Breaking News

Monthly Archives: November 2019

पनवेल ः उसर्ली येथील ग्रामस्थांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची रविवारी सदिच्छा भेट घेतली. या वेळी भूषण पाटील, प्रवीण बढे, विक्रम साबळे, संजय मेश्राम, उमेश कारभारी, कृष्णा कोळी, अमर कोळी, कुणाल चोरगे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More »

‘जिथे यंत्रणा पोहचणार नाही, तिथेही मदत करणार’

अकोला ः प्रतिनिधी गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाडा, विदर्भ, कोकणासह राज्यातील अनेक भागांना फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी केली. या वेळी अधिकार्‍यांच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना 6 नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेेश दिले, …

Read More »

सरकार लवकरच स्थापन होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रसारमाध्यमांना माहिती

अकोला : प्रतिनिधी ओल्या दुष्काळाच्या स्थितीत काळजीवाहू सरकार म्हणून काम करताना अडचण होते. लवकरात लवकर सरकार स्थापन करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौर्‍यावर आले आहेत. …

Read More »

अयोध्या ः सुरक्षा वाढवण्याची मुस्लिमांची मागणी

नवी दिल्ली :  अयोध्येतील वादग्रस्त जागेवरचा अंतिम निर्णय येण्याआधी अयोध्येत अतिरिक्त सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाने केली आहे. राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणावरच्या फैसल्याआधी मुस्लिम समाजाने प्रशासनाकडे केंद्रीय अर्धसैनिक दल (पॅरामिलिट्री फोर्स) तैनात करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अयोध्येत ज्या भागात मुस्लिमांची संख्या बर्‍यापैकी आहे त्या भागात सुरक्षा …

Read More »

निवृत्त पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना टाकले वाळीत

जिल्हा पोलीस अधीक्षकांचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष नागोठणे : प्रतिनिधी माझ्या कुटुंबाला ग्रामस्थ उंबरवाडी पंच कमिटी यांनी वाळीत टाकले असून, त्याची चौकशी करून योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी हशा नामा हंबीर यांनी रायगडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली असून त्याची प्रत रोहे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पाली पोलीस ठाणे यांना पाठवली …

Read More »

खोपोलीत घनकचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा

ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग; स्वच्छता अभियानावर प्रश्नचिन्ह खोपोली : प्रतिनिधी स्वच्छ खोपोली, सुंदर खोपोलीचा नारा नगरपालिकेसाठी कागदावर असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. खोपोली नगरपालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, मात्र सदर ठेकेदाराची मनमानी व त्यावर नियंत्रण ठेवणार्‍या नगरपालिका अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे खोपोली शहरातील अनेक रहिवासी भाग, भाजी मंडई, मटण …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिनंदन

खोपोली : भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर विधानसभा निवडणुकीत निवडून आल्याच्या पार्श्वभूमीवर खोपोलीच्या भाजप नगरसेविका अपर्णा मोरे व भाजप ओबीसी सेलचे जिल्हा नेते सचिन मोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Read More »

वादळाने मच्छीमार संकटात

अलिबाग : प्रतिनिधी क्यार आणि महावादळाने आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे या दोन वादळांमुळे मच्छीमार बांधवांचेदेखील आर्थिक नुकसान झाले आहे. मच्छीमार सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत.  यंदा पाऊस लांबल्यामुळे मासेमारी बंदीचा कालावधी उलटल्यानंतरही मच्छीमारांना मासेमारी करता आली नाही. किनार्‍यांवर नांगरून ठेवलेल्या बोटी उशिरा समुद्रात सोडल्या. त्यानंतर क्यार वादळ आले. …

Read More »

खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, अधूनमधून कमी-जास्त होणार्‍या विजेच्या दाबामुळे घरगुती उपकरणे बंद पडत आहेत. यामुळे नागरिकांना व कारखाना व्यवस्थापकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याविरोधात नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. वीज वितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी दुरूस्तीची कामे न केल्याने पावसाळा …

Read More »

डेक्कन क्वीन कर्जतला थांबविण्याची मागणी

कर्जत : प्रतिनिधी खंडाळा घाटातील मंकी हिल ते कर्जतदरम्यान मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या विविध तांत्रिक कामांमुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत मुंबईकडे जाणार्‍या काही एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चाकरमानी व व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. या मार्गावरील प्रगती एक्स्प्रेस रद्द असेपर्यंत पुण्याहून मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन कर्जतला थांबवावी, अशी मागणी मनसेने …

Read More »