Breaking News

Monthly Archives: November 2019

सुधागडातील भातशेतीचे नुकसान

तहसीलदारांनी केली पाहणी; पंचनामे करण्यासाठी यंत्रणा सरसावली पाली : प्रतिनिधी ऐन कापणीच्या तोंडावर कोसळलेल्या परतीच्या पावसाने  सुधागड तालुक्यात सुमारे 3300 हेक्टर क्षेत्रावरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. बाधित शेतकर्‍यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली असल्याचे सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी सांगितले. तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी शनिवारी …

Read More »

तातडीने पंचनामे करावेत

भाताबरोबर नाचणी, वरी, भाजीपाला शेतीचे नुकसान कर्जत : बातमीदार तालुक्यातील आदिवासी शेतकर्‍यांची सर्व प्रकारची शेती सरत्या पावसाने नुकसानीच्या खाईत गेली आहे. भात, नाचणी आणि वरी पिकांचे तसेच भाजीपाल्याचे या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळावी यासाठी आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे. आदिवासी भागातील शेतकरी प्रामुख्याने भाताबरोबर मोकळ्या …

Read More »

रायगडमध्ये पालकमंत्री चव्हाण यांचा करिष्मा

रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला समजला जायचा आणि आज तो बालेकिल्ला संपुष्टात आला आहे.हे महत्त्वाचे राजकीय कार्य रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी पार पाडले आहे. एक-दोन नाही तर तब्बल युतीचे पाच आमदार आणि भाजपचा सहयोगी सदस्य असे सहा आमदार युतीच्या विचारांचे निवडून आले …

Read More »

टिकाऊ पर्यटनाचा मार्ग

पाऊस अजूनही सुरूच आहे. आता तसा थंडीचा महिना सुरू झाला आहे. गुलाबी थंडीत आता पर्यटनासाठी लोंढे बाहेर पडतील. पर्यटनाची व्याख्या आता बदलली आहे. लोकांच्या खिशात पैसा आला आहे. त्यामुळे साधी पाण्याची बाटलीही सोबत न्यायला आता लाज वाटते. बदलत्या पर्यटनामुळे निसर्गसौंदर्याला बाधा येत आहे. पर्यटनस्थळे प्रदूषित होत आहेत. पर्यटकांनी पर्यटन करताना …

Read More »

महिला संघाच्या भवितव्याबाबत रिजिजू प्रचंड आशावादी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचा पुरुष संघ फिफा विश्वचषकात कधी खेळेल हे सांगता येणे कठीण आहे, पण महिला फुटबॉल संघ जागतिक क्रमवारीत पुरुषांपेक्षा सरस आहे. पुरुषांमध्ये फिफा विश्वचषकात पात्र ठरण्यासाठी बरीच चढाओढ असली तरी भारताचा महिला संघ मात्र भविष्यात नक्कीच फिफा विश्वचषकात खेळेल, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी …

Read More »

मी मॅच फिक्सर्सच्या गराड्यात होतो!, शोएब अख्तरचे खळबळजनक वक्तव्य

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था  बुकीने संपर्क केल्यावरून बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनवर दोन वर्षांच्या बंदीचे प्रकरण ताजे असतानाच आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने आपण तेव्हा मॅच फिक्सर्सच्या गराड्यात होतो, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. ’मी त्या वेळी 21 जणांविरुद्ध खेळत होतो. 11 प्रतिस्पर्धी संघातील …

Read More »

मुंबई शहर कबड्डी निवड चाचणी स्पर्धा जाहीर

मुंबई ः प्रतिनिधी  पावसामुळे मुंबईची निवड कबड्डी स्पर्धा पुन्हा एकदा पुढे ढकलली. ती 11 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होईल. मुंबई शहर कबड्डी असो.च्या वतीने व मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पुन्हा एकदा पावसाच्या अनिश्चितीमुळे पुढे ढकलण्यात आली. दसर्‍यानंतर सुरू झालेली ही स्पर्धा दिवाळीपूर्वी पावसामुळेच रद्द …

Read More »

मी स्वत:च्या अपेक्षा स्वत: ठरवतो : सौरव गांगुली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था बीसीसीआयचा अध्यक्ष होताच गांगुलीने भारतातील पहिल्या डे-नाइट कसोटीचा मार्ग मोकळा करून दिला. 22 नोव्हेंबरला भारताचा पहिला डे-नाइट कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध कोलकाताच्या इडन गार्डन्सवर खेळविला जाणार आहे. आयसीसीच्या सर्वश्रेष्ठ पंचाचा तब्बल पाच वेळा मान मिळवणारे सायमन टफेल यांच्या ’फाइंडिंग द गॅप्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला गांगुली उपस्थित …

Read More »

निवड समिती प्रमुखपदी वेंगसरकर?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संघटनेत बदलांचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. गेली काही वर्षे दिवस-रात्र कसोटी सामन्यांना विरोध करणारे बीसीसीआय यंदा आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. 22 नोव्हेंबरला कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगणार आहे. त्याआधी भारतीय संघाच्या निवड समिती …

Read More »

भारतीय पुरुष, महिला हॉकी संघांची ऑलिम्पिकमध्ये एण्ट्री

भुवनेश्वर : वृत्तसंस्था भारतीय हॉकीसाठी शनिवारचा (दि. 2) दिवस विशेष ठरला. महिला हॉकी संघाने ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले असतानाच पुरुषांच्या हॉकी संघानेही टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात प्रवेश निश्चित केला. पुरुषांच्या संघाने रशियाला सलग दुसर्‍या सामन्यात 7-1 (एकूण 11-3) अशा गोलफरकाने नमवून ऑलिम्पिकमध्ये प्रवेश निश्चित केला. आकाशदीप सिंहने 23व्या आणि 29व्या मिनिटाला …

Read More »