Breaking News

Yearly Archives: 2019

मुश्ताक अली क्रिकेट करंडक; महाराष्ट्राचा निसटता विजय

मुंबई : प्रतिनिधी गत उपविजेत्या महाराष्ट्राने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेतील ‘क’ गटातील सलामीच्या सामन्यात रेल्वेविरुद्ध आठ धावांनी निसटता विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी 15 षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना राहुल त्रिपाठीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राने 15 षटकांत जेमतेम 6 बाद 104 धावांपर्यंत मजल मारली. अझिम काझी …

Read More »

नेमबाज चिंकीला ऑलिम्पिक तिकीट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था युवा नेमबाज चिंकी यादवने शुक्रवारी आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी करीत भारतासाठी ऑलिम्पिकची 11वी जागा निश्चित केली. चिंकीला पदकाला गवसणी घालता आली नसली तरी तिने आपल्या कारकिर्दीत पात्रता फेरीतील सर्वोत्तम 588 गुण मिळवत टोकियो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान पक्के केले. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेती तसेच …

Read More »

भारताला हॉकी वर्ल्ड कपचे यजमानपद

सलग दुसर्‍यांदा बहुमान नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) 2023च्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद भारताला बहाल केले आहे. त्यामुळे भारतात सलग दुसर्‍यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेचे आयोजन होणार आहे. पुरुषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा आता भारतात 13 ते 29 जानेवारी रोजी होईल, असे आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने (एफआयएच) कळविले आहे. त्याचबरोबर …

Read More »

सर्पमित्र

जीवे जीवश्च जीवनम् सरपटत, दगड चुकवत त्या मुक्या प्राण्यांची जीव वाचवण्यासाठी चालणारी धडपड पहिली की कंठ दाटून येतो. मुक्या प्राण्यांनाही जीव आहे. ते  निसर्गचक्रातील एक महत्त्वाचा घटक आहेत. त्यांना वाचवणार्‍यांचा स्पर्श कळतो. वाचवणार्‍यांना कधी दंश केला आहे असा एखादा अनुभव नाही, एखादे उदाहरण नाही. मारणार्‍याला दंश केला आहे असेही नाही. …

Read More »

दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर सहा वर्षे विधानसभा आणि विधान परिषद संस्थगित

महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेसाठी निवडणुका होऊन त्याचे निकाल लागले, परंतु सत्तास्थापनेचा तिढा शनिवारपर्यंत कायम होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पुढील व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल. आपण या पार्श्वभूमीवर मागील काही …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा

राज्यपालांच्या निर्देशानुसार काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करणार मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 8) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपवला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यपालांच्या सांगण्यावरून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मी यापुढे काम करणार असल्याचे स्पष्ट केले. फोडाफोडीचे पुरावे द्या; अन्यथा माफी …

Read More »

बांधणवाडीत मंदिर जीर्णोद्धार

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर पनवेल तालुक्यातील कर्नाळा ग्रामपंचायत हद्दी असलेल्या बांधणवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) करण्यात आले. या वेळी आमदार बालदी यांनी एक लाख रुपयांचा धनादेश बांधणवाडी ग्रामस्थांना देताना पुढील कार्तिकी एकादशीपूर्वी …

Read More »

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची व्यवस्था पाहून अभिनेत्री परिणीती चोप्रा बेहद खुश

पनवेल : प्रतिनिधी खेळासाठी पनवेलजवळ अद्ययावत, आंतरराष्ट्रीय आणि दर्जेदार सुविधायुक्त ठिकाण असेल असे वाटले नव्हते, पण उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)मध्ये आल्यानंतर मी हे सगळे पाहून बेहद खुश झाले, असे अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने म्हटले. भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकचे काही चित्रिकरण आरटीआयएससीमध्ये 1 नोव्हेंबरपासून सुरू …

Read More »

बा विठ्ठला! राज्यातील शेतकरी सुखी व्हावा!!

चंद्रकांत पाटील यांचे साकडे पंढरपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे, असे साकडे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले आहे. पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या …

Read More »

विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

साजगाव (ता. खालापूर) : विठ्ठल मंदिरात महापूजा व आरतीचा मान मिळालेले देविदास पाटील यांचे कुटुंबातील सदस्य दिसत आहेत. या वेळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. (छाया : विनायक माडपे)

Read More »