Breaking News

Monthly Archives: October 2019

विशेष लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकाची नियुक्ती; कर्नाळा बँक गैरव्यवहार

अलिबाग : प्रतिनिधी कर्नाळा बँकेत झालेल्या गैरव्यवहाराची दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली असून, बँकेच्या विशेष लेखापरीक्षणासाठी जिल्हा विशेष लेखापरीक्षक, वर्ग 1, सहकारी संस्था, रायगड-अलिबागचे यू. जी. तुपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेखापरीक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने लवकरच कर्नाळा बँकेच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या तपासणीत आढळलेल्या कर्नाळा …

Read More »

‘ज्यांच्या नावातच जयजयकार ते नाव गाजतंय आमदार प्रशांत ठाकूर’; महायुतीची प्रचारात मुसंडी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा आणणारे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या या लाडक्या आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधीच्या प्रचारासाठी ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता उत्साहात प्रचार करीत आहेत. त्यामुळे ’ज्यांच्या नावातच जयजयकार …

Read More »

निवडणुकीच्या वणव्यात तटकरे होरपळून जातील -अनंत गीते

रोहे ः प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीच्या दिशेने वारे वाहत आहेत. आता निवडणुकीचे रण पेटले असून त्याचा वणवा होईल. या वणव्यात सुनील तटकरे होरपळून जातील आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर निवडून येतील, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शनिवारी (दि. 12) येथे व्यक्त केला. शिवसेना, भाजप, …

Read More »

भाजप प्रवेशाच्या सरीवर सरी ; शेकापचे वारदोली, केवाळे येथील पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल, तक्क्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या हातीही ‘कमळ’

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्‍यांंंचा ओघ दिवसेंदिवस वाढतच असून, शेतकरी कामगार पक्षाचे वारदोली आणि केवाळे येथील पदाधिकारी, तसेच तक्का मोराज सोसायटी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 12) विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाजपमध्ये स्वागत केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

‘बालदींवरील टीकेला जाहीर सभेत उत्तर देणार’

पनवेल : प्रतिनिधी विकासावर न बोलता जातीच्या नावाने राजकारण करणार्‍यांना जाहीर सभेच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याची माहिती उरणचे तालुकाध्यक्ष रवी भोईर यांनी दिली. उरण विधानसभा क्षेत्रातील डॅशिंग नेते व उमेदवार महेश बालदी यांना वाढता प्रतिसाद पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे विरोधक जातीचा प्रचार करून जनतेची दिशाभूल आणि समाजामध्ये …

Read More »

खांदा कॉलनीत रंगला प्रज्ञावंत संवाद

खांदा कॉलनी : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रासह देश वेगाने प्रगतिपथावर जात आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष प्रज्ञा प्रकोष्ठ सेलच्या वतीने प्रज्ञावंत संवाद कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (दि. 11) खांदा कॉलनीतील श्रीकृपा हॉलमध्ये करण्यात आले होते. या वेळी भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या …

Read More »

महेश कृष्णा पाटील यांनी पटकावला राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक

पनवेल : केरळ येथे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा (अन इक्विप) झाली. यामध्ये महाराष्ट्र संघातून रायगडचे पॉवर लिफ्टिंग आंतरराष्ट्रीय खेळाडू महेश कृष्णा पाटील (आपटी, ता. खोपोली) हे सहभागी झाले होते. 59 किलो वजनी गटामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला. सुकापुरात बॅनर लावलेले होर्डिंग्ज व झाड पावसामुळे पडले पनवेल : सुकापूर …

Read More »

ख्रिश्चन समाजाचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त ख्रिश्चन अल्पसंख्याक समुदायाच्या वतीने नवीन पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये शांती महोत्सव भरविण्यात आला होता. त्याचे औचित्य साधून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला, तसेच मान्यवरांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करून महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला. या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा …

Read More »

डिजिटल दिवाळी पर्व

‘साहित्यसंपदा’ची अभिनव कल्पना अलिबाग : रामप्रहर वृत्त मराठी संस्कृतीत दिवाळी एक चैतन्याचा सण. मराठी माणसाच्या मनात दिवाळी म्हणजे फराळ, फटाके, आकाश कंदील यासह दिवाळी अंक असे समीकरण ठाम रअसते. दिवाळी विशेषांक नेहमीच आपले वेगळे असे स्थान साहित्यक्षेत्रात राखून आहेत. खूप आवडीने आणलेला विशेषांक नंतर कुठेतरी पडून राहतो आणि वर्षाच्या शेवटाला …

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेच्या हव्यासापोटी एकत्र आलेले पक्ष : उदयनराजे भोसले

पाटण ः प्रतिनिधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेले पक्ष आहेत. म्हणूनच त्यांची साथ सगळे सोडत आहेत, अशी टीका छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. शंभूराजे देसाई यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. आम्ही विचारांनी एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे आमचीच म्हणजेच शिवसेना, भाजप, रिपाइं व महायुतीचीच सत्ता येणार …

Read More »