Breaking News

Yearly Archives: 2019

जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत ‘मिशन मंगल’

खारघर : प्रतिनिधी युवा प्रेरणा सामाजिक संस्थेतर्फे खारघरमधील मुर्बी जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना गुरुवारी (दि. 29) ‘मिशन मंगळ’ हा प्रेरणादायी चित्रपट दाखविण्यात आला. युवा प्रेरणा सामाजिक संस्था ही गेल्या अनेक वर्षांपासून खारघरमध्ये अनेकविध सामाजिक उपक्रम राबवते. देहदान, अवयवदान, रक्तदान, शैक्षणिक, आरोग्यविषक याबरोबरच राष्ट्रीय एकात्मता व वैज्ञानिक जाणिवा नागरिकांमध्ये रुजवण्यासाठी वेगवेगळे …

Read More »

‘सुवर्ण’ सिंधू

भारतीय क्रीडा क्षेत्रात मागील काही महिने चांगल्या बातम्या येत आहेत. दुती चंद, हिमा दास, मोहमद अनास यांनी पदके जिंकली. पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत  सुवर्णपदक जिंकले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात बॅडमिंटनसारख्या वैयक्तिक खेळात जगज्जेता खेळाडू तयार होतात ही …

Read More »

नेरळमध्ये आचारसंहितेकडे दुर्लक्ष

ग्रामपंचायत निवडणूक; 15 रिक्षांवर विनापरवाना ध्वनिक्षेपक, प्रशासन अनभिज्ञ कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच आणि सदस्यपदाच्या 17 जागांसाठी 31 ऑगस्ट रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. उमेदवारांनी प्रचारासाठी जिकडे बघावे तिकडे बॅनर लावले असून ध्वनिक्षेपक लावून किमान 15 रिक्षा दिवसभर प्रचार करीत असतात. त्यातील एकही वाहन निवडणूक यंत्रणेची परवानगी घेऊन …

Read More »

आरोग्यम् धनसंपदा

नुकत्याच 25 ऑगस्टला पार पडलेल्या मन की बात कार्यक्रमातही मोदींनी या जनआंदोलनाचे सूतोवाच केले होते. देशातील प्रत्येक नागरिकाला फिट आणि फिटनेसविषयी जागरूक राहताना पाहण्याची आपली इच्छा असल्याचेही मोदीजींनी यावेळी सांगितले. देशातील निरनिराळ्या सामाजिक-आर्थिक स्तरातील जनतेपर्यंत आता फिट आणि निरोगी राहण्याचे फायदे पोहोचवले जातील, याची ग्वाहीही मोदींनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

नेरळ येथे आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रचार फेरी

नेरळ : येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचार फेरी काढली. या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, ज्येष्ठ कार्यकर्ते पुंडलिक पाटील, तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, महिला तालुका अध्यक्ष सुगंधा भोसले, भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे, …

Read More »

सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्याची जलवाहतूक सुरू

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील राजापुरी बंदरात असणार्‍या सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी शिडांच्या बोटीची गुरुवारपासून (दि. 29) सुरुवात झाली. पाऊस आणि वार्‍याचा वेग कमी झाल्याने प्रशासनाने या किल्ल्यावर जाण्यासाठी जलवाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. 13 शिडांच्या बोटींमधून सदरची प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा 22 एकर परिसरात असून …

Read More »

नेरळ कुंभारवाड्यात फक्त शाडूच्या मूर्ती

पर्यावरणपूरक मूर्ती, फोटोकॉपीप्रमाणे गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध कर्जत : बातमीदार प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील गणेशभक्तांत नेरळ येथील गणेशमूर्ती बनविणारा कारखाना प्रसिद्ध आहे. फोटोकॉपीप्रमाणे गणेशमूर्ती बनविणारा कारखाना अशी ओळख असलेल्या या कारखान्यात केवळ पर्यावरणपूरक शाडू मातीपासून मूर्ती बनविल्या जातात. कर्जत तालुक्यात शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे निवडक कारखाने आहेत. त्यात नेरळ कुंभारवाड्यातील दहिवलीकर यांचा …

Read More »

मजबूत पूल ‘एल अॅण्ड टी’ने ठरवला कमजोर

गणेश भक्तांमध्ये घबराट महाड : प्रतिनिधी                एल अ‍ॅण्ड टी या ठेकेदार कंपनीने ’आगे पूल कमजोर है’ असा खोटा फलक लावून मुंबई-गोवा महामार्गावरील गांधारी नदीवरील मजबूत पुलाला कमजोर ठरविले आहे. यामुळे कोकणात जाणार्‍या- येणार्‍या गणेशभक्तांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, सदर पूल हा वाहतुकीसाठी मजबूत असून त्याला कोणताच धोका नाही, असा खुलासा …

Read More »

डॉ. धर्माधिकारी महाविद्यालयात निबंध व वादविवाद स्पर्धा

रोहे ः प्रतिनिधी गोवे-कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात बुधवारी (दि. 28) निबंध व वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या. निबंध स्पर्धेसाठी ’सोशल मीडिया व मी’ आणि ’21व्या शतकातील विज्ञानाची प्रगती’ हे विषय देण्यात आले होते, तर वादविवाद स्पर्धा ’370  कलम रद्द केले : योग्य की अयोग्य’, ’महाविद्यालयीन निवडणुका असाव्यात की …

Read More »

पाटणसईतील विविध कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

पेण : प्रतिनिधी नागोठणे विभागातील पाटणसई ढोकवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 29) त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी भाजपमध्ये स्वागत केले. रविशेठ पाटील यांचे खंदे कार्यकर्ते नारायण आबा सुटे, रामचंद्र देवरे, कोंडीराम आखाडे, सुदाम तोडमकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पक्षप्रवेशाने नागोठणे विभागात भाजपची ताकद …

Read More »