Breaking News

Yearly Archives: 2019

डॉ. अनिल पाटील यांचे प्रश्नमंजुषा स्पर्धेत सुयश

मोहोपाडा : वार्ताहर रसायनी वाशिवली येथील डॉ. ए. आर. पाटील यांनी ‘रस्ता सुरक्षा अभियान’अंतर्गत आपले जीवन सेवेसाठी राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन महाप्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल नवी मुंबई पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन ए. आर. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र …

Read More »

तंदुरुस्त भारत अभियानामध्ये सीकेटी महाविद्यालयाचा सक्रीय सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान  महाविद्यालय, खांदा कॉलनीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राष्ट्रीय क्रीडा दिनी केलेल्या तंदुरुस्त भारत अभियानामध्ये सक्रीय सहभाग नोंदवला. देशातील जनतेला तंदुरुस्त राहण्यासाठी चालू झालेल्या या अभियानामध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी …

Read More »

‘स्वाभिमान’चं विसर्जन! अखेर राणेंचा रविवारी भाजपप्रवेश

मुंबई :  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांना अखेर भाजप प्रवेशाचा मुहूर्त सापडला आहे. विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाआधी म्हणजे 1 सप्टेंबरला खा. राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रवेशाच्या वृत्ताला स्वत: राणेंनीच दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी आपण 10 दिवसांत मोठा …

Read More »

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा अधिकारी कार्यालय रायगड आयोजित ‘युवा जागर महाराष्ट्रावर बोलू काही’ राज्यामध्ये युवा संसद या कार्यक्रमाच्या अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धा विद्यालयीन स्तरावर आयोजित केल्या होत्या. या …

Read More »

आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पनवेल कोळीवाडा येथील जरीमरी मंदिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवारी (दि. 29) करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते आणि नगरसेविका दर्शना भोईर यांच्या …

Read More »

सिडको गृहनिर्माण योजनेची पात्रता यादी जाहीर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको महागृहनिर्माण योजना 2018 च्या अपील प्रक्रियेमधील पात्र व अपात्र अर्जदारांची अंतिम यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र अर्जदारांना सिडकोतर्फे अपिल करण्यासाठी 30 जुलै ते 13 ऑगस्ट 2019 अशी 15 दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानुसार पात्र व अपात्र अर्जदारांची अंतिम यादी …

Read More »

विहीर पडल्याने ऐेन पावसाळ्यात पाणीटंचाई

पोलादपुरातील खोपड गावातील महिलांची वणवण सुरू पोलादपूर : प्रतिनिधी अतिवृष्टीमध्ये खोपड (ता. पोलादपूर) गावातील विहीर पडल्याने ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील गोवले ग्रामपंचायत हद्दीतील खोपड गावातील एकमेव विहीर 29 जुलैला झालेल्या अतिवृष्टीत पूर्ण कोसळली असून, त्या विहिरीत असलेला …

Read More »

वावेपोटगे गावात स्वच्छता अभियान

रोहे ः प्रतिनिधी रोहा अलिबाग मार्गावर असलेले वावे पोटगे येथे कोकण कृषी विद्यापीठाच्या दापोली येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण विकास कृषी कार्यानुभव कार्यक्र्रमांतर्गत वावेपोटगे (ता. रोहा) गावातील मंदिर परिसरात श्री काळकाई देवी मित्र मंडळाच्या मदतीने स्वच्छता अभियान राबविले. या वेळी श्रमदान करून त्यांनी श्री काळकाई देवी व राजूबाई देवी मंदिर …

Read More »

वाकस ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे कमळ फुलले

दोन सदस्य बिनविरोध कडाव : प्रतिनिधी सार्वत्रिक निवडणुकीत बिनविरोध निवडून येत कर्जत तालुक्यातील वाकस ग्रामपंचायतीमध्ये प्रथमच भाजपचे कमळ फुलविणार्‍या दोन सदस्यांचे पक्षाचे जिल्हा चिटणीस तथा वाकस ग्रामपंचायत प्रभारी रमेश मुंढे यांनी अभिनंदन केले. थेट सरपंच आणि नऊ सदस्यांच्या वाकस ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 31 ऑगस्ट रोजी होत आहे. या निवडणुकीत  भाजपच्या …

Read More »

रेल्वे पोलिसांनी महिलेची पर्स केली परत

पनवेल : बातमीदार लोकल पकडण्याच्या घाई गडबडीत पनवेल रेल्वे स्थानकावर एका महिलेची पर्स विसरली. पनवेल रेल्वे पोलीस कुलदीप सिंग यांनी बंदोबस्तात असताना पर्स ताब्यात घेऊन पर्सची तपासणी केली असता त्यामध्ये मोबाईल, रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख 10 हजार रुपयांचा ऐवज होता. पोलिसांनी महिलेची पर्स तिच्या नातेवाईकाकडे सुपूर्द …

Read More »