Breaking News

Monthly Archives: December 2019

माणगाव भाजप अध्यक्षपदी संजय ढवळे यांची बिनविरोध फेरनिवड

माणगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या माणगाव तालुका अध्यक्षपदी संजयआप्पा ढवळे यांची शुक्रवारी (दि. 20) बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. भाजपची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याचा एक भाग म्हणून माणगाव तालुका भाजपची बैठक शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मुंढे यांच्या अधिपत्याखाली   येथील खरे मंगल कार्यालयात घेण्यात आली. त्यात नामनिर्देशन …

Read More »

नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत व कोळी बांधवांना डिझेल परतावा मिळावा, आमदार रविशेठ पाटील यांची अधिवेशनात मागणी

पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी त्याचबरोबर कोळी बांधवाना डिझेल परतावा मिळावा, अशी आग्रही मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. समुद्रामध्ये वारंवार होणार्‍या वादळांमुळे मच्छिमारांना मच्छी मिळणे मुश्किल झाल्यामुळे दुष्काळ जाहीर करून रायगडमधील कोळीबांधवांना डिझेल परतावा मिळावा, तसेच शेतकर्‍यांना नुकसान भरपाईपोटी करण्यात …

Read More »

कर्जतचे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत, महाविकास आघाडी सरकारच्या काळात बळीराजाकडे पाठ

कर्जत : बातमीदार पावसाळ्यातील भातपिकाच्या नुकसानीबद्दल मदतीचा पहिला टप्पा म्हणून राज्य शासनाने 27 नोव्हेंबर 2019 रोजी कर्जत तालुक्यातील 1612 शेतकर्‍यांना त्यांच्या बँक खात्यात मदत जमा केली होती. मात्र त्यानंतर आजपर्यंत नुकसानग्रस्त असलेल्या आणि शेतीचे पंचनामे झालेल्या 8432 शेतकर्‍यांना अद्याप शासनाची मदत मिळालेली नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कर्जत …

Read More »

सदनिका खरेदीबाबत सिडकोचे आवाहन

आर्थिक नुकसान सोसावे लागल्यास हस्तक्षेप करणार नसल्याची स्पष्टोक्ती नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा नवी मुंबई क्षेत्रामध्ये सदनिका खरेदी करताना नागरिकांनी विकासक हाच त्या जमिनीचा अधिकृत भाडेपट्टाधारक आहे का, जमिनीचे हस्तांतरण विकासकाकडे कायदेशीररीत्या झाले आहे का, त्या जमिनीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क प्रलंबित आहे का, या बाबींची खात्री करावी असे आवाहन सिडकोतर्फे …

Read More »

सीकेटी विद्यालयात आनंद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी)विद्यालयात मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील छोट्या विद्यार्थ्यांचा ’भव्य आनंद मेळावा’ शुक्रवारी (दि. 20) सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत आयोजित करण्यात आला होता. आनंद मेळाव्याचे उदघाटन अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या आनंद मेळाव्यामध्ये सीकेटी संकुलातील …

Read More »

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात संगीता शिंदेंची प्रत्येक सुनावणीला उपस्थिती

पनवेल : बातमीदार सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात पनवेल येथील न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीप्रसंगी विशेष सरकारी अभियोक्ता प्रदीप घरत यांना सहाय्य करण्यासाठी यापुढे आता प्रत्येक तारखेस या गुन्ह्यातील सुरुवातीच्या काळात तपास अधिकारी राहिलेल्या पोलिस उपअधीक्षक संगीता अल्फान्सो शिंदे यांना उपस्थित राहण्याची परवानगी राज्याच्या पोलिस महासंचालकांनी दिली आहे. बिद्रे …

Read More »

महापालिकेच्या अधिकारी, कर्मचार्यांना प्रशिक्षण

पनवेल : बातमीदार यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा, बाणेर पुणे यांच्या सहयोगाने व त्यांच्या प्रति कर्मचारी रूपये 275 अनुदानातून 20 व 21 डिसेंबर या दोन दिवसांसाठी पनवेल महानगरपालिकेत माहिती अधिकार कायदा या विषयी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका ही नव्याने स्थापन झालेली असून येथे पूर्वाश्रमीचे नगरपरिषद …

Read More »

नेरूळ-उरण रेल्वेच्या कामाला गती येणार

दुसर्‍या टप्प्यातील खारकोपर ते जासई दरम्यानचा अडथळा दूर उरण : वार्ताहर बहूप्रतिक्षित नेरूळ-उरण रेल्वेच्या दुसर्‍या टप्प्याचे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खारकोपर ते रांजणपाडा दरम्यान असलेल्या खाजगी जमिनीचे संपादन रखडले होते. या प्रकल्पामध्ये सुमारे 67 गुंठे खाजगी जमिन संपादित करावी लागणार आहे. या 67 गुंठे जमिनीचे निवाडे अंतिम …

Read More »

न्यायास विलंब कुठवर?

बलात्कारासारख्या गुन्ह्यात संबंधित बळी तरुणीला वा तिच्या पश्चात तिच्या कुटुंबियांना पुन्हा पुन्हा न्याययंत्रणेसमोर उभे करणे हे तितकेच अन्यायकारक आहे. या विलंबातून त्यांच्या वाट्याला येणार्‍या अवहेलनेची, क्लेषाची कल्पना करता येणार नाही. आरोपींच्या मानवी हक्कांची बारकाईने दखल घेणार्‍या न्याययंत्रणेने संवेदनशीलतेचा समतोल साधायलाच हवा. हैदराबादेत अलीकडेच झालेल्या एका डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्या …

Read More »

बलात्काराच्या गुन्ह्यातून वाचविण्यासाठी लाच

अहमदनगर : प्रतिनिधी महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांसंबंधी देशभर संतापाची लाट आहे. त्यातून हैद्राबाद येथे पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचे समर्थनही केले जात आहे. नगरच्या पारनेर तालुक्यात मात्र अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपीला मदत करण्यासाठी 50 हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी पकडला गेला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी …

Read More »