिला अध्यक्षा शिल्पा म्हात्रे, प्रवीण काळबागे, कालुराम माळी, कृष्णा कोंडिलकर, …
Read More »Monthly Archives: July 2019
मोनाली गायकवाड हिचा वाढदिवस
पनवेल : भाजपच्या मोनाली गायकवाड हिचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोनाली गायकवाड हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रणाली नाईक, सोनाली खंडागळे उपस्थित होत्या.
Read More »रायगड जिल्ह्यात शेतीच्या कामांना वेग
अलिबाग : प्रतिनिधी पाच दिवसांनतर पाऊस थांबल्यामुळे रायगड जिल्ह्यात शेतीच्या कामांना वेग आला आहे. लावणीच्या कामांनाही सुरूवात झाली आहे. धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे जलाशायांमध्ये 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. जून महिन्याच्या सुरूवातीला मान्सूनपूर्व सरी कोसळल्या होत्या. त्यामुळे धूळपेरणी केलेली भाताची रोपे तयार झाली होती. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. भात …
Read More »विद्यार्थ्यांनी घेतला भात लावणीचा अनुभव पायरीचीवाडी प्राथमिक शाळेचा उपक्रम
पाली : प्रतिनिधी नांगरणी, पेरणी व लावणी आदी कामे विद्यार्थी पुस्तकातून अभ्यासतात. मात्र भात लावणीचा अनुभव विद्यार्थ्याना प्रत्यक्ष देता यावा, यासाठी सुधागड तालुक्यातील पायरीचीवाडी येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कुणाल पवार यांनी सोमवारी (दि.1) विद्यार्थ्याना प्रत्यक्ष शेतात नेऊन भात लावणी केली. पावसाची सर्वत्र जोरदार सुरुवात झाली आहे. शेतात भात लावणीची कामे …
Read More »शाळा, कॉलेजच्या कॅन्टिनमधून जंकफूड होणार हद्दपार
पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शाळा कॉलेज कॅन्टिनमधून जंकफूड हद्दपार होणार आहे. त्याच्या अतिसेवनामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर व वैयक्तिक जीवनावर परिणाम होत असल्याने अन्न सुरक्षा आयुक्त डॉक्टर पल्लवी दराडे यांनी प्रभावी कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत. जंकफूडमध्ये साखर, मीठ व मैद्याचा समावेश जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे …
Read More »पावसामुळे शिक्षकांची वाट बिकट माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यांचा रस्ता बंद
कर्जत : बातमीदार माथेरानच्या डोंगरात जुम्मापट्टी गावाच्या आजूबाजूला असलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये जाण्याचा रस्ता पावसामुळे खचून गेला आहे. त्यामुळे त्या भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये येणारे शिक्षक हे शाळेत वेळेवर पोहचत नाहीत. या शाळांमधील विद्यार्थी हे शाळेत येतात आणि गुरुजी आले नाहीत म्हणून पुन्हा घरी जातात. दरम्यान, वन जमिनीतून जात असलेला रस्ता …
Read More »भाज्या गटारात धुतल्याचा व्हिडीओ व्हायरल ; महाड नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष
महाड : प्रतिनिधी पावसाळा सुरू झाला आणि बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली. या हिरव्यागार पालेभाज्याकडे ग्राहकदेखील आकर्षित होत आहेत. मात्र गुरुवारी (दि. 4) सकाळी महाडमधील एका रस्त्याकडेला असलेल्या गटारात या भाज्या धुतल्या जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि शहरात एकच खळबळ उडाली. महाडमध्ये ऐन पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणात दाखल होतात. …
Read More »म्हसळा पोस्ट ऑफिसची स्थिती दयनीय; इमारत मोडकळीस
म्हसळा : प्रतिनिधी येथील पोस्ट ऑफीसची इमारत मोडकळीस आली आहे. स्लॅप कधीही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने तेथील कर्मचारी जीव मुठीत धरुन काम करीत आहेत. येथील बहुतांश संगणक बंद पडले असून, या कार्यालया मार्फत देण्यात येणार्या सेवा पूर्णपणे बंद पडल्या आहेत. म्हसळा पोस्ट ऑफीसमध्ये उपडाकपाल, पोस्टल अस्सीस्टंट, एमटीएस, पोस्टमन असे 7 ते …
Read More »इंग्लंडने उपांत्य फेरीत धडक
चेस्टर-ली-स्ट्रीट ः वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडला 119 धावांनी धूळ चारून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्ट्रो विजयाचा शिल्पकार ठरला. इंग्लंडने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 306 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव अवघ्या 186 धावांमध्ये संपुष्टात आला. मार्क वूडने तीन गडी बाद केले. न्यूझीलंडकडून टॉम लॅथमची अर्धशतकी …
Read More »विकासकामांचे श्रेय पालकमंत्री व जिल्हाध्यक्षांनाच -देवेंद्र साटम
कडाव : प्रतिनिधी विधानसभेच्या कर्जत-खालापुर मतदारसंघात गेल्या पाच वर्षात अनेक विकासकामे झाली आहेत तर अनेक कामे मंजूर झाली आहेत. ही विकासकामे आणण्याचे श्रेय पालकमत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे आहे, असा दावा भाजपचे कर्जत विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांनी गुरुवारी (दि. 4) केला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper