Breaking News

Monthly Archives: September 2019

गव्हाण येथे सिडकोच्या इंटीग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर कामाचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोच्या 12.5 टक्के योजनेंतर्गत गव्हाण येथे इंटीग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चरचे काम करण्यात येणार आहे. या विकासकामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या भूमिपूजनावेळी कामगार नेते महेंद्र घरत, ज्येष्ठ नेते भाऊशेठ पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, उपसरपंच सचिन भगत, ग्रामपंचायत सदस्य विजय …

Read More »

महेश बालदी यांच्याकडून आदिवासी मुलाला लॅपटॉप

उरण ः रामप्रहर वृत्त रानसई आदिवासी वाडीमध्ये राहणारा विकास नारायण बरतोड हा सिव्हिल  इंजिनिअरिंगला असून त्याला शिक्षणाची आवड आहे. त्यास प्रोजेक्टसाठी लॅपटॉपची गरज होती, पण लॅपटॉप घेण्याइतकी त्याची परिस्थिती नाही. ही बाब जेव्हा भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष समीर मढवी यांना रानसईच्या सरपंच गीता भगत यांचे पती अनिल भगत व …

Read More »

बीडमधील महिला 20व्यांदा गरोदर

बीड : प्रतिनिधी बीडमधली एक महिला 20व्यांदा गरोदर आहे. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. हातावर पोट असल्याने आणि पाच सहा मुले सोडून स्वतःवर उपचार घेण्यास या महिलेने नकार दिला आहे. बीडमधील माजलगाव केसापुरी कॅम्प या ठिकाणी राहणार्‍या लंकाबाई खरात या विसाव्यांदा गरोदर असल्याचे पीटीआयने म्हटले आहे. 9 सप्टेंबर रोजी लंकाबाई …

Read More »

ओवळे गावाचे पुनर्वसन झालेच पाहिजे; माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची बैठकीत मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त पर्जन्यवृष्टीमुळे व विमानतळाच्या भरावामुळे ओवळे गावात पाच फुटांपर्यंत पाणी शिरले होते. या पार्श्वभूमीवर ओवळे गावाच्या पुनर्वसनासंदर्भात सोमवारी (दि. 9) बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक ओवळे येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …

Read More »

घड्याळाचा आणखी एक काटा निखळला

सोलापुरात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा सोलापूर ः प्रतिनिधी विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने सत्तेतील पक्षांमध्ये जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच आहे. दिलीप सोपल आणि रश्मी बागल यांच्यानंतर माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष …

Read More »

रायगडातील 23 पोलीस अधिकार्यांच्या बदल्या

ए. बी. खेडकर म्हसळ्याचे नवे पोलीस निरीक्षक म्हसळा : प्रतिनिधी रायगड पोलीस दलातील 23 अधिकार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत. म्हसळ्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांची आलिबाग (पो.अ.वाचक) येथे तर ए. बी. खेडकर यांची म्हसळ्याला पोलीस निरीक्षक नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य आधिकार्‍यांच्या बदल्या- पोलीस निरीक्षक आर. पी. शिंदे  (जिल्हा विशेष …

Read More »

एमआयएम 74 जागा लढवणार

मुंबई ः प्रतिनिधी वंचित आघाडीसोबतच्या आघाडीत बिघाडी झाल्यानंतर एमआयएम आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलिल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एमआयएमने 74 जागांवर लक्ष केंद्रीत केले असून उमेदवारांच्या मुलाखती सुरू करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. औरंगाबादमध्ये मंगळवारी (दि. 10) मालेगाव, बडगाव, भोकर, नांदेड …

Read More »

ट्विटरवर मोदी मोदी; पाच कोटी फॉलोअर्स

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर फार अ‍ॅक्टिव्ह राहतात. मग ते इन्स्टाग्राम असो, लिंक्डइन असो, यू ट्यूब किंवा ट्विटर असो. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदी यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. नरेंद्र मोदी यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या सोमवारी पाच कोटी झाली आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्यांच्या यादीत मोदी …

Read More »

वैनगंगेला पूर; सतर्कतेचा इशारा

भंडारा : प्रतिनिधी मध्य प्रदेशातील संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. मंगळवारी (दि. 10) कारधा येथील लहान पुलावरून वैनगंगेचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली. सिहोरा-वाराशिवनी या आंतरराज्य मार्गावरील पुलावरून बावनथडी नदीचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूकसुद्धा बंद करण्यात …

Read More »

खोपोलीतील मुलांचा शिक्षणमंत्र्यांंच्या हस्ते सत्कार

खोपोली : प्रतिनिधी स्काऊट गाईडच्या राज्य पुरस्कार परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या खोपोली येथील शिशु मंदिर शाळेतील सृष्टी दिलीप म्हसे व चिन्मय मनोज हातणकर यांना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते स्काऊट्स आणि गाईड्स अंतर्गत राज्य पुरस्कार प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि …

Read More »