Breaking News

Yearly Archives: 2019

कर्जत तालुक्यात शनिवारी चार ग्रामपंचायतींसाठी मतदान

कर्जत : बातमीदार तालुक्यातील उमरोली, वाकस, जामरुंग आणि रजपे या चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका शनिवारी (दि. 31) होत आहेत. त्यापैकी वाकस ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून, अन्य तीन ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. कर्जत तालुक्यातील वाकस ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच म्हणून सुदर्शना संजय तांबोळी या बिनविरोध निवडून …

Read More »

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पुणे ः प्रतिनिधी फोटोशूटच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक मंदार कुलकर्णीला अटक करण्यात आली आहे. मंदारने बळजबरी बिकनी फोटोशूट करण्यास भाग पाडल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात 23 ऑगस्टला तिने तक्रार दाखल केली होती. जानेवारीत मंदार आणि पीडित मुलीची भेट एका नाट्य …

Read More »

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिनबाबत नागरिकांची जनजागृती

अलिबाग ः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन वापरण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश असून या मशिन वापराबाबत व त्यासंदर्भातील शंकांचे निरसन व्हावे म्हणून जिल्ह्यात जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तरी या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी सहभागी व्हावे व आपल्या मनातील शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन …

Read More »

केंद्राच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा

खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश अलिबाग ः प्रतिनिधी केंद्र शासनाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना असून त्यांची अंमलबजावणी करून त्या जिल्ह्यातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा, असे निर्देश खासदार तथा अध्यक्ष जिल्हा विकास  समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी (दि. 29) येथे दिले.  जिल्हा नियोजन भवन सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय जिल्हा विकास …

Read More »

नवसाला पावण्याचे दावे; गणेश मंडळांवर कारवाईची शक्यता

मुंबई ः प्रतिनिधी भक्तांची गर्दी खेचण्यासाठी मंडळांनी खास ’नवसाचे’ मार्केटिंग फंडे वापरणे नवीन नाही. मात्र, सार्वजनिक गणपतीसाठी ’नवसाला पावणारा’, ’इच्छापूर्ती करणारा’ अशा टॅगलाइन वापरून गणेशभक्तांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे वेड आता मोठ्या मंडळांसह लहान मंडळांतही झपाट्याने पसरताना दिसत आहे. मंडळांचे हे मार्केटिंग कौशल्य अंधश्रद्धेकडे झुकत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित मंडळांवर जादूटोणा …

Read More »

‘वायफळ वक्तव्ये करू नका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये मंत्र्यांना दोन महत्वाचे सल्ले दिले आहेत. वायफळ बडबड करु नका तसेच कोणत्याही नातेवाईकाला तुमच्या मंत्रीमंडळासाठी सल्लागार म्हणून नियुक्त करु नका असे सल्ले मोदींनी मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना दिले आहेत. अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर एखादे वक्तव्य केल्यानंतर त्यावरुन निर्माण होणारे वाद …

Read More »

एअर इंडियात प्लास्टिकबंदी

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर उचलले पाऊल; पुनर्वापर न होणार्‍या वस्तूंना मज्जाव नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सरकारी विमान कंपनी असणार्‍या एअर इंडियाकडून 2 ऑक्टोबरपासून विमानांमध्ये पुनर्वापर न होणार्‍या (सिंगल यूज) प्लास्टिकवर बंदी आणली जात आहे. पहिल्या टप्प्यात एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एलायंस एअरच्या विमानांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात …

Read More »

दीपा मलिक ‘राजीव गांधी खेलरत्न’ने सन्मानित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रिओ पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकीत भारताला रौप्य पदक मिळवून देणारी दिव्यांग खेळाडू दीपा मलिक हिला खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दीपाचा गौरव करण्यात आला आहे. आशियाई आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा पैलवान बजरंग पुनियालाही हा पुरस्कार देण्यात आला आहे. …

Read More »

काश्मीर मुद्यावर आफ्रिदीला गंभीरची सणसणीत चपराक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 कलम काढण्याचा निर्णय भारताने घेतला. या निर्णयाचे देशभरातून स्वागत करण्यात आले. इतर देशांनीही या प्रकरणी भारताला पाठिंबा दर्शवला. पण पाकिस्तानला मात्र हा निर्णय रूचला नाही. पाकिस्तानातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी यावर टीका केली. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे कबड्डी स्पर्धेत यश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेंतर्गत कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी पनवेल येथे जिल्हास्तरीय 17 वर्षांखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धा बुधवारी (दि. 28) संपन्न झाल्या. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रथम क्रमांकाचे वरील विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्‍या स्वप्नील मोरे यांचे संस्थेचे चेरमन लोकनेते रामशेठ ठाकूर व शाळेच्या मुख्याध्यापिका …

Read More »