पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. 9) पनवेल तालुक्यात दौरा होणार आहे. सकाळी 10 वाजता धानसर, 11 वाजता किरवली, 11.30 वाजता धरणा, दुपारी 12 वाजता धरणा कॅम्प, 1 वाजता रोहिंजण, 2 वाजता पिसार्वे, …
Read More »Yearly Archives: 2019
भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात रास गरबा स्पर्धेचा जल्लोष
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात रास गरबा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेकरिता अर्चना परेश ठाकूर आणि भाग्यश्री देशमुख यांनी या स्पर्धेत परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्त्री शक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रोत्सवाच्या, …
Read More »फसवे हितचिंतक
कृषी क्षेत्रासमोर अशी आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यादृष्टीने विचारमंथनास हातभार लावण्याऐवजी, त्यादृष्टीने शेतकर्यांचे प्रबोधन करण्याऐवजी राज्यातील विरोधीपक्षांनी सत्तेच्या लालसेने पुन्हा एकदा शेतकर्यांना सरसकट कर्जमाफीचे गाजर दाखवले आहे. आमचे सरकार सत्तेवर आल्यास शेतकर्यांसाठी सरसकट कर्जमाफी देण्याच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन हे पक्ष देत आहेत. गेली काही वर्षे महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी …
Read More »माथेरानमध्ये दसर्याच्या सणाला घोड्यांची पारंपरिक मिरवणूक
कर्जत : बातमीदार वाहनांना बंदी असल्याने माथेरानमधील प्रमुख वाहन घोडा असून, येथील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून घोड्याला विशेष महत्त्व दिले जाते. दसर्याच्या मुहूर्तावर मंगळवारी (दि. 8) अश्वचालकांनी सजवलेल्या घोड्यांची विधिवत पूजा करून माथेरानमध्ये मिरवणूक काढली होती. दसर्याच्या दिवशी मंगळवारी दुपारी दोन वाजता घोडेमालकांनी आपल्या घोड्यांच्या खुरांची पूजा केली व फुलांचे …
Read More »आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सकस विचारांची पेरणी आवश्यक -वेच्या गावित
कर्जत : बातमीदार आदिवासी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी सकस विचारांची पेरणी करण्याची गरज असल्याचे मत राज्य शिक्षण विभागाचे मार्गदर्शक शिक्षक वेच्या गावित यांनी कर्जत तालुक्यातील पिंगळस येथील आश्रमशाळेत व्यक्त केले. आदिवासी विद्यार्थ्यांनी भविष्यात चांगले ध्येय गाठावे यासाठी राज्य प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि रायगड जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा यांच्या माध्यमातून अकरावीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद …
Read More »खालापूर तालुक्याला वादळी वार्याचा तडाखा
आदिवासी पाड्यावर घरांचे नुकसान खालापूर : प्रतिनिधी परतीच्या पावसाने सोमवारी (दि. 7) संध्याकाळी खालापूर तालुक्यात धुमाकूळ घातला. या वेळी वादळी वार्याने अनेक घरांचे नुकसान केले, तर काही ठिकाणी उभी पिके जमीनदोस्त केली. सोमवारी संध्याकाळी झालेल्या वादळी पावसाने खालापूर तालुक्यामधील भिलवले आदिवासी वाडीतील अनेक झोपड्या जमीनदोस्त केल्या, तर काही झोपड्यांचे छप्परही …
Read More »‘ईडी’च्या कारवाईबाबत स्थानिक प्रशासन अनभिज्ञ
वाधवान बंधूंच्या अलिबाग येथील फार्म हाऊसवर कारवाई अलिबाग : प्रतिनिधी पंजाब आणि महाराष्ट्र बँक (पीएमसी) प्रकणात अडकलेल्या राकेश आणि सारंग वाधवान यांच्या अलिबागमधील आवास येथील फार्म हाऊसवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी (दि. 7) छापा टाकला. वाधवानच्या जवळचे सहकारी कोण होते याचा शोध ईडी घेत आहे, मात्र या कारवाईबाबत जिल्हा प्रशासन …
Read More »विकास फक्त महायुतीच करू शकते -विनोद घोसाळकर
श्रीवर्धन : प्रतिनिधी दसर्याच्या शुभमुहूर्तावर श्रीवर्धनची ग्रामदेवता श्री सोमजाई देवीचा आशीर्वाद घेऊन शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी मंगळवारी (दि. 8) सकाळी प्रचाराला सुरुवात केली. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 14 उमेदवार नशीब आजमावत असून, त्यापैकी शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी सपत्नीक दसर्याच्या मुहूर्तावर सोमजाई मातेच्या चरणी श्रीफळ …
Read More »रविशेठ पाटील यांना प्रभागातून मताधिक्य देणार
नगरसेवक निवृत्ती पाटील यांची ग्वाही पेण : प्रतिनिधी दसर्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी (दि. 8) पेणचे नगरसेवक निवृत्ती भास्कर पाटील भाजपमध्ये सक्रिय झाले. त्यांनी महायुतीचे उमेदवार माजी मंत्री रविशेठ पाटील यांना प्रभाग क्र. 8मधून मताधिक्य देणार असल्याची ग्वाही पत्रकारांशी बोलताना दिली. गैरसमजुतीमधून नगरसेवक निवृत्ती पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपचा राजीनामा दिला होता, …
Read More »अलिबाग तालुक्यात पथनाट्यातून जनजागृती
अलिबाग : जिमाका विधानसभा निवडणूक मतदार जनजागृती अभियानांतर्गत स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी अलिबाग तालुक्यात चित्ररथ फिरवून व पथनाट्यातून मतदार जनजागृती केली. निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी निवडणूक वैशाली माने आणि जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper