मुरूड : प्रतिनिधी सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी शनिवार, रविवार या सुट्यांचा योग साधून पर्यटक येत आहेत. मात्र बदलत्या हवामानामुळे सध्या किल्ल्यावर जाणारी शिडाची बोट वाहतूक विस्कळीत झाली असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. 1 सप्टेंबरपासून जंजिरा किल्ल्यावर जाणारी बोट वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मात्र जोरदार पाऊस आणि वेगवान वारे …
Read More »Yearly Archives: 2019
वाकण-खोपोली मार्ग खड्डेमुक्तीसाठी पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांचा पुढाकार
पाली : प्रतिनिधी वाकण-पाली-खोपोली राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. त्यातच पावसाळ्यात या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. पाली पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले निरीक्षक बाळा कुंभार यांनी या मार्गावर स्वतः उभे राहून शक्य तेवढे खड्डे बुजवून घेतले. वाकणपासून जंगलीपीर, बलाप, पाली ते थेट रासळ, …
Read More »खोपोलीत डेंग्यू; नागरिकांत भीती, आरोग्य यंत्रणा सतर्क
खोपोली : प्रतिनिधी खोपोली शहर व परिसरात डेंग्यूच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. शहरात जवळपास 9 जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती पुढे आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. यातील तीन रुग्ण पार्वती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून, तीन रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहेत. तर अन्य रुग्ण शहरातील डोंगरे हॉस्पिटलमध्ये …
Read More »वर्ल्ड थ्रो बॉलमध्ये ओमकार बोबडेचे सुयश
कामोठे : रामप्रहर वृत्त येथील ओमकार राजेंद्र बोबडे व भारतीय संघाने वर्ल्ड थ्रो बॉल चॅम्पियनशिप, क्वालालंपूर मलेशिया इथे 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधित झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करीत सुवर्ण पदक जिंकले. या कामगिरीमुळे ओमकारची डिसेंबरमध्ये अमेरिकेत होणार्या स्पर्धेत निवड झाली आहे. ओमकार व पूर्ण भारतीय संघावर या कामगिरीबद्दल …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण
कळंबोली ः रामप्रहर वृत्त कळंबोली भाजपच्या वतीने पर्यावरणाचे संवर्धन व प्रदूषणावर मात, हा संदेश देताना आमदार प्रशांत ठाकूर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन भाजपचे कळंबोली शहर उपाध्यक्ष व समाजसेवक नितीन काळे व भाजप कळंबोली शहर उपाध्यक्ष यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले होते. हे स्पर्धेचे दुसरे वर्षे असून या स्पर्धेत श्रींची आकर्षक …
Read More »ओरायन मॉलमधील मोदक स्पर्धेत महिलांसह पुरुषांचा सहभाग
पनवेल ः वार्ताहर नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणार्या पनवेलमधील ओरायन मॉलमध्ये पारंपरिक मोदक स्पर्धेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या स्पर्धेत 55 स्पर्धकांनी भाग घेतला. त्यात महिलांसह पुरुषांनी सुद्धा सहभाग घेतल्याने त्यांचे आयोजकांतर्फे कौतुक करण्यात आले. या स्पर्धेत उपस्थित स्पर्धकांनी उकडीच्या मोदकासह काजू मोदक, चॉकलेट …
Read More »कष्टाला पर्याय नाही ः आमदार प्रशांत ठाकूर
एकविरा मित्र मंडळाच्या वतीने सत्कार सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा, मेहनत घ्यावी, मन लावून अभ्यास करावा, कष्टाला पर्याय नाही, असे प्रतिपादन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहोळ्यात ते बोलत होते. एकविरा युवक मित्र मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे, असेही गौरवोद्गार त्यांनी …
Read More »शेकाप, राष्ट्रवादी नेत्यांसमोरच गोंधळ ; शिक्षक पुरस्कार सोहळा गोंधळातच उरकला
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेतर्फे (राजिप) आयोजित करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात नियोजन नसल्यामुळे गोंधळ उडाला. पूर्वघोषित कार्यक्रमानुसार हा कार्यक्रम जिल्हाधिकरी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे होणार होता, परंतु तेथील अव्यवस्थेमुळे हा कार्यक्रम पीएनपी नाट्यसंकुलात घेण्यात आला. तेथे गोंधळातच हा कार्यक्रम उरकण्यात आला. शिक्षक दिनाच्या दिवशी (दि. …
Read More »पुराने कोलमडलेली शेती अर्थव्यवस्था सावरायला हवी
गेल्या काही दिवसांपासून पाऊस बरसत आहे. 15 दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रावर पुराचे संकट कोसळले. सारे होत्याचे नव्हते झाले. अनेकांचा संसार वाहून गेला. काही ठिकाणी माणसेही वाहून गेली. पुरामुळे शेतीला मोठा फ टका बसला. पश्चिम महाराष्ट्राची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. मुसळधार पावसामुळे पूर आला व शेती आणि त्यावर आधारित अर्थव्यवस्था वाहून गेली. …
Read More »धडाडीच्या निर्णयांचे 100 दिवस
मोदी यांचे सरकार राष्ट्रीय सुरक्षितता, विकास आणि गोरगरिबांचे कल्याण यांचे प्रतीक बनले आहे. देशाचा विकास, जनतेचे कल्याण आणि राष्ट्राची सुरक्षा याकरिता गरज भासेल ते सारे काही करण्यास हे सरकार कटिबद्ध आहे. आर्थिक आघाडीवर परिस्थिती काहिशी बिकट आहे. परंतु सरकारने ते कदापिही नाकारलेले नाही. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सरकार हालचाली करतेच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper