Breaking News

Yearly Archives: 2019

कळंबोली व पनवेल येथील स्कूल बसचालकांची मोफत डोळे तपासणी

पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचा अभिनव उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक दृष्टी दिनानिमित्त दृष्टी दोषांवर आधुनिक उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लक्ष्मी आय इन्स्टिटयूट व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टने संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये मोफत डोळे तपासणी अभियानाचा उपक्रम राबविला असून कळंबोली येथील सेंट जोसेफ शाळेतील मुलांची ने-आण करणार्‍या बसचालकांसाठी शनिवारी 19 ऑक्टोबर …

Read More »

वेताच्या पट्ट्यांपासून बनविलेल्या आकाश कंदिलांना उरणमध्ये मागणी

उरण ः वार्ताहर दिवाळीच्या सणाला थोडेच दिवस राहिल्याने वेताच्या पट्या व फायबरपासून तयार केलेली आकाश कंदील बाजारात आली आहेत. ते बनविणारे गरीब कारागीर आंध्र  प्रदेशमधून नागराज डी. व त्यांची पत्नी लता नागराज डी. असा परिवार आले आसून आठ इंचापासून आडीच फुटापर्यंत आकाश कंदील ते बनवत आहेत. सहा तास मेहनत करुन …

Read More »

दिवाळी खरेदीसाठी उरणमध्ये लगबग

उरण, पनवेल ः रामप्रहर वृत्त दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे. दिवाळीच्या स्वागतासाठी उरणकर सज्ज झाले असून खरेदीची लगबग अनेक बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे. दागिने आणि कपड्यांच्या खरेदीला उधाण आले आहे. त्यामुळे सुट्टीचे दिवस वगळून इतर दिवशीही बाजारात ग्राहकांची गर्दी दिसत आहे. दरम्यान, ऑक्टोबर हीटही वाढू लागली असली तरी खरेदीचा …

Read More »

महिलांनी बजावला मतदानाचा हक्क

पनवेल : माजी नगरसेविका जैनब शेख, सिद्धीकी कुंजानी व सहकारी महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत काढलेले छायाचित्र. युवा कार्यकर्त्यांनी केले मतदान पनवेल : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आनंद व्यक्त करताना दत्ता खुराडे, अमित जाधव, धनाजी ठाकूर, संजय कोळी, राजेश सक्ते आदी युवा कार्यकर्ते. नायिका गौरी नलावडे …

Read More »

सचिन तेंडुलकरला पाहून पोलिंग ऑफिसरने साधली संधी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघांमध्ये सोमवारी (दि. 21) मतदान झाले. सर्वसामान्यांपासून राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार, क्रिकेटपटूंनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही मतदान केले. मतदानासाठी मतदान केंद्रावर आलेल्या सचिनसोबत एक मजेशीर प्रसंग घडला. वांद्रे पश्चिमेतील मतदान केंद्रावर दुपारच्या सुमारास पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनसोबत सचिन पोहोचला …

Read More »

भाजप शहर सोशल मीडिया सेलच्या पदाधिकार्यांनी घेतली आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट

पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर भाजप शहर सोशल मीडिया सेलच्या पदाधिकार्‍यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी सोशल मीडिया सेल संयोजक प्रसाद हनुमंते, सहसंयोजक आफताफ ताडे, प्रशांत फुलपगार, देबाशीष दास, सचिन नाझरे, गणेश म्हात्रे, शार्दूल अमृते, रुपेश नागवेकर,नरेंद्र सोनवणे, तालुका सहसंयोजक मनोज पाटील आदी उपस्थित होते.

Read More »

नताशाकडून पांड्या ‘क्लीन बोल्ड’?

मुंबई : प्रतिनिधी भारतीय संघातील खेळाडूंच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होत असतात. यातच बॉलीवूड आणि क्रिकेट यांचे संबंध नेहमीच प्रेमाचे असतात. मग यात अनुष्का-विराट यांची जोडी असो किंवा जहीर आणि सागरिका घाटगे असो. आता एका सर्बियन मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्रीच्या प्रेमात भारतीय संघाचा एक स्टार खेळाडू बुडाला आहे. यांच्यातील …

Read More »

विजय हजारे क्रिकेट स्पर्धा, पावसामुळे मुंबई संघ बाद

बंगळुरू : वृत्तसंस्था पावसाच्या खेळखंडोब्यामुळे गतविजेत्या मुंबईला विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. यशस्वी जैस्वाल (नाबाद 60) आणि आदित्य तरे (नाबाद 31) या सलामी जोडीच्या भागीदारीमुळे मुंबई विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतानाच पावसामुळे सामना अर्धवटच रद्द करण्यात आला, परंतु साखळीत मुंबईपेक्षा एक जास्त विजय मिळवल्याने छत्तीसगडने उपांत्य …

Read More »

बांगलादेशी क्रिकेटपटूंच्या संपाच्या पवित्र्यावर बीसीसीआयची सावध भूमिका

ढाका : वृत्तसंस्था पगारवाढीसह अन्य काही मागण्यांची पूर्तता होत नाही, तोवर कोणत्याही क्रिकेट सामन्यात खेळणार नसल्याची भूमिका खेळाडूंनी घेतल्यामुळे बांगलादेशचा भारत दौरा अडचणीत सापडला आहे. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सावध भूमिका घेतली आहे. शाकिब अल हसन (कसोटी व ट्वेन्टी-20 कर्णधार), महमदुल्ला, मुशफिकर रहिम या बांगलादेशच्या प्रमुख खेळाडूंनी पत्रकार …

Read More »

चौल येथे आज मल्लखांब स्पधार्र्

रेवदंडा : प्रतिनिधी चौल येथे श्रीराम स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने बुधवारी (दि. 23) सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय आंतरशालेय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. इच्छुक खेळाडूंनी सहभागासाठी नरेंद्र राऊत (9270629394) किंवा ॠषिकेश टेकाळकर (7276752648) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More »