Breaking News

Yearly Archives: 2019

तीन दिवसांपासून मोहो गाव अंधारात

पनवेल : बातमीदार गेल्या तीन दिवसांपासून वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने पनवेल तालुक्यातील मोहो गाव अंधारात आहे. दरम्यान, विजेअभावी अंधारातच राहण्याची वेळ नागरिकांवर आली असून मच्छरांचाही उपद्रव वाढला आहे. पनवेल तालुक्यातील मोहो गावाची लोकसंख्या पंधराशेहून अधिक आहे. या गावातला वीजपुरवठा करण्यासाठी बसविलेला वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर गेल्या तीन दिवसांपूर्वी जळाला …

Read More »

पालेभाज्यांचे भाव कडाडले

मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत आवक घटली नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अकाली पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत एकीकडे कांद्याचे भाव कडाडले असतानाच आता पालेभाज्यांचे भावही चांगलेच वधारल्याने गृहिणींचे बजेट मात्र कोसळले आहे. त्यामुळे पालेभाजी खरेदी करावी की नाही या स्थितीत महिलावर्ग आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने शेतकर्‍यांबरोबरच ग्राहकांची आर्थिक कोंडी केली …

Read More »

मच्छीमार पुन्हा संकटात

उरण : रामप्रहर वृत्त राज्याच्या किनारपट्टीवर सध्या आर्थिक संकटाचे ढग दाटून आले आहेत. अरबी समुद्रात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मासेमारीतील नैसर्गिक अडथळे ऑक्टोबपर्यंत कायम राहिल्याने मच्छीमारांच्या हातातोंडचा घास हिरावला गेला आहे. ‘क्यार’ वादळ सरून गेल्यानंतर आता पुन्हा चक्रीवादळाचा इशारा देण्यात आल्याने मच्छीमारांची अर्थनौका वादळात सापडली आहे. 15 दिवसांपासून समुद्रातील मासेमारी बंद राहिल्याने …

Read More »

पनवेलमध्ये गांजा ओढणार्या तिघांना पकडले

पनवेल : वार्ताहर अमली पदार्थांची विक्री करण्याबरोबर सेवन करणार्‍यांवरही पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पनवेलमध्ये गांजा ओढणार्‍या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबई अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अमली पदार्थांची विक्री करणारे सर्व अड्डे तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले …

Read More »

एड्सबाधित बहिणींना भाऊबीज भेट

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायानीतील श्री समर्थ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण-अरविंद पाटील गेली सात वर्ष भावाच्या प्रेमापासून वंचित असणार्‍या 24 बहिणींना भाऊबीज करत आहेत. यंदाही त्यांनी हा उपक्रम राबविला. एड्स आजाराची जनजागृती करून आजाराने निराश झालेल्या बाधित रुग्णांमध्ये समुपदेशनद्वारे आनंदी जीवन जगण्याची उमेद निर्माण करून त्यांचे आयुष्य सुखकर करण्याचे कार्य …

Read More »

आमदार मंदाताई म्हात्रे यांची मिनी सी-शोरला भेट

पुन्हा निवडून दिल्याबद्दल नागरिकांचे मानले आभार नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर मतदारसंघामध्ये वाशी, सानपाडा, नेरूळ, सीबीडी येथे मॉर्निंग वॉककरिता येणार्‍या ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांची बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे सातत्याने भेट घेऊन त्यांच्या समस्या व मागण्या ऐकत असत. आता पुन्हा आमदारपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आज सकाळी वाशी येथील मिनी …

Read More »

एसीबीच्या कारवाईत घट

10 महिन्यांत केवळ आठ लाचखोर पकडले पनवेल : बातमीदार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 10 महिन्यांत आठ लाचखोरांना पकडले असले, तरी मागील वर्षाच्या तुलनेत नवी मुंबई युनिटच्या कारवाया तीनने कमी झाल्या आहेत. त्या शिवाय या विभागाकडून केल्या जाणार्‍या कारवायांमध्ये लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाणदेखील फारच कमी आहे. मोठ्या अधिकार्‍यांना शिक्षा होण्याचे …

Read More »

रोहितची दुखापत गंभीर नाही

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था बांगलादेशविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्याआधी भारतीय संघासाठी चांगली बातमी आली आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळणार आहे. रविवारी 3 नोव्हेंबरला दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात हा सामना होणार आहे. शुक्रवारी सरावादरम्यान रोहितला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याने लगेचच सरावसत्र सोडलं होतं. यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने रोहितवर …

Read More »

भारतीय महिलांकडून अमेरिकेचा धुव्वा

पहिल्या सामन्यात 5-1ने मिळविला विजय भुवनेश्वर : वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिक पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करत अमेरिकेचा 5-1 अशा गोलफरकाने धुव्वा उडवला आहे. ओडिशातील कलिंग हॉकी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने आपले वर्चस्व गाजवले. भारताच्या विजयात गुरजीत कौरने निर्णायक भूमिका निभावली. गुरजीतने दोन अप्रतिम …

Read More »

निकालापूर्वी अन् निकालानंतर…

महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले यांचा वारसा जोपासणारे राज्य म्हणून देशात ओळख आहे. राज्यात राजकीय वैमनस्य, जातीयता, सामाजिक विषमता तसेच जातीभेदाला थारा नाही. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांचे निकाल स्पष्ट झाले असून लोकसभेच्या सातारा मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत झालेल्या या पोटनिवडणुकीत विद्यमान …

Read More »