पनवेल : वार्ताहर अमली पदार्थांची विक्री करण्याबरोबर सेवन करणार्यांवरही पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पनवेलमध्ये गांजा ओढणार्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबई अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अमली पदार्थांची विक्री करणारे सर्व अड्डे तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले …
Read More »Monthly Archives: November 2019
एड्सबाधित बहिणींना भाऊबीज भेट
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायानीतील श्री समर्थ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण-अरविंद पाटील गेली सात वर्ष भावाच्या प्रेमापासून वंचित असणार्या 24 बहिणींना भाऊबीज करत आहेत. यंदाही त्यांनी हा उपक्रम राबविला. एड्स आजाराची जनजागृती करून आजाराने निराश झालेल्या बाधित रुग्णांमध्ये समुपदेशनद्वारे आनंदी जीवन जगण्याची उमेद निर्माण करून त्यांचे आयुष्य सुखकर करण्याचे कार्य …
Read More »आमदार मंदाताई म्हात्रे यांची मिनी सी-शोरला भेट
पुन्हा निवडून दिल्याबद्दल नागरिकांचे मानले आभार नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर मतदारसंघामध्ये वाशी, सानपाडा, नेरूळ, सीबीडी येथे मॉर्निंग वॉककरिता येणार्या ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांची बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे सातत्याने भेट घेऊन त्यांच्या समस्या व मागण्या ऐकत असत. आता पुन्हा आमदारपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आज सकाळी वाशी येथील मिनी …
Read More »एसीबीच्या कारवाईत घट
10 महिन्यांत केवळ आठ लाचखोर पकडले पनवेल : बातमीदार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 10 महिन्यांत आठ लाचखोरांना पकडले असले, तरी मागील वर्षाच्या तुलनेत नवी मुंबई युनिटच्या कारवाया तीनने कमी झाल्या आहेत. त्या शिवाय या विभागाकडून केल्या जाणार्या कारवायांमध्ये लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाणदेखील फारच कमी आहे. मोठ्या अधिकार्यांना शिक्षा होण्याचे …
Read More »रोहितची दुखापत गंभीर नाही
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था बांगलादेशविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्याआधी भारतीय संघासाठी चांगली बातमी आली आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळणार आहे. रविवारी 3 नोव्हेंबरला दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात हा सामना होणार आहे. शुक्रवारी सरावादरम्यान रोहितला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याने लगेचच सरावसत्र सोडलं होतं. यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने रोहितवर …
Read More »भारतीय महिलांकडून अमेरिकेचा धुव्वा
पहिल्या सामन्यात 5-1ने मिळविला विजय भुवनेश्वर : वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिक पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करत अमेरिकेचा 5-1 अशा गोलफरकाने धुव्वा उडवला आहे. ओडिशातील कलिंग हॉकी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने आपले वर्चस्व गाजवले. भारताच्या विजयात गुरजीत कौरने निर्णायक भूमिका निभावली. गुरजीतने दोन अप्रतिम …
Read More »निकालापूर्वी अन् निकालानंतर…
महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले यांचा वारसा जोपासणारे राज्य म्हणून देशात ओळख आहे. राज्यात राजकीय वैमनस्य, जातीयता, सामाजिक विषमता तसेच जातीभेदाला थारा नाही. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांचे निकाल स्पष्ट झाले असून लोकसभेच्या सातारा मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत झालेल्या या पोटनिवडणुकीत विद्यमान …
Read More »विधानसभा : लोकशाहीचे महामंदिर
विधानसभा हे लोकशाहीचे महामंदिर आहे. जनता जनार्दन हीच त्याची स्वयंभू सार्वभौम देवता. प्रतिनिधी हे त्या देवतेचे उपासक. त्या उपासकांचे सेवासाधनेचे संवाद म्हणजेच विधिमंडळातील चर्चा. सत्ता आणि सेवा, विरोध आणि विनोद, शक्ती आणि युक्ती, वाद आणि संवाद, कर्तृत्व आणि वक्तृत्व, मान आणि इमान, नय आणि विनय, निष्ठा आणि प्रतिष्ठा, सवाल आणि …
Read More »…अन्यथा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; भाजपचा शिवसेनेला निर्वाणीचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी सत्तावाटपाच्या अर्ध्या-अर्ध्या फॉर्म्युल्यावर अडून बसलेल्या शिवसेनेला भाजपने अखेर निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या 7 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे भाजपने म्हटले आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास सत्ता भाजपच्याच हाती राहणार असल्याने शिवसेना आता काय निर्णय घेते हे पाहावे लागणार आहे. विधानसभा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार; श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू होणार
पनवेलः प्रतिनिधी/बातमीदार पनवेलमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने 40हून अधिक जणांचा चावा घेतल्यानंतर निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्याची सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार निर्बिजीकरण केंद्र व त्याचबरोबर निर्बिजीकरण प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्यासाठी नव्याने कंत्राटदार नेमण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया पार पाडली. निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद न …
Read More »