रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक)चा निर्धार पनवेल ः वार्ताहर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी निवडणुक अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजयी करून हॅट्रीक साधायचीच या निश्चयाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते प्रचारास सज्ज झाले आहेत. महायुतीचे उमेदवार …
Read More »Yearly Archives: 2019
श्रीसदस्यांनी केला 1300 झाडांचा परिसर स्वच्छ
डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम मुरूड : प्रतिनिधी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे मुरूड तालुक्यात 2013 साली 1300 झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांभोवती पावसाळ्यात वाढलेल्या वेली, झुडपे कापून रविवारी (दि. 6) श्रीसदस्यांनी झाडांचा परिसर स्वच्छ केला. मुरूड तालुक्यातील कोर्लई, बोर्ली, काशीद, नांदगाव, माजगाव, आगरदांडा परिसरात 2013मध्ये डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे 1300 झाडे …
Read More »कर्जतच्या तेलंगवाडीत वन विभागाची कारवाई
पिकाने भरलेल्या शेतातील भातपीक कापले; ग्रामस्थांचा विरोध कर्जत : बातमीदार तालुक्यातील तेलंगवाडीमधील आदिवासी शेतकर्यांनी वहिवाट असलेल्या जमिनीत भातपीक लावले होते. या पिकाने भरलेल्या शेतात वन विभागाने शनिवारी (दि. 5) कापणी मशीन लावले, मात्र शेतकर्यांनी त्याला विरोध केल्याने वन विभागाने ती कारवाई अर्धवट सोडली आहे. कर्जत तालुक्याचे पहिले आमदार राहिलेले मनोहर …
Read More »महाआघाडीसमोर महायुतीचे महाआव्हान
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीची अखेर घटस्थापना झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सारे एकत्र असल्याची अधिकृत घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत केली. तत्पूर्वी जागावाटप पूर्ण होऊन सगळ्यांचे उमेदवारी अर्जदेखील दाखल झाले. इतके दिवस रखडलेला व गुंतागुंतीचा बनलेला युती, जागावाटप अन् उमेदवारीचा तिढा मुख्यमंत्र्यांनी खमकेपणा दाखवून आणि …
Read More »अक्रित झो संगमेश्वरी बोलीतील वेबसीरिज
रसिकांना दर आठवड्याला भेटण्यासाठी संगमेश्वरी बोलीतून ‘अक्रित झो.. मरनाच्या भायेर बेफाट’ ही वेबसीरिज लवकरच अपलोड केली जाणार आहे. या सीरिजच्या शीर्षक व शीर्षक गीताचे अनावरण नुकतेच करण्यात आले. 29 सप्टेंबरला वेबसीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचे कथालेखक राजेंद्रकुमार घाग, शिरगाव सरपंच वैशाली गावडे-सनगरे यांच्या हस्ते या वेबसीरिज …
Read More »विवेक पाटलांचा लढाईआधीच पराभव
महेश बालदी यांचा उमेदवारी अर्ज वैध उरण : वार्ताहर बुडित जाणार्या कर्नाळा बँकेच्या गैरव्यवहाराचा दुरूपयोग करून शेकापचे उरण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विवेक पाटील यांच्याकडून जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या उमेदवारी अर्जास हरकत घेण्यात आली होती, मात्र पाटील यांचा आक्षेप फेटाळत लावून बालदी यांचा अर्ज वैध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी जाहीर …
Read More »पनवेल भाजपमध्ये ‘प्रवेशोत्सव’
शेकापचे वाकडी येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हाती ‘कमळ’ पनवेल : रामप्रहर वृत्त सक्षम नेतृत्व व विकासात अग्रेसर असलेल्या भारतीय जनता पक्षात विविध पक्षांतून दाखल होणार्यांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच असून, वाकडी ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 4) भाजपत जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पक्षाची शाल …
Read More »मुग्धाताईंच्या आठवणींनी सारेच हेलावले!
शोकसभेत लोकप्रतिनिधी, नागरिकांकडून आदरांजली अर्पण पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा मुग्धा लोंढे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शनिवारी (दि. 5) सायंकाळी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी लोकप्रतिनिधी आणि पनवेलचे नागरिक …
Read More »शर्मिला ठाकरे यांच्या कारला अपघात; किरकोळ दुखापत
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात होऊन त्यांच्या पत्नी शर्मिला यांना मुका मार बसला, तर चालकासह अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. ठाकरे कुटुंब एकवीरा देवीचे दर्शन घेऊन परतत असताना शनिवारी (दि. 5) हा अपघात झाला. नवी मुंबईतील सानपाड्याच्या सिग्नलजवळ एक …
Read More »रायगडात 112 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध
अलिबाग : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघातील 131 उमेदवारांपैकी 112 उमेदवारांची नामनिर्देशनपत्र वैद्य ठरली आहेत, तर 19 उमेदवारांची नामनिर्देशनपत्र अवैध ठरली आहेत. 188-पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये 18 उमेदवारांपैकी 13 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली असून पाच उमेदवारांची नामनिर्देशपत्रे अवैध ठरली आहेत. 189-कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आज 17 उमेदवारांपैकी 14 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper